Read More... Kendrapramukh Bharti Sarav Pariksha 6 केंद्रप्रमुख भरती सराव परीक्षा 6

Kendrapramukh Bharti  बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत  परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 

Kendrapramukh Bharti Sarav Pariksha 6 केंद्रप्रमुख भरती सराव परीक्षा 6

केंद्रप्रमुख भरती सराव परीक्षा Kendrapramukh Bharti Sarav Pariksha 6

केंद्रप्रमुख भरती पात्रता- 

अ) जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

ब) उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

क) प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी बगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

ड) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष . विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील पात्र राहतील. 

केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम 

अ) बुध्दिमत्ता व अभियोग्यता- अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. प्रश्न संख्या १०० गुण १००

ब) शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-  १) भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय- १० प्रश्न १० गुण २) शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य - १० प्रश्न १० गुण ३) माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)- १५ प्रश्न १५ गुण ४) अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती -१५ प्रश्न १५ गुण ५)  माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन - २० प्रश्न २० गुण ६) विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान - १५ प्रश्न १५ गुण ७) संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) -  १५ प्रश्न १५ गुण.

घटक -  RTE 2009 

शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act) 2009 भारतीय संविधानात्मक कायद्याचा एक महत्त्वाचा अंग आहे. इयत्ता 2009 मध्ये भारतीय संसदेने हा कायदा पास केला. याचा उद्दिष्ट भारतीय लोकांना व लोकांच्या आजी-आजोबांना निश्चित समयापासून वर्गीकरणमुक्त, न्यायपूर्ण, निष्पक्ष आणि गुणवत्तायुक्त शिक्षण प्राप्त करण्यासाठी होता.

शिक्षण हक्क कायद्याचे मुख्य प्रावधान:

1. या कायद्यानुसार, 6 ते 14 वर्षांच्या वयाच्या सर्व बालपणार भारतीय लोकांना मुक्त आणि अनिवार्य शिक्षण प्राप्त करण्याचे हक्क आहे.

2. याच्या अंतर्गत, सर्व शाळा नगरी व ग्रामीण क्षेत्रात निर्मित करणे आवश्यक आहे.

3. शाळांमध्ये निश्चित शिक्षण परिप्रेक्ष्यात निर्धारित केलेली विषयवस्तु वापरणार आवश्यक आहे.

4. नगरी व ग्रामीण क्षेत्रातील लोकांना शिक्षणाच्या अंदाजारानुसार मुक्त असलेली स्थानिक प्रशासनिक अधिकारीच्या निर्देशानुसार प्रवेश घ्यायला हवी आहे.

5. आपल्या क्षेत्रातील स्थानिक शिक्षण प्राधिकारांच्या निर्देशानुसार शिक्षण प्रभारी आणि आपल्या क्षेत्रातील नगरी व ग्रामीण क्षेत्रातील लोकांना संपूर्ण प्रशिक्षण प्रदान करणे आवश्यक आहे.

6. कायद्यानुसार, अनुदानार्थी निजी व निर्देशित शाळा संस्थांना विद्यार्थ्यांना व्याख्यान देता येईल.

7. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत आरक्षित शिक्षणालयीन निवडणूक योजनेनुसार, आरक्षित जातीसंघांतर्गतील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सुविधा आहे.

शिक्षण हक्क कायद्याचा ध्येय भारतीय शिक्षण प्रणालीला समावेश करणे, न्यायपूर्णता व अधिकारांचे मान्यता देणे आणि संयुक्त शिक्षण प्रणालीची व्यवस्था ठरवणे आहे. या कायद्यामुळे, भारतातील अनुप्रयोगांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेचे वाढ सुनिश्चित होणार आहे आणि जनतेला उच्च शिक्षणात आवड असलेल्या लोकांना सार्वजनिक शिक्षण प्रणालीमध्ये उच्च शिक्षणात प्रवेश मिळवावा याची खात्री देते.

आपल्या भारतीय नागरिकांना आपले शिक्षण हक्क विचारण्यात आलेले आहे आणि या कायद्यानुसार त्याची अवलंबून मिळवण्यासाठी उपयुक्त प्राधिकारांच्या वापराची आवश्यकता आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील शिक्षण प्राधिकारांकडे संपर्क साधण्याची सल्ला दिली जाते.

Kendrapramukh Bharti Sarav Pariksha 6 केंद्रप्रमुख भरती सराव परीक्षा 6

 

