मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तासिका विभागणी, तासांची संख्या, अनेक मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक अधिकाराचा वापर करून यातून अंग काढतात. त्यांच्या नावाने असलेल्या तासिका शिक्षकांवर ढकलतात. पहा मुख्याध्यापक यांना किती तासिका असतात?
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षकांना तासिका घेणे बंधनकारक!
२0 पेक्षा अधिक वर्ग असलेल्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांना महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियमावली १९८१ मधील नियम २१(३) नुसार दर आठवड्याला निदान अनुक्रमे ४, ८, व १० तास एवढे शिकविण्याचे काम करावे लागेल. २० किंवा त्यापेक्षा कमी वर्ग असलेल्या शाळेत दर आठवड्याला निदान अनुक्रमे ६ व १२ तास एवढे शिकविण्याचे काम करावे लागेल. असे बंधनकारक आहे. असे शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे; परंतु अनेक मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यातून अंग काढतात. त्यांच्या नावाने असलेल्या तासिका शिक्षकांवर ढकलतात. केवळ वेळापत्रकात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या नावाने तासिका दाखविण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
मुख्याध्यापक यांना किती तासिका असतात?
अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक तासिकाच घेत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियमावली १९८१ मधील नियम २१(३) पालन करणे गरजेचे आहे.
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या विषयांच्या तासिका नियमितपणे घेऊन अध्यापनाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे, वेळापत्रकानुसार कार्य न करणाºया व कार्यात कसूर करणाºया मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांविरुद्ध नियमांतर्गत तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश संबंधित संस्था चालकांना द्यावेत, असेही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
वेळापत्रक - विषयवार नवीन तासिका विभागणी संपूर्ण माहिती 👉 शाळा वेळापत्रक-शालेय वेळापत्रक-School Time table
Maharashtra State Educational WhatsApp Group
- Telegram - School Edutech Telegram
- Google News School Edutech Google News
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तासिका विभागणी
मुख्याध्यापक किती तासिका असतात?
दर आठवड्याला निदान अनुक्रमे ४, ८, व १० तास घ्यावेत.
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचे वेळापत्रकातील तासिका
-मुख्याध्यापक-उपमुख्याध्यापक-पर्यवेक्षक-तासिका-विभागणी