-->

इयत्ता दहावी मराठी व्याकरण | Class X Marathi Grammar

इयत्ता नववी व दहावीच्या व्याकरण व उपयोजित लेखन या विभागातील सर्व घटकांचे विस्तृत विश्लेषण या ठिकाणी दिले आहे. काव्यसौंदर्य व रसग्रहण या घटकांचा कृतींसह यामध्ये समावेश केला आहे. पहिली ते आठवीच्या व्याकरणाची उजळणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती आहे. प्रत्येक घटकातील संकल्पनांचे महत्त्वाच्या टिपांसह स्पष्टीकरण दिले आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी भरपूर कृतींचा यामध्ये समावेश केला आहे. स्वमताच्या प्रश्नांबद्दल विशेष मार्गदर्शन यामध्ये केले आहे. अभ्यास कसा करावा, आदर्श उत्तरे कशी लिहावीत याविषयी महत्त्वाच्या टिपांचाही यामध्ये समावेश केला आहे. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय सोपा करून सांगणारे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रयत्न !

इयत्ता दहावी मराठी व्याकरण | Class X Marathi Grammar
इयत्ता दहावी मराठी व्याकरण | Class X Marathi Grammar

दहावी विषय – मराठी व्याकरण

इयत्ता दहावी "मराठी व्याकरण दहावी pdf" नोट्स डाऊनलोड करा.

समास

जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात. 

समासाचे महत्वाचे प्रकार : 

 (१) कर्मधारय समास – या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम यांचा समावेश होऊन एक शब्द तयार होतो. या शब्दांच्या एकीकरणाला कर्मधारय समास असे म्हणतात. 

उदा : सामासिक शब्द       विग्रह 
          नीलकमल              नील असे कमल 
          महाराष्ट्र                  महान असे राष्ट्र
          नरसिंह                   सिंहासारखा नर

(२) द्वंद्व समास – या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्व देण्यात येतो. जेव्हा समान प्राधान्य असलेले दोन शब्द एकत्र येऊन नविन जोडशब्द तयार होतो तेव्हा त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. या समासाचे तीन प्रकार पडतात. 

(१) इतरेतर द्वंद्व समास : 
उदा : सामासिक शब्द         विग्रह 
         आईवडील                 आई आणि वडील 
         रामलक्ष्मण                राम आणि लक्ष्मण 

(२) वैकल्पिक द्वंद्व समास :
उदा : सामासिक शब्द           विग्रह 
       खरेखोटे                    खरे किंवा खोटे 
       बरे वाईट                   बरे किंवा वाईट

(३) समाहार द्वंद्व समास :
 उदा : सामासिक शब्द          विग्रह 
           गप्पा गोष्टी                गप्पा, गोष्टी वगैरे
          मीठ भाकर                मीठ, भाकर वगैरे

(३) द्विगू समास  : या समासामध्ये पहिले पद हे संख्याविशेषण असते. म्हणुनच या समासाला द्विगू समास म्हणतात. 
उदा : सामासिक शब्द          विग्रह 
        नवरात्र                       नऊ रात्रींचा समूह
        चौकोन                       चार कोनांचा समूह

शब्दसिद्धी 

भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात.

शब्दसिद्धीचे प्रकार :

(१) उपसर्गघटित शब्द : 
 मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात, त्यांना उपसर्गघटित शब्द म्हणतात.
आधी लागणा-या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात.

उदा : उपसर्ग          +    मूळ शब्द     = उपसर्गघटित शब्द 
    (१) सु                +      विचार        = सुविचार 
    (२)गैर                +      समज        =  गैरसमज
    (३) यथा             +      शक्ती         =  यथाशक्ती
    (४) गैर               +      समज        = गैरसमज 

(२) प्रत्ययघटित शब्द : 
 मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात. 
नंतर लागणा-या शब्दांना प्रत्यय म्हणतात.
उदा : मूळ शब्द    +    प्रत्यय       = प्रत्ययघटित शब्द 
 (१)     रस           +    इक          =  रसिक
 (२)   बुद्धि           +  मान           = बुद्धिमान 
(३) दुकान            +  दार            = दुकानदार 
(४) माणूस           + की              = माणूसकी 

(३) अभ्यस्त शब्द  : 
एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावुत्ती होणे, अशा प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात. 
उदा : (१) पूर्णाभ्यस्त – क्षणक्षण, जवळजवळ
         (२) अंशाभ्यस्त – आसपास, उभाआडवा
         (३) अनुकरणवाचक – कडकड, बडबड

Tags
"मराठी व्याकरण दहावी pdf"
"संपूर्ण मराठी व्याकरण"
"इयत्ता दहावी हिंदी व्याकरण"
"मराठी व्याकरण पुस्तक"
"समास मराठी व्याकरण 10 वी"
"समासाचे प्रकार व उदाहरणे"
मराठी व्याकरण दहावी pdf
संपूर्ण मराठी व्याकरण
इयत्ता दहावी हिंदी व्याकरण
मराठी व्याकरण पुस्तक
समास मराठी व्याकरण 10 वी
इयत्ता दहावी विषय मराठी व्याकरण creative math marathi
समासाचे प्रकार व उदाहरणे
मराठी व्याकरण पुस्तक
समास मराठी व्याकरण 10 वी
समासाचे प्रकार व उदाहरणे

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या नोट्स
इयत्ता दहावी सर्व विषय बोर्ड परीक्षा महत्वाचे नोट्स
दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स
Class-X-all-subjects-Important-Notes
-इयत्ता-दहावी-सर्व-विषय-महत्वाच्या-नोट्स
*इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या टिप्स, नोट्स | Class X Board Exam Important Tips, Notes*
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर सदर लेख शेअर करावेत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अधिक उत्तम उत्तर पत्रिका लेखन होण्यासाठी वरील सूचनांचा वापर करावा ही विनंती..
*इयत्ता दहावी SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विषय महत्वाच्या नोट्स*

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >