स्वातंत्र्यदिनाचा ७५ व्या वर्धापन दिन
स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम.. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविणार उपक्रम.
#स्वातंत्र्यदिन 2021 व #Independence Day India 2021 या हॅशटॅग ने व्हिडिओ अपलोड करावेत. 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत शासनाने दि. 13 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा उद्देश
1) क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी.
2) विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरूपात आयोजन करावे. यामध्ये पुढील उपक्रम गटनिहाय घ्यावेत.
वृक्षारोपण, अंतर शालेय / अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन.
सहभाग
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी मधील विद्यार्थी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित गटनिहाय कार्यक्रमात सहभागी होतील..
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त गटनिहाय खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
गट पहिला - इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी
कार्यक्रमाचे नाव -
1) वक्तृत्व स्पर्धा
2) एकपात्री अभिनय (वेशभूषासह )
3) राष्ट्रगाण (वेशभूषासह)
4) चित्रकला
राष्ट्रगीत गायन करून प्रमाणपत्र मिळवा.
विषय -
1. माझा प्रिय भारत देश
2. मी तिरंगा बोलतोय
3. माझ्या स्वप्नातील भारत
4. भारतीय ध्वज / माझ्या शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम
5. स्वातंत्र्य लढ्यातील एका थोर सेनानीची वेषभूषा 6. स्वातंत्र्य लढ्यातील कविता
तपशील -
वकृत्व आणि एकपात्री अभिनय (वेशभूषासह) दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर 2 मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.
राष्ट्रगाण पारंपरिक वेशभूषेसह राष्ट्रगीत सादरीकरणाचा व्हिडिओ अपलोड कर
चित्रकला दिलेल्या क्रं.4 च्या विषयावर चित्र काढून रंगविलेल्या चित्राचा फोटो अपलोड करणे.
उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. #स्वातंत्र्यदिन2021 व #Independence DayIndia2021 या HASHTAG (# ) वर upload करावे. तसेच विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, द्वीटर इ. वर upload करावे. प्रत्येक गटात वर्गीनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
गट दुसरा इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी
कार्यक्रमाचे नाव -
1) निबंध लेखन
2. वक्तृत्व
3. स्वरचित कविता लेखन
4. काव्यवाचन
5. देशभक्तीपर गीतगायन
विषय -
1. अहिंसा व स्वातंत्र्यलढा
2. सन 2025 मधील भारत
3. माझ्या नजरेतून माझा भारत 4. भारतीय स्वातंत्र्य लढा
5. स्वातंत्र्य आणि लहान-थोरांचे बलिदान
6. स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधीचे योगदान
7.15 ऑगस्ट 1947
तपशील -
निबंधलेखन दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर 1000 शब्दांपर्यंत A4 आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो हॅशटॅग सह अपलोड करावा.
वक्तृत्व दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा 03 मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.
Telegram Channel जॉईन करा.
स्वरचित कविता लेखन A4 आकाराच्या कागदावर स्वरचित कविता लिहून त्याचा फोटो अपलोड कटावा.
काव्यवाचन / देशभक तीपर गीतगायन - काव्यवाचन आणि देशभक्तीपर गीत गायनसाठी मराठी / हिंदी भाषेतील काव्य / गीत म्हणून त्याचा 03 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा.
उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. #स्वातंत्र्यदिन 2021 व #Independence Day India 2021 या HASHTAG (# ) वर upload करावे. तसेच विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, द्वीटर इ. वर upload करावे. प्रत्येक गटात वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
गट तिसरा इयत्ता नववी ते इयत्ता बारावी
कार्यक्रमाचे नाव -
1. निबंधलेखन
3. व्हिडिओनिर्मिती (Videography)
4. दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह
5. कथाकथन
6. रांगोळी
विषय -
1. भारत एक महासत्ता
2. भारतीय म्हणून माझी जबाबदारी
3. माझ्या स्वातंत्र्य लढ्याचे Real Heroes
4. भारतीय स्वातंत्र्यलढा
5. स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये
6. चले जाव / भारत छोडो (Do or Die) चळवळ
7.75 वा स्वातंत्र्य दिन
तपशील -
निबंधलेखन - दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर 1000 शब्दांपर्यंत A4 आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो हॅशटॅग सह अपलोड करावा. वक्तृत्व दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा 03 मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.
व्हिडिओनिर्मिती दिलेल्या क्रं. 3 किंवा 4