नमस्कार शिक्षक मित्र आपल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर सदर लेख शेअर करावेत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अधिक उत...
दहावी बोर्ड परीक्षा | महत्वाच्या टिप्स
दहावी, बारावी परीक्षांची वेळ पाळा; उशीर टाळा
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर राहावे, उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, अशी ताकीदच शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. याची मंडळाने दखल घेतली व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पत्रक जारी केले आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश मिळणार नाही.
परीक्षेच्या वेळेबाबत संभ्रम नको
■ इयत्ता दहावी-बारावी परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्र देण्याची प्रक्रिया
सुरु मंडळाकडून सुरु झालेली आहे.
■ मात्र प्रवेशपत्रावर सकाळच्या सत्रात होणाऱ्या परीक्षेची वेळ १०.३० नोंदवलेली असून, हीच वेळ मंडळामार्फत प्रसिद्ध झालेल्या सकाळी ११ वाजता नोंदविण्यात आलेली आहे.
■ याचप्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये होणाऱ्या पेपरसाठी प्रवेशपत्रावर अडीचची वेळ असून, प्रसिद्ध वेळापत्रकात तीनची वेळ दिलेली आहे.
■ दरम्यान, राज्य मुख्याध्यापक महामंडळाने केलेल्या मार्गदर्शनानुसार, कॉपीमुक्त अभियान उपाययोजनेतील एक उपाय म्हणून परीक्षेच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास अगोदर विद्यार्थी परीक्षागृहात असणे बंधनकारक आहे.
■ या नियमानुसारच प्रवेशपत्रावरील वेळ आणि छापील वेळापत्रकातील वेळ यांत तफावत दिसत आहे. मात्र ती नियमानुसारच आहे.
ही काळजी घ्या
- प्रवेशपत्रावर संबंधित परीक्षार्थीने निवडलेला विषय, त्या विषयाचा संकेतांक, परीक्षेचा दिनांक आणि वेळ नोंदवलेली आहे. या नोंदीच्या अनुक्रमाचा विचार न करता नियोजित दिवशी दिलेल्या विषयाची परीक्षा होणार आहे असा अर्थ घेणे अपेक्षित आहे.
- प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका प्राप्त होण्याअगोदर उत्तरपत्रिकेशी निगडित सर्व कामे सूचनेनुसार पूर्ण करावीत आणि उत्तरपत्रिकेतील पृष्ठ क्रमांक दोनवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- याशिवाय नियोजित दोन किंवा तीन तासांच्या वेळेत प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचावी. यामुळे कोणते प्रश्न आलेले आहेत व किती प्रश्न सत्र परीक्षा, सराव परीक्षा व वैयक्तिक प्रॅक्टिसच्या वेळी सोडवलेले आहेत याचे स्मरण होते व त्यांची उत्तरे आठवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि उत्तरपत्रिका लेखनासाठी आवश्यक आत्मविश्वास निर्माण होतो.
उत्तरे लिहितानाही काही नियम पाळा!
दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये अचूक उत्तर लिहिण्याबरोबरच, त्याचे सादरीकरण हे परीक्षकांच्या अपेक्षानुसार असेल याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी आणि त्यासाठी उत्तरपत्रिका लेखनाचे काही नियम ही पाळायला हवेत.
उत्तरपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न असे सर्वसाधारण तीन प्रकार असतात. वस्तुनिष्ठ प्रश्नात एक अक्षर किंवा एक शब्द एवढेच लेखन अपेक्षित असते तर लघुत्तरी प्रश्नात एक किंवा दोन वाक्यांची अपेक्षा असते. दीर्घोत्तरी प्रश्नात मात्र आठ ते दहा ओळी किंवा त्यापेक्षाही जास्त लेखन गरजेचे असते. हे लेखन करत असताना त्यातील महत्त्वाचे नियम, तत्त्वे, मूलभूत संकल्पना जशाच्या तशा शब्दात येणे अपेक्षित आहे, त्यात स्वतःची भाषा वापरणे योग्य नाही. तसेच वर्णनात्मक किंवा विश्लेषणात्मक लेखनात मात्र हे स्वातंत्र्य घेता येते. पेपर तपासणाऱ्या व्यक्तीसाठी आणि एकूणच तपासणी प्रक्रियेसाठी ज्या सूचना महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये प्रत्येक प्रश्न, त्याचा उपप्रश्न आणि पुढील उपघटक याचा बिनचूक उल्लेख असणे आवश्यक आहे. अन्यथा उत्तर बरोबर असले; पण त्याचा क्रम चुकीचा असेल तर गुण मिळणार नाहीत..
■ प्रत्येक नवीन प्रश्न नव्या पानावर प्रारंभ करावा.
■एका प्रश्नाचे उत्तर पूर्ण झाल्यावर पूर्ण आडवी रेष ओढून पुढील लिखाण करावे.
■ ज्या महत्त्वाच्या बाबी पेपर तपासनिसाच्या निदर्शनास यावे असे वाटते ते शब्द अधोरेखित करावे.
■ वेळेचे नियोजन करताना वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरीमध्ये वाचलेला वेळ आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी वापरता येतो. अंदाजे त्याचे गणित निश्चित करून प्रत्येक अर्ध्या तासानंतर तेवढी उत्तर पत्रिका लिहून पूर्ण झाली आहे का, हे पाहणे गरजेचे आहे.
■ गणित आणि विज्ञानासारख्या विषयात पहिल्या प्रश्नात सर्वच घटक बंधनकारक असतात. पुढील प्रश्नात दीर्घोत्तरी लेखनात देखील काही ठिकाणी नेमके शब्द अत्यंत महत्त्वाचे असतात
■ सध्या बदललेल्या प्रश्नपत्रिकाच्या स्वरुपात कृतीपत्रिका दिल्या जातात. यात देखील नेमके शब्द लिहिणे महत्त्वाचे असते.
■ स्टेशनरी दुकानात मंडळाच्या नमुना उत्तरपत्रिका मिळतात त्याचा सरावासाठी वापर केल्यास एकूण पेपरचा आकार, एका ओळीमध्ये किती अक्षरे बसतात याचा अंदाज येतो आणि तसे मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळवता येते. तसेच यापूर्वी झालेल्या बोर्ड पेपरच्या मॉडेल उत्तरपत्रिकाही देखील उपलब्ध होतात. त्याचा अभ्यास करून नेमके कोणते मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे.
आदर्श उत्तरपत्रिकेसाठी महत्वाच्या टिप्स
सर्वच हुशार, मेहनती विद्यार्थ्यांना स चांगले गुण मिळतात. परंतु, विद्यार्थ्यांतही एक सर्वोत्तम विद्यार्थी ठरतो. ज्याला सर्वाधिक गुण प्राप्त होतात. ते त्यांनी केलेला सूत्रबद्ध, सुनियोजित पद्धतीचा अभ्यास आणि त्यांनी लिहिलेली वैशिष्ट्यपूर्ण आदर्श उत्तरे याच्या जोरावर.
आदर्श व अचूक उत्तरे लिहिणे ही एक कला आहे आणि योग्य सरावाने तुम्ही ही कला साध्य करू सकता. सध्याचे जग हे प्रेझेंटेशनचे (सादरीकरण) आहे. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये करार, चर्चा, बैठकांमध्येही प्रेझेंटेशनला फार महत्त्व आहे. ज्याच्याकडे प्रेझेंटेशन चांगले तो यशस्वी. हा आजचा मंत्र आहे आणि तुम्ही तर जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याची परीक्षा देत आहात, मग येथेही तुमचे प्रेझेंटेशन म्हणजेच तुमच्या उत्तराचे सादरीकरणच तुम्हाला यश देणारे आहे. तुम्हाला विषयाचे किती आकलन झालेले आहे हे तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहिलेल्या उत्तरावरून परीक्षकांना समजणार आहे. उत्तराची योग्य व समर्पक मांडणी केली गेली तर इतरांपेक्षा हमखास जास्त गुण तुम्हाला मिळणार आहेत. उत्तरे नेहमी ठराविक साच्यात लिहावी की जेणेकरून तुम्हाला काय नेमके म्हणायचे आहे हे परीक्षकांना सहज कळेल. प्रत्येक उत्तराचे प्रामुख्याने ३ भाग करणे जरुरीचे आहे.
१) प्रस्तावना, २) स्पष्टीकरण, ३) सारांश
हुशारी समजेल
१) प्रस्तावना : प्रस्तावना करताना तुम्ही त्या प्रश्नाची पार्श्वभूमी विशद केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न किती समजला आहे हे कळून येईल. प्रस्तावना ही थोडक्यात लिहा. प्रस्तावनेत तुमच्या • उत्तराला साजेसा असा समर्पक सुविचार, काव्यपंक्ती याचा वापर करा की जेणेकरून इतरांपेक्षा तुमचे उत्तर अधिक आकर्षक होऊन तुमची हुशारी निदर्शनास येईल आणि तुमच्या अभ्यासपूर्ण उत्तराला हमखास जास्त गुण मिळतील.
Image Credit Lokmat |
सर संयुक्त मराठी विषयाच्या तयार नोट्स असतील तर कृपया पाठवा
उत्तर द्याहटवा12 च्या इंग्लिश चे नोट्स भेटतील का
उत्तर द्याहटवाThanks सर, आपलीं खुप मदत झाली.
उत्तर द्याहटवा