MYLAP अंतर्गत महाराष्ट्र शासन व HCL कंपनी कराराव्दारा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी...
MYLAP- Maharashtra Young Leaders Aspirational Development Programme
20 हजार विद्यार्थ्यांना MYLAP अंतर्गत महाराष्ट्र शासन व HCL कंपनी कराराव्दारा नोकरीची संधी... |
MYLAP अंतर्गत महाराष्ट्र शासन व हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेड (एच.सी.एल.) कंपनी यांच्यातील सांमजस्य करार
दि. 06/06/2022 रोजी महाराष्ट्र शासन व एच.सी.एल. कंपनी यांच्यामधील सामंजस्य कराराचे ऑनलाईन प्रक्षेपन व व्ही.सी. मधील मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन तसेच मा. शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या प्रत्यक्ष सूचना महाराष्ट्र शासन व एच.सी.एल. कंपनी यांच्यामधील झालेल्या सामंजस्य करारानुसार मार्च 2021 व मार्च 2022 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये गणित विषय घेवून जे विद्यार्थी एकुण सर्व विषयात एकुण 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण व गणित विषयात 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी https://www.hcltechbee.com या वेबसाईट वर रजिष्ट्रेशन केल्यानंतर Aptitude Test and Interview Rounds नंतर सदरील कंपनी 20000 विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करुन त्यांना एक वर्षाचे ट्रेनिंग (6 महिने ऑनलाईन व 6 महिने ऑफलाईन ट्रेनिंग) देणार आहे. ऑफलाईन ट्रेनिंगच्या सहा महिन्याच्या काळात विद्यार्थ्यांना रु. 10000 प्रती महा स्टायफंड दिला जाणार आहे व जॉबला जॉईन झाल्याबरोबर 2,20,000/- रुपये प्रतीवर्षे पेमेंटचा सॉफ्टवेअर जॉब देणार आहे.
पुढे कंपनीमार्फतच नामांकित विद्यापिठामधून आयटी क्षेत्रात शिष्यवृत्तीसह पदवी प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. तरी सदरील सामंजस्य करारानुसार आपल्या विद्यालयातील / महाविद्यालयातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना सदरील बाबीचा लाभ घेणे बाबत शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व जिल्हा शिक्षण यंत्रणा यांनी आपल्या स्तरावरुन विद्यार्थी व पालक यांना माहिती द्यावी.
मार्च 2021 किंवा 2022 वर्षातील इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म भरावा
We're off to a fantastic start. 5000+ students have registered in the first week for Maharashtra Young Leaders' Aspiration Development Programme's (मिलाप) collaboration with HCL Technologies for early career development of Std 12 students. You too can register, details below. pic.twitter.com/7t2IrZMvee
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 14, 2022
COMMENTS