शाळा | शालेय वेळापत्रक - विषयवार नवीन तासिका विभागणी

शाळेत शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रम राबवत त्यासाठी अनेक प्रकारची वेळापत्रके असली तरी आपल्या वर्ग-वेळापत्रक व शिक्षक-वेळापत्रक यांचा विचार करावयाचा आहे. वेळापत्रक हे शाळेचे घड्याळ आहे. त्याप्रमाणे काम काटेकोरपणे वालले तर शाळेतील कार्यक्रम यशस्वी होतात. वर्ग-वेळापत्रक व शिक्षक-वेळापत्रक हे ज्येष्ठ शिक्षक पर्यवेक्षक तयार करतात. परंतु मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून पुढील गोष्टी निश्चित करवून घ्याव्यात…

शाळा वेळापत्रक | शालेय वेळापत्रक | School Time table


वेळापत्रक समिती - शाळा वेळापत्रक /शालेय वेळापत्रक

वेळापत्रक समिती वेळापत्रक तयार करण्यासाठी प्रत्येक शाळेत समिती असते. शिक्षकांचे वेळापत्रक व वर्गांचे वेळापत्रक  करताना दोन-तीन महत्त्वाच्या सूचना मात्र लक्षात घ्याव्यात. शिक्षकास शक्यतो प्रशिक्षणाचे विषयच शिकविण्यासाठी यावेत. जेथे हे शक्य नसेल तेथे मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षकास विश्वासात घेऊन वेगळा विषय शिकविण्यास यावा. मात्र पूर्वतयारीसाठी साहित्य पुरवावे. तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाची सोय करावी. मातृभाषेतील व्याकरण विषयासाठी स्वतंत्र तासिकेची तसेच शिक्षकांची सोय करावी. क्रीडांगण शाळेपासून दूर असल्यास व्यायाम व खेळांच्या तासिकांची योजना शाळेच्या वेळाव्यतिरिक्त करावी;  विद्याथ्र्यांच्या सोयीची असावी.
वर्गवेळापत्रके व शिक्षक वेळापत्रके हा शाळेतील शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे त्रोटक (Sketchy) वार्षिक नियोजन करू शकतो. काही शाळांत प्रत्येक महिन्याचे सविस्तर अध्यापन नियोजन करवून घेण्याची प्रथा आहे. यासाठी त्यांना सविस्तर नोंदवह्या देण्यात येतात. त्या महिनाअखेरीस मुख्याध्यापकाकडे सादर करावयाच्या असतात. जिल्हा मुख्याध्यापक संघ यात विशेषत्वाने पुढाकार घेऊन असे नियोजनाचे कार्य हाती घेऊ शकेल व छापील स्वरूपात ते देऊ शकेल.

वेळापत्रके - वर्ग-वेळापत्रक व शिक्षक-वेळापत्रक

शाळेत शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रम राबवत त्यासाठी अनेक प्रकारची वेळापत्रके असली तरी आपल्या वर्ग-वेळापत्रक व शिक्षक-वेळापत्रक यांचा विचार करावयाचा वेळापत्रक हे शाळेचे घड्याळ आहे. त्याप्रमाणे काम काटेकोरपणे वालले तर शाळेतील कार्यक्रम यशस्वी होतात.

वर्ग-वेळापत्रक व शिक्षक-वेळापत्रक हे ज्येष्ठ शिक्षक किवा पर्यवेक्षक तयार करतात. परंतु मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून गोष्टी निश्चित करवून घ्याव्यात

  • साधारणपणे ३५ मिनिटांचा एक अशा तासिका आठवड्याची व दिवसांची संख्या.
  • मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच तासांची संख्या.
  • विषय-शिक्षक व त्यांना द्यावयाच्या विषयांची विषयांना असणाऱ्या तासिकांची संख्या.
  • कोणत्या विषयांना जोडून तासिका द्यायच्या ह्याची निश्चिती.
  • अभ्यासपूरक उपक्रमांची, सांस्कृतिक काम पाहणा शिक्षकांना कोणते तास मोकळे द्यायचे याची निश्चिती.
  • खेळांचे तास साधारण कोणत्या वेळी व किती निश्चिती.
  • कार्यानुभव, चित्रकला, हस्तकठी, शास्त्र या विषयांसाठी विशेष वर्गखोल्या किती व कोणकोणत्या वर्गांना तेथे न्यावयाचे याची निश्चिती. एकदा तरी त्या वर्गानी तेथे नेता येईल असा विचार करावा.

 मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तासिका विभागणी संपूर्ण माहिती  👉  तासिका संख्या

यांची निश्चिती झाल्यावर वेळापत्रक तयार करताना खाली घटकांचा गोष्टींचा विचार करावा. अर्थात ही काही तत्त्वे आदर्श जी असली तरी प्रत्यक्षात त्यांचा सर्वांनाच उपयोग करता येईल असे नाही. शेवटी वर्गखोल्या, शिक्षकांची संख्या, त्यांचा शैक्षणिक दर्जा, इत्यादींचा तसेच त्या त्या परिसरात कोणती परिस्थिती आहे याचा विचार करून तडजोड करावी लागतेच हे खरे. पण या तत्वांची किमान माहिती असावी व शक्य होईल तोवर त्यांचा वापर करावा.

  • साधारणपणे गणित, शास्त्र, इंग्रजी हे विषय बौद्धिकदृष्ट्या अवघड समजले जातात. ह्या विषयांचे तास सुरुवातीला असावे, त्यातल्या त्यात दुसरा तिसरा असावा.
  • लागोपाठ कठीण विषय नसावेत. कठीण विषयानंतर कृतिशील असे तास असावेत.
  • प्रयोग, हस्तकला, चित्रकला यांना जोडून दोन तास असावेत.
  • शिक्षकांनाही लागोपाठ तास न देता त्यांना दोन तासानंतर मोकळा तास मिळेल असे पाहावे.
  • वेगवेगळ्या वर्गांना वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती कशी करावयाची याची काही मार्गदर्शक तत्त्वे वेळापत्रके करण्यापूर्वी निश्चित केली जावीत म्हणजे एकंदरीत कार्य विभागणीत वस्तुनिष्ठता येते.

शाळा वेळापत्रक / शालेय वेळापत्रक - काही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे देता येतील : 

  • पदवीचा विषय व अध्यापन पद्धती यांनुसारच विषयाचे अध्यापन देण्यात यावे.
  • दहावीचे वर्ष हे शालांत परीक्षेमुळे महत्त्वाचे ठरते. शालांत परीक्षेच्या निकालांना शाळेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने समाजामध्ये अजूनही महत्त्व दिले जाते याकडे डोळेझाक करता येणार नाही. यासाठी शाळेतील अनुभवी व चांगल्या शिक्षकांना या वर्गाच्या तासिका प्रथम याव्यात. शालांत परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा अनुभव असलेल्या किंवा त्या परीक्षेचे प्राश्निक असलेल्या शिक्षकांना त्यातल्या त्यात ह्या वर्गासाठी प्राधान्य द्यावे.
  • विद्याथ्र्यांची जर गुणवत्तेप्रमाणे तुकड्यांमध्ये विभागणी केली असेल तर उच्च गुणवत्तेच्या तुकड्यांना चांगले शिक्षक अशी विभागणी करण्याकडे कल असतो. परंतु अशा शिक्षकांची खरी गरज मागे पडलेल्या विद्यार्थ्यासाठी अधिक असते. त्यांच्या कार्यक्षमतेचा लाभ कच्च्या विद्यार्थ्यांनाही होऊ द्यावा. मात्र याचबरोबर काळजी घेतली पाहिजे की नवख्या, अननुभवी व कच्च्या शिक्षकांना उच्च गुणवत्तेच्या वर्गाना शिकविण्यास सांगू नये. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता असते. ठरावीक वर्गाना शिकविण्याच्या अनुभवापेक्षा कमी जास्त गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा वैविध्यपूर्ण अनुभव आपल्या सहकाऱ्यांना देणे हे तसे इष्टच ठरेल. 
  • इयत्ता ५वी ते ७वी (व आता आठवीपर्यंत) हा उच्च प्राथमिक स्तर मानला जातो. या ठिकाणी शासकीय नियमानुसार प्रशिक्षित पदवीधर व डी.एड्. शिक्षकांचे प्रमाण निश्चित आहे. ५वीच्या वर्गात नवीन विद्यार्थी येत असल्याने त्यांच्या तयारीसाठी काही चांगले अध्यापक इयत्ता ५वीस आवर्जून नियुक्त करावेत.
  • वरील मार्गदर्शक तत्त्वांच्या चौकटीत शिक्षकांनी विशिष्ट वर्ग व विषयाचे प्राधान्य दिले असेल तर व जर ते देता येणे शक्य असेल तर ते देण्याचा जरूर प्रयत्न करावा.

वेळापत्रके तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती प्राप्त झाल्यावर पूर्वनिश्चित मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष वेळापत्रके तयार करण्याच्या पायऱ्या थोडक्यात पुढील प्रमाणे मांडता येतील.

  • वेळापत्रके तयार करण्यासाठी उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षकांचे सहकार्य घेणे अपरिहार्य आहेच. मात्र तशी पदे नसतील तर कमीत कमी तीन ज्येष्ठ शिक्षकांचा सहभाग आवश्यक ठरतो.
  • वेळापत्रक तयारीसाठी पूरक म्हणून प्रथम कोणते शिक्षक कोणता विषय कोणत्या वर्ग व तुकडीस शिकविणार त्याच्या आठवड्याच्या तासिका किती हे दर्शविणार तक्ता तयार करता येऊ शकेल.
  • शिक्षकांचे वेळापत्रक व वर्गांचे वेळापत्रक तया करण्यासाठी दोन स्वतंत्र शिक्षकांकडे बैठकीत जबाबदारी सोपवावी.
  • प्रयोगशाळा, चित्रकलां, इत्यादींसाठी जोडतास प्रथम वेळापत्रकात टाकावेत. या सुविधांचा सर्वच वर्गाना आठवड्यातून एकदा तरी लाभ होईल हे पहावे.
  • समाजसेवा, शारीरिक शिक्षण कार्यानुभव, इत्यादी कृतियुक्त विषय मधल्या सुट्टीनंतरच्या काळात टाकावेत. एकाच वर्गावर सलग या गटातील चार तास येणार नाहीत हेही पहावे.
  • शिक्षकांना (विशेषतः ज्या विषयांच्या शिक्षकांना सातत्याने बोलावे लागते उदाहरणार्थ, भाषाविषय) दीन तासानंतर रिकामी तासिका (Off Period) ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • पहिला तास किंवा विशिष्ट तास ४० मिनिटांचा (५मिनिटे अधिक) ठेवून वर्गशिक्षकांना तो द्यावा. त्या काळात ते प्रशासकीय व संपर्ककार्ये करू शकतील. 
  • शिक्षकांच्या कार्याची विभागणी करत असताना शेवटी काही फेरफार, अदलाबदल करावा लागतोच. अशावेळी मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीतही तडजोड करावी लागते. अशा तडजोडी कमीत कमी व अपरिहार्य तितक्याच कराव्यात.
  • शाळेचे वेळापत्रक शक्यतो शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शिक्षकांना द्यावे म्हणजे दुसऱ्याच दिवसापासून सर्व विषयांच्या तासिका नियमितपणे सुरू होऊ शकतील.

"वेळापत्रक हे कामाची निश्चित दिशा दाखवते. त्याचा योग्य उपयोग करवून घ्यावा लागतो. वेळापत्रक हे आपल्यासाठी आहे. त्याचा उपयोग करताना लवचीकता ठेवावी. मराठीचा तास एका शिक्षकाचा आहे पण कवितेला चाल लावून देणारे शिक्षक वेगळे आहेत ..तर आपला तास तेवढ्यापुरता बदलायला हरकत नाही."

 

एकत्रित, बहुव्यापी वार्षिक नियोजनाच्या अंतिम आराखड्याची निश्चिती

वर्गवळापत्रकेशिक्षकवेळापत्रके हा शाळेतील शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे त्रोटक (Sketchy) वार्षिक नियोजन करू शकतो. काही शाळांत प्रत्येक महिन्याचे सविस्तर अध्यापन नियोजन करवून घेण्याची प्रथा आहे. यासाठी त्यांना सविस्तर नोंदवह्या देण्यात येतात. त्या महिनाअखेरीस मुख्याध्यापकाकडे सादर करावयाच्या असतात. जिल्हा मुख्याध्यापक संघ यात विशेषत्वाने पुढाकार घेऊन असे नियोजनाचे कार्य हाती घेऊ शकेल व छापीठ स्वरूपात ते देऊ शकेल.


बहुव्यापी नियोजनात ४ अंगांची एकत्र गुंफण होऊ शकते.
(१) शिक्षक व वर्ग वेळापत्रकानुसार दैनंदिन अध्यापनाचे नियोजन 
(२) या शैक्षणिक कार्यक्रमांशी सांगड घातलेल्या व वेळोवेळी नियमित किंवा प्रासंगिक रुपाने घेतल्या जाणाऱ्या अभ्यासपूरक कार्यक्रमांचे नियोजन 
(३) शालेय चाचणी परीक्षा, शालाबाहय परीक्षा, मूल्यमापनाचे नियोजन व 
(४) तद्अनुषंगाने येणारे प्रशासकीय व आर्थिक तरतुदींचे नियोजन.
यापैकी वर्ग व शिक्षक वेळापत्रके आपण उपलब्ध करून देतोच, परंतु परीक्षा, मूल्यमापन व अभ्यासपूरक कार्यक्रमांचे वार्षिक नियोजन विद्यार्थी दैनंदिनीतून किंवा चक्रमुद्रांकित स्वरूपात प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येक शिक्षकाची तसेच विद्यार्थी/ यांची नेमकी काय असावी हे त्यात स्पष्ट हवे.

पूरक प्रशासकीय व आर्थिक तरतुदीविषयक नियोजन हे केवळ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक यांच्याकडेच राहील. त्यानुसार योग्य ती कार्यवाही आपणास स्वतःला किंवा संबंधित सहायकास करता येऊ शकेल. हे बहुव्यापी नियोजन आपल्या कार्यालयात सहजासहजी दिसेल अशा स्वरूपात आपण लावू शकाल किंवा टेबलावर काचेखाली सहजगत्या पाहता येईल अशा रितीने ठेवू शकाल. त्यामुळे कोणती गोष्ट केव्हा करावयाची हे लागलीच आपल्या लक्षात येऊ शकेल.


इयत्ता १ ली ते १० वी सर्व वर्गांसाठी विषयवार नवीन तासिका विभागणी - शाळा वेळापत्रक

संदर्भ-

  1. विद्या प्राधिकरणाचे दिनांक २८ एप्रिल, २०१७ चे पत्र
  2. दिनांक १८ जुलै २०१७ रोजी मा. मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचे इतिवृत्त
  3. दिनांक २३ ऑगस्ट, २०१७ रोजीचे बैठकीचे इतिवृत्त.

उपरोक्त विषयान्यये दिनांक २८ एप्रिल, २०१७ रोजी इयत्ता १ ली ते ८ वी करिता विषयावर तासिका विभागणीबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. सदर परिपत्रकातील तासिका विभागणीत अंशतः बदल करण्यात येत आहे. सदर परिपत्रक सन २०१७-१८ च्या द्वितीय सत्रापासून लागू करण्यात येत आहे. 

१) इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका राहील.

२) एका वर्गाचा आठवडयाचा एकूण कार्यकाल पुर्वी २६.४५ मि. होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर कार्यकाल २७.१० मि. होईल त्यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल.

३) दिनांक २८ एप्रिल, २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरुवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशीचा परिपाठ १० मिनिटांचा राहील.

४) सुधारीत परिपत्रकानुसार शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिकां ३० मिनिटांची राहील.

५) शनिवारी ५ तासिकांऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात. पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटांची राहील.

६) सुधारीत वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका हया कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात.

"विषयवार नवीन तासिका विभागणी"

📘 विषयवार नवीन तासिका विभागणी (शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून)
अ.क्र. विषय इ. ५ वी इ. ६ वी ते ८ वी इ. ९ वी व १० वी
1 प्रथम भाषा 6 6 6
2 व्दितीय/संयुक्त भाषा 6 6 6
3 तृतीय भाषा 7 6 7
4 गणित 8 7 7
(बीजगणित+भूमिती)
5 विज्ञान आणि तंत्रज्ञान 12 7 8
6 सामाजिक शास्त्र --- 6 7
(अ) इतिहास व रा.शास्त्र - ४, (ब) भूगोल - ३
7 कार्यशिक्षण 3 2 ---
8 कला 3 4 ---
9 आरोग्य व शारीरिक शिक्षण 3 4 3
10 जलसुरक्षा --- --- 2
11 संरक्षण शास्त्र / MCC / स्काउट गाईड / RSP / NCC --- --- 2
एकूण 48 48 48

📝 संदर्भ: परिपत्रक विप्रा/अविवि/ता.दि./२०१७-१८/३६०५ (दि. ५/१०/२०१७) व परिपत्रक मराशैसंप्रप/इ.१० वी विषय योजना व मूल्यमापन/२०१८-१९/२७३३ (दि. १४/०६/२०१८) - महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे.

