-->

इयत्ता दहावी समाजशास्र | इतिहास | भूगोल महत्वाच्या नोट्स | Social Science | History Geography IMP Notes Pdf

इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंत इतिहास व नागरिकशास्त्र विषयाचे अध्ययन तुम्ही 'परिसर अभ्यास मध्ये केले आहे. इयत्ता सहावीपासून अभ्यासक्रमात इतिहास व नागरिकशास्त्र हे स्वतंत्र विषय आहेत. इयत्ता सहावीपासून या दोन्ही विषयांचा समावेश एकाच पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. इयत्ता दहावीच्या समाजशास्र | इतिहास | भूगोल महत्वाच्या नोट्स तुमच्या हाती देताना आम्हांला आनंद वाटतो.

इयत्ता दहावी समाजशास्र | इतिहास | भूगोल महत्वाच्या नोट्स | Social Science | History - Geography IMP Notes Pdf

इ 10 वी समाजशास्र महत्वाच्या नोट्स | Social Science IMP Notes

इयत्ता दहावी समाजशास्र | इतिहास | भूगोल महत्वाच्या नोट्सचे स्वरूप इयत्ता नववीपर्यंत शिकलेल्या संबोधांची उजळणी करणे असे आहे. ही उजळणी करताना यापूर्वीच्या पाठ्यपुस्तकात शिकलेल्या बाबी तुम्हांला नक्की उपयोगी पडतील. त्या विसरू नका बरे ! बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात भारत आणि ब्राझील दोन देशांची तुलनात्मक वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली आहे, ती तुम्हांला नक्की आवडेल. आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

इयत्ता दहावी समाजशास्र | इतिहास | भूगोल महत्वाच्या नोट्स विषय नीट समजावा, मनोरंजक वाटावा, या हेतूने केलेली आहे. या नोट्सच्या अभ्यासाने ज्ञानाबरोबरच तुम्हांला आनंद मिळावा असे आम्हांला वाटते. त्यासाठी नोट्स लक्षपूर्वक अभ्यासाव्यात. त्यातील जो भाग तुम्हांला समजणार नाही तो भाग शिक्षक, पालक यांच्याकडून समजावून घ्यावा. दिलेल्या चौकटींतील मजकूर तुमच्या ज्ञानात भरच घालेल ! नोट्सचा अध्ययनासाठी निश्चितच उपयोग होईल. समाजशास्र | इतिहास | भूगोल हा विषय रंजक असून तो आपला मित्र आहे, असे समजून ह्या नोट्स अभ्यासले तर तुम्हांला त्याची गोडी निश्चितपणे लागेल.

इ 10 वी इतिहास महत्वाच्या नोट्स | History IMP Notes

आपल्याला माहितच आहे इतिहासाच्या भागात 'उपयोजित इतिहास' दिलेला आहे. इतिहास हा एक कुतुहलाचा विषय आणि छंद म्हणून अनेकांच्या आवडीचा असतो. परंतु तो शालेय अभ्यासक्रमात खरोखरीच किती आवश्यक आहे, यावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास पुढील आयुष्यात विदयार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतील, त्यांनी अंगीकारलेल्या व्यवसायात त्यांना त्या विषयाच्या अभ्यासाचा काही विशेष लाभ होईल का, यासंबंधी अनेकांच्या मनात साशंकता असते. आवश्यक माहिती उपलब्ध नसल्यामुळे ही साशंकता दूर करणे कठीण जाते. ती माहिती या पाठ्यपुस्तकाद्वारे 'इतिहास' या विषयात उपलब्ध आहे. रोजच्या जीवनातील कोणतीही गोष्ट असो, व्यवसायाचे कोणतेही क्षेत्र असो, त्या त्या गोष्टींचा, त्या त्या व्यावसायिक क्षेत्रांच्या विकासाचा स्वतःचा इतिहास असतो. त्या इतिहासाच्या ज्ञानाचा व्यवसायातील कौशल्यवाढीसाठी उपयोग होतो, ही बाब या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात स्पष्ट केलेली आहे.

