-->

कला उत्सव Kala Utsav

कला उत्सव Kala Utsav

शालेय स्तरावरील  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमधील प्रतिभाभाव  ओळखून त्यांच्या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय,नवी दिल्ली यांच्या मार्फत कला उत्सवाचे प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येत असते. सन 2021-22 या वर्षात केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये प्रामुख्याने ९ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे

कला प्रकार

  1. शास्त्रीय गायन,
  2. पारंपारिक गायन,
  3. शास्त्रीय संगीत वादन,
  4. पारंपारिक लोकसंगीत वादन,
  5. शास्त्रीय नृत्य,
  6. पारंपरिक लोकनृत्य,
  7. द्वीमितीय चित्र,
  8. त्रिमितीय चित्र/शिल्प व
  9. खेळणी तयार करणे 
या ९ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. या सर्व ९ प्रकारांमध्ये ऑनलाईन पद्धतीने  स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.या कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सदर सर्व ९ कला प्रकारांमध्ये शालेय स्तरावरील  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे.

कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संबधित  विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावयाचा आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेला व्हिडिओ व त्यासोबत कला सादर करतानाचे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या सोशल मेडिया जसे  फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर किंवा यु-टूब अशा अकाऊंट वरून #kalautsavmah२०२१ या हॅशटॅगचा वापर करून दि. १३ नोव्हेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सोशल मेडिया वर पोस्ट करावा. सोशल मेडिया जसे फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून कला प्रकाराचा  व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक 

विद्यार्थ्यांनी लिंक copy करून ठेवावी. त्यानंतर सहभागी  विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav/ या पोर्टल जाऊन करावी. कला उत्सवाकरिता व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक पोर्टलवर माहिती भरताना योग्य ठिकाणी Paste करावी . https://scertmaha.ac.in/kalautsav/ पोर्टलवर नोंदणी करताना सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.

कला उत्सवात प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कला प्रकारात १८ विद्यार्थ्यांची राज्य स्तराकरिता  निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून केली जाईल.

कला उत्सवात प्रत्येक जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट स्पर्धकांमधून प्राप्त झालेली नामनिर्देशने व व्हिडिओ यांची तपासणी राज्यस्तरीय कला उत्सवात तज्ञ समितीमार्फत करण्यात येईल. त्यानंतर राज्यस्तरावर समितीमार्फत निवडलेले सर्वोत्कृष्ट स्पर्धक Online /प्रत्यक्ष सादरीकरण करतील. यामधून प्रत्येक कलाप्रकारासाठी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कलाप्रकारामध्ये १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड राज्यस्तरावर कला उत्सवात करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची नामनिर्देशाने पाठविण्यात येतील.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या online पद्धतीने होणार आहेत. कला उत्सवात राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे निवडीबाबत  बाबत स्वतंत्रपणे कळविले जाईल.

कला उत्सव Kala Utsav
कला उत्सव Kala Utsav

महत्त्वाचे- आपल्याकरिता अधिक महत्वाची माहिती मिळविण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >