अकरावी CET नोंदणी प्रक्रिया सुरू

अकरावीच्या सीईटीसाठी २० जुलैपासून नोंदणी सुरू

राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे.

२० जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. आता पुढचा टप्पा म्हणजेच इयत्ता अकरावीचे प्रवेश व अर्थातच सीईटी. • सीईटीसाठी प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत

  • २० ते २६ जुलै दरम्यान सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे.
  • सीईटी पोर्टलची लिंक वेबसाइटवर देण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक टाकणे अनिवार्य आहे.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची आहे की नाही, असे दोन पर्याय विचारले जातील.
  • विद्यार्थ्यांनी होय पर्याय जर निवडला तर त्यांना नोंदणी व पुढील कार्यवाही करायची आहे.
  • परीक्षा दिनांक 21 August 2021 (वेळ - स. ११.०० ते १.००)
  • परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने होईल.
  • परीक्षा केंद्रे लवकरच जाहीर करण्यात येतील.
  • सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  • गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या चार विषयांमधील एकूण १०० प्रश्न परीक्षेला विचारले जातील.
  • १०० गुणांच्या या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. 
  • परीक्षा ही ओ. एम. आर. (Optical Mark Recognition) शिटवर घेण्यात येईल.
  • परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ असेल.
  • यासाठी मंडळाकडून स्वतंत्र अभ्यासक्रम निर्गमित केला जाणार आहे.
  • निश्चितच हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पेलवणारा व सोप्या पद्धतीने मांडलेला असेल.
  • सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल.
  • सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर रिक्त जागी सीईटी नदिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
  • हा प्रवेश त्यांच्या इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे दिला जाईल.

विद्यार्थी नोंदणी करिता सदर बोर्डाच्या लिंकचा वापर करावा  http://cet.mh-ssc.ac.in/


11 वी CET परीक्षा | 11वी प्रवेशासाठी CET फॉर्म असा भरा  | CET Exam 11th admission | CET SSC 2020-21

17 Comments

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post