वार्षिक नियोजन | मासिक नियोजन | दैनंदिन नियोजन
शालेय अभ्यासक्रमाचे व अभ्यासपूरक कार्यक्रमातील अल्पकालीन नियोजनाचे ३ प्रकार होतात.
- वार्षिक नियोजन
- मासिक नियोजन व
- दैनंदिन नियोजन
संपूर्ण वर्षभराच्या नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाचे, वर्षात येणाऱ्या सुट्या, होणारे कार्यक्रम, परीक्षा इत्यादींचा विचार करून वार्षिक नियोजन करावे लागेल. प्रत्येक महिन्यात किती धडे, कविता, प्रकरणे व कार्यक्रम तसेच घटक चाचण्या, इत्यादी दृष्टिकोनातून मासिक नियोजन करता येईल. प्रत्येक दिवशी वर्गात काय शिकवायचे, प्रयोग कोणता घ्यायचा, कोणते साहित्य शिकवताना वापरावयाचे, कोणत्या तासाला काय घ्यायचे याचे नियोजन म्हणजे दैनंदिन नियोजन' होय. हुषार विद्यार्थ्यांच्या तुकडीला कच्च्या विद्यार्थ्यांच्या तुकड्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे नियोजन वेगवेगळे असावे. कारण दोन्ही प्रकारच्या तुकड्यांना शिकविताना पद्धत, साधने वेगळी असतील. ह्या दैनंदिन नियोजनाचे योग्य असे मार्गदर्शन मुख्याध्यापकाने करावे. दैनंदिन नियोजन तपासून घेत जावे.
वर्गवेळापत्रके व शिक्षकवेळापत्रके हा शाळेतील शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे त्रोटक (Sketchy) वार्षिक नियोजन करू शकतात. काही शाळांत प्रत्येक महिन्याचे सविस्तर अध्यापन नियोजन करवून घेण्याची प्रथा आहे.
वार्षिक इयत्ता १ ली ते इ. 10 वी पर्यंतच्या सर्व वर्गांचे वार्षिक नियोजन 2023-24 PDF Download PDF
अ.क्र. | इयत्ता | Download वार्षिक नियोजन |
---|---|---|
1 | इयत्ता १ ली वार्षिक नियोजन | Download PDF |
2 | इयत्ता २ री वार्षिक नियोजन | Download PDF |
3 | इयत्ता ३ री वार्षिक नियोजन | Download PDF |
4 | इयत्ता ४ थी वार्षिक नियोजन | Download PDF |
5 | इयत्ता ५ वी वार्षिक नियोजन | Download PDF |
6 | इयत्ता ६ वी वार्षिक नियोजन | Download PDF |
7 | इयत्ता ७ वी वार्षिक नियोजन | Download PDF |
8 | इयत्ता ८ वी वार्षिक नियोजन | Download PDF |
9 | इयत्ता 9 वी वार्षिक नियोजन | Download PDF |
10 | इयत्ता 10 वी वार्षिक नियोजन | Download PDF |
शाळा वेळापत्रक | शालेय वेळापत्रक | School Time table
Maharashtra State Educational WhatsApp Group
Tags:
वार्षिक नियोजन