वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 | Varisht - Nivad Shreni Prashikshan 2023-2024 वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण 2023-24 | Senior Pay Grade Selection Grade Training 2023-24
वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण तत्काळ आयोजित करणेबाबत...
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण 2023-24 | Senior Pay Grade Selection Grade Training 2023-24
दि. ३१ मार्च २०२४ रोजी अथवा त्यापूर्वी सेवेचे १२ वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांनी नोंदणी करणे.
Teacher Verification शिक्षक पडताळणी
Senior Grade Training
वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण
(सेवेचे १२ वर्ष पूर्ण असल्यास)
दि. ३१ मार्च २०२४ रोजी अथवा त्यापूर्वी सेवेचे २४ वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांनी नोंदणी करणे.
Teacher Verification शिक्षक पडताळणी
Selection Grade Training
निवड श्रेणी प्रशिक्षण
(सेवेचे २४ वर्ष पूर्ण असल्यास)
यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे- .
1 प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in/ तसेच परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२. दि. ३१ मार्च २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३. दि. ३१ मार्च २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले
प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे.
५. सदरचे प्रशिक्षण है ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर
या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.
६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
- गट क्र. १ - प्राथमिक गट [इ. १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
- गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
- गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे
- गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)
७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ id , शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय. डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ [D] उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईनपोर्टलवर "शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी" हा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.
९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काल येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
१०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येतील.
११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई मेल आयडी वर OTP येईल. सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.
१२. नाव नोंदणी करत असताना आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल.
१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
१४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बँकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.
१७. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.
१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.
१९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आयडीवरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.
२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण पात्रता CLICK HERE
निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पात्रता CLICK HERE
२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.
२२. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.
२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी.
२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in/ हे संकेतस्थळ पहावे.
प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४
२. श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९४
असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सूचित करण्यात आले आहे
वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण परिपत्रक पहा
प्रशिक्षणासाठी SCERT महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद च्या वेबसाईटवर अधिक माहिती साठी click here वर टच करा
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण लिंक
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण 2023-24 संपूर्ण माहिती 👉 शिक्षक नावनोंदणी
दि. ३१ मार्च २०२४ रोजी अथवा त्यापूर्वी सेवेचे १२ वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांनी नोंदणी करणे.
Teacher Verification शिक्षक पडताळणी
Senior Grade Training
वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण
(सेवेचे १२ वर्ष पूर्ण असल्यास)
दि. ३१ मार्च २०२४ रोजी अथवा त्यापूर्वी सेवेचे २४ वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांनी नोंदणी करणे.
Teacher Verification शिक्षक पडताळणी
Selection Grade Training
निवड श्रेणी प्रशिक्षण
(सेवेचे २४ वर्ष पूर्ण असल्यास)