केंद्रप्रमुख भरती सराव परीक्षा 6

घटक -  RTE 2009 

सराव प्रश्नपत्रिका 

1/15
प्रश्न १ ला- भारतातील प्राथमिक शिक्षणाचा हक्क ________ अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.
१) अनुच्छेद 21 B
२) अनुच्छेद 26 A
३) अनुच्छेद 21 A
४) अनुच्छेद 11 A
2/15
प्रश्न २ रा- अनुच्छेद 21 A अंतर्गत, RTE कायदा - 2009 ची वैशिष्ट्ये कोणते योग्य पर्याय निवडा ?
१) खाजगी शिकवण्यांवर बंदी घालणे.
२) 25% जागा राखीव ठेवणे.
३) कामकाजाच्या तासांच्या तयारीच्या तासांसह 45 तास निश्चित करणे.
४) वरील सर्व
3/15
प्रश्न ३ रा - भारतातील प्राथमिक शिक्षणाचा हक्क भारतीय संविधानातील अनुच्छेद ------ अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.
१) 22 A
२) 21 A
३) 26 A
४) 30 A
4/15
प्रश्न ४ था- RTE 2009 नुसार खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी ------ जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे.
१) 35 %
२) 25%
३) 15 %
४) 50%
5/15
प्रश्न ५ वा- संविधानाच्या अनुच्छेद 21A नुसार
१) शिक्षण हा 0 ते 14 वयोगटातील मुलांचा मूलभूत अधिकार आहे.
२) शिक्षण हा 1 ते 14 वयोगटातील मुलांचा मूलभूत अधिकार आहे.
३) 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे.
४) शिक्षण हा 6 ते 14 वयोगटातील मुलांचा मूलभूत अधिकार आहे.
6/15
प्रश्न ६ वा- संविधानातील ------ च्या तरतुदींना अधीन राहून हा अधिनियम 'बालकांना' लागू करण्यात आला.
1) कमल 9 आणि 20
2) कमल 29 आणि 30
3) कमल 19 आणि 20
4) कमल 19 आणि 30
7/15
प्रश्न ७ वा- RTE नुसार बालक म्हणजे ---
१) 1 ते 14 वयोगटातील मुलं
२) 10 ते 14 वयोगटातील मुलं
३) 6 ते 14 वयोगटातील मुलं
४) 14 वयोगटातील मुलं
8/15
प्रश्न ८ वा- RTE ACT 2009 केंव्हा लागू झाला?
१) ४ ऑगस्ट २००९
२) ५ ऑगस्ट २००९
३) ६ ऑगस्ट २००९
४) ७ ऑगस्ट २००९
9/15
प्रश्न ९ वा- आर टी ई कायद्याची अंमलबजावनी केव्हा पासून सुरू झाली?
१) ११ एप्रिल २०१०
२) ४ ऑगस्ट २००९
३) १ एप्रिल २०१०
४) १० एप्रिल २०१०
10/15
प्रश्न १० वा- RTE ची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत--
१) ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण.
२) शिक्षण देणे हे सरकारचे कायदेशीर बंधन आहे.
३) खाजगी शाळांना त्यांच्या 25% जागा EWS आणि वंचित गटांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करते.
४) वरील सर्व
11/15
प्रश्न ११ वा- भारतीय राज्यघटनेत सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यासाठी ---- समाविष्ट केले आहे.
१) कलम २१-अ
२) कलम २१-ब
३) कलम २१-क
४) कलम २१-इ
12/15
प्रश्न १२ वा- ------ रोजी कायदा लागू झाल्यावर प्रत्येक मुलाचा शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणाऱ्या 135 देशांपैकी भारत एक बनला.
१) 1 एप्रिल 2011
२) 11 एप्रिल 2010
३) 21 एप्रिल 2010
४) 1 एप्रिल 2010
13/15
प्रश्न १३ वा- शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act) मधील तरतुद नाही-
१) ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुले जवळच्या सरकारी शाळेत किंवा अनुदानित शाळेत वर्ग पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण घेऊ शकतात.
२) जी मुले काही कारणांमुळे शाळेत गेली नाहीत किंवा शाळेत जाऊ शकली नाहीत, ते पुन्हा शाळेत परत येऊ शकतात. त्यांना या कायद्यामुळे त्यांच्या वयानुसार योग्य असलेल्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो.
३) जे गरीब किंवा दुर्लक्षित बालक आहेत, अशा बालकांना कायद्यानुसार खाजगी शाळेत वर्ग आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळू शकते.
४) यापैकी नाही
14/15
प्रश्न १४ वा- शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act) मधील तरतुद नाही-
१) जवळच्या शाळेत सहा ते चौदा वर्षांदरम्यानच्या सर्व मुलांसाठी मोफत शिक्षणाच्या हक्कासाठी कायद्यानुसार घटनात्मक वैधता आहे.
२) या कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजेच वर्ग पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही मुलाला एकाच वर्गात दोन वेळा बसविता येणार नाही.
३) कायद्यानुसार गरीब कुटुंबातील लाखो मुले खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण घेतील.
४) यापैकी नाही
15/15
प्रश्न १५ वा- १ एप्रिल २०१० पासून जम्मू आणि काश्मीर या राज्यांव्यतिरिक्त संपूर्ण भारतभर बाल हक्क शिक्षण कायदा लागू झाल्याचे भारताचे तत्कालीन पंतप्रधान ----- यांनी जाहीर केले.
१) मा.नरेंद्र मोदी
२) मा. डॉ. मनमोहन सिंग
३) मा. अटल बिहारी वाजपेयी
४) मा. पी. व्हि नरसिंम्हा
Result:

नवीन केंद्रप्रमुख भरती सराव परीक्षा सुरु करा...

Kendrapramukh-Bharti-Sarav-Pariksha-केंद्रप्रमुख-भरती-सराव-परीक्षा-4

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com