🌐 www.schooledutech.in



नविन वेळापत्रक व "विषयवार तासिका विभागणी" pdf

या आगोदर आपण 45 तासिकांचे वेळापत्रक वापरत होतो परंतु 28 एप्रिल 2017 नंतर एक सुधरित परिपत्रक आले. या परिपत्रकानुसार 48 तासिका होणे बंधनकारक आहे. सोमवार ते गुरुवार 8 तासिका, शुक्रवार 9 तासिका तर शनिवार 7 तासिका होणे बंधनकारक असून त्यानुसारच वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. या सुधारित परिपत्रकाप्रमाणे विषयवार / विषयानुसार तासिका विभागणी व संदर्भ परिपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या योग्य त्या शिर्षक links चा वापर  करा.


    विषया नुसार तासिका विभागणी pdf
    Download PDF
    परिपत्रक १ तासिका विभागणी सन २०१७-१८ पासून दि.२७-०४-२०१७ pdf
    Download PDF
    परिपत्रक २ तासिका विभागणी १ली ते १०वी सुधारित तासिका दि.५-१०-२०१७ pdf
    Download PDF
    परिपत्रक ३ तासिका विभागणी सन २०१८-१९ पासून दि.१४-०६-१८ pdf
    Download PDF

    खाली दिलेल्या लिंक वरून नमुना वेळापत्रक डाउनलोड करा.

    शाळा /शालेय वर्ग वेळापत्रक नमुना 1 pdf
    Download PDF
    शाळा /शालेय वर्ग वेळापत्रक नमुना 2 pdf
    Download PDF
    शाळा /शालेय वर्ग वेळापत्रक नमुना 3 pdf
    Download PDF
    शाळा /शालेय वर्ग वेळापत्रक नमुना 4 pdf
    Download PDF
    शाळा /शालेय वर्ग वेळापत्रक नमुना 5 pdf
    Download PDF

    FAQ-
    1. शाळा वेळापत्रक/ शालेय वेळापत्रक कोण तयार करते?
    उत्तर- शाळा वेळापत्रक/ शालेय वेळापत्रक, वेळापत्रक समिती तयार करते.
    2. शाळा वेळापत्रक / शालेय वेळापत्रक समितीमध्ये कोण सदस्य असतात?
    उत्तर- शाळा वेळापत्रक/ शालेय वेळापत्रक समिती मध्ये पर्यवेक्षक, जेष्ठ व अनुभवी शिक्षक हे सदस्य असतात.
    3. शाळा वेळापत्रकात  / शालेय वेळापत्रकात  विषयानुसार तासिका विभागणी कश्यानुसार केली जाते?
    उत्तर- शाळा वेळापत्रकात  / शालेय वेळापत्रकात  विषयवार तासिका विभागणी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शालेय विभागांच्या परिपत्रक , सूचना वा आदेशानुसार केली जाते.
    4. शाळा वेळापत्रकाचे   / शालेय वेळापत्रकाचे प्रकार कोणते?
    उत्तर- शाळेत शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रम राबवत त्यासाठी अनेक प्रकारची वेळापत्रके असली तरी आपल्या वर्ग-वेळापत्रक व शिक्षक-वेळापत्रक हे दोन महत्वाचे प्रकार आहेत.

    वार्षिक नियोजन | मासिक नियोजन | दैनंदिन नियोजन


    Maharashtra State Educational WhatsApp Group

    www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

    -शाळा-शालेय-वेळापत्रक

    🏷️ Tags:

    #इयत्ता1ली #पहिलीचे #दुसरीचे #तिसरीचे #चौथीचे #पाचवीचे #सहावीचे #सातवीचे #आठवीचे #नववीचे #दहावीचे #1लीचे #2रीचे #3रीचे #4थीचे #5वीचे #6वीचे #7वीचे #8वीचे #9वीचे #10वीचे #नवीन #शाळावेळापत्रक #शालेयवेळापत्रक #वर्गवेळापत्रक #शिक्षकवेळापत्रक #इयत्तानुसार #विषयवार #विषयानुसार #तासिकाविभागणी #Class #TheFirst #Second #Third #Fourth #Fifth #Sixth #Seventh #Eighth #Ninth #Tenth #1th #2nd #3rd #4th #5th #6th #7th #8th #9th #10th #New #SchoolTimeTable #SchoolSchedule #ClassTimeTable #TeacherTimeTable #Subjectwise #PeriodwiseDivision #शाळा-वेळापत्रक-विषयवार-तासिका-विभागणी #शाळा-वेळापत्रक #शिक्षक-वेळापत्रक #varg-velapatrak #shala-velapatrak #shaley-shala-velapatrak #शाळेचेवेळापत्रक

    Post a Comment

    If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

    Previous Post Next Post