इ 10 वी राज्यशास्त्र महत्वाच्या नोट्स | Civics IMP Notes

बालभारतीच्या राज्यशास्त्राच्या भागात 'भारतीय संविधानाची वाटचाल' याविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रियेची माहिती, राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील प्रमुख राजकीय पक्ष, त्यांची भूमिका, लोकशाहीला सक्षम करणाऱ्या सामाजिक व राजकीय चळवळी तसेच भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने यांबाबत चर्चा केलेली आहे. या वर्गातील विद्यार्थी लवकरच मतदार होणार आहेत. या नव्या भूमिकेसाठी विदयार्थ्यांना सक्षम करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील आशय उपयुक्त आहे.

इयत्ता दहावी – इतिहास व राज्यशास्त्र – नोट्स👉History - Geography IMP Notes Pdf

इ 10 वी भूगोल महत्वाच्या नोट्स | Geography IMP Notes

दहावीच्या वर्गात तुमचे स्वागत आहे. समाजशास्र | इतिहास | भूगोल महत्वाच्या नोट्स मधील भूगोल विषय तुम्ही इयत्ता तिसरी ते पाचवी परिसर अभ्यासातून, तसेच इयत्ता सहावी ते नववी भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातून शिकला आहात. इयत्ता दहावीसाठी भूगोलाचे नवीन महत्वाच्या नोट्स तुमच्या हाती देताना आनंद वाटतो आहे.

तुमच्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. तुम्हांला सामावून घेणारा निसर्ग ऊन, पाऊस, थंडीच्या रूपाने तुम्हांला सारखा भेटत असतो. अंगाशी खेळणारी वाऱ्याची झुळूक तुम्हांला आल्हाददायक वाटत असते. अशा अनेक नैसर्गिक घटना, निसर्ग इत्यादींचे स्पष्टीकरण भूगोल विषयाच्या अभ्यासातून मिळते. भूगोल तुम्हांला सतत निसर्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. भूगोल विषयात सजीवांचा निसर्गाशी तसेच एकमेकांशी होणाऱ्या आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो.

या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भात अनेक मूलभूत संकल्पना यापूर्वी शिकल्या आहेत. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे अनेक घटक तुम्हांला या विषयातून समजून घेता आले आहेत. त्याचा तुम्हांला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास केला आहे.
हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाशे, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत. ती हाताळण्याचा सराव करा. या पाठ्यपुस्तकातून तुम्हाला ही संधी दिली आहे.

इयत्ता दहावी भूगोल नोट्स👉Geography IMP Notes Pdf

दहावी समाजशास्र | इतिहास | भूगोल | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam IMP Questions

खालील दिल्याप्रमाणे तुम्ही या pdf  डाउनलोड करू शकता आणि दहावी बोर्ड परीक्षा ची तयारी उत्तम प्रकारे करू शकता. त्याचप्रमाणे आपण जसे याठिकाणी समाजशास्र | इतिहास | भूगोल  च्या PDF उपलब्ध  केलेल्या आहेत तशाच इतर  विषयांच्या इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स |  IMP Notes Pdf देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

दिलेल्या PDF चा तुम्हाला काय फायदा होणार आहे?

जर तुम्ही वरील PDF चा अभ्यास करताय तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात माहिती मिळेल. तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Class 10 Social Science History Geography PDF Free To Download. SCERT Educational Study Material. इयत्ता दहावी समाजशास्र महत्वाच्या नोट्स IMP Notes Pdf


Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या नोट्स
इयत्ता दहावी सर्व विषय बोर्ड परीक्षा महत्वाचे नोट्स
दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स
Class-X-all-subjects-Important-Notes
-इयत्ता-दहावी-सर्व-विषय-महत्वाच्या-नोट्स
*इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या टिप्स, नोट्स | Class X Board Exam Important Tips, Notes*
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर सदर लेख शेअर करावेत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अधिक उत्तम उत्तर पत्रिका लेखन होण्यासाठी वरील सूचनांचा वापर करावा ही विनंती..
*इयत्ता दहावी SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विषय महत्वाच्या नोट्स*

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >