NAS | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण | प्रश्नसंच | प्रश्नपत्रिका | प्रश्नपेढी | Question paper | Question Bank Questionnair
NAS | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण | राष्ट्रीय उपलब्धि सर्वेक्षण (NAS) हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख सर्वेक्षण आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण यामध्ये NCERT दिल्ली या संस्थेने ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्न विचारले जातात. ज्ञान, आकलन व उपयोजन या शैक्षणिक उद्दिष्टांबरोबर मूल्यमापन, विश्लेषण व नवनिर्मिती या उच्च स्तरीय उद्दिष्टांवर आधारित हे NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण) आहे.
NAS | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)
NAS विषयी थोडक्यात
NAS चाचणी
NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY QUESTION (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण) |
- NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यांनी स्वतः Random पद्धतीने निवडलेले आहेत.
- सर्व्हेक्षणासाठी शाळा निवडताना NCERT कडून s, r1 आणि r2 या 'शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
- s (selected), r1 (reserve 1) आणि r2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील.
- NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीचे स्वरूप :- objective / MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.
- विषय- इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरणशास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी होणार आहे. (वेळ 60 मिनीट)
- इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)
- NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणार आहेत.
- NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्ये DIECPD प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी या यंत्रणेचा समावेश आहे.
- NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेल, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.
- NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्या मार्फतच संबधित वर्गाची NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.
मुख्याध्यापकांना NAS | राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी परीक्षा कामकाजासंबंधी खालील सूचना
NAS | राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी प्रश्नसंच | प्रश्नपत्रिका | प्रश्नपेढी
National ACHIEVEMENT Survey Test Questionnaire | Question paper | Question Bank
इयत्ता |
Downloas Link |
पहिली |
|
दुसरी |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
COMMENTS