अकरावी प्रवेश प्रक्रिया

 अकरावी प्रवेश प्रक्रिया



अकरावीच्या सीईटीसाठी १९ जुलैपासून नोंदणी सुरू; कशी असेल प्रवेशप्रक्रिया, जाणून घ्या

राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून, १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली.


कशी असेल ही प्रवेशप्रक्रिया?

राज्यातील अकरावीच्या सीईटीसाठीची नोंदणी ऑनलाइन करावी लागेल. १९ जुलैपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि १७० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.

या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल.


या परिक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.

शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीईएसई अशा सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही अकरावीच्या जागा रिक्त राहात असल्याने प्रवेश मिळण्याबाबत समस्या येणार नाही, मात्र प्रवेशाच्या टक्के वारीमध्ये मोठी वाढ झाल्याने कला, वाणिज्य, विज्ञान, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा, त्या जागांसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. हवे ते महाविद्यालय, हव्या त्या शाखेला प्रवेश मिळण्याबाबत काहीशी साशंकता आहे.


*अकरावी प्रवेशाच्या 'सीईटी'साठी सोमवारपासून अर्ज उपलब्ध*                         
सकाळ ऑनलाईन  पुणे :             दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी २३ ऑगस्टपर्यंत स्वतंत्र 'सीईटी' परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून (ता. १९) राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होणार असल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या लेखी परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाचा पेच सोडविण्यासाठी 'सीईटी' परीक्षा घेण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. त्याप्रमाणे आता राज्य मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना 'सीईटी'साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी राज्य मंडळामार्फत मंडळाच्याच संकेतस्थळावर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून 'सीईटी' परीक्षेचा अर्ज ओपन करता येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील. 'सीईटी परीक्षा देण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का' आणि 'सीईटी परीक्षा देण्यासाठी तुम्ही इच्छुक नाही' असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. त्यातील पर्याय निवडून विद्यार्थ्यांना पुढील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी 'सीईटी' परीक्षा विनामूल्य असेल, मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
*'सीईटी' परीक्षेचे वैशिष्ट्ये*

- राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची असेल परीक्षा

- इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे बहुपर्यायी प्रश्न

- राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही

- अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार

- परीक्षेमध्ये मराठीचा पर्याय उपलब्ध नसेल

Students can log in to the official website of board http://cet.mh-ssc.ac.in/

5 Comments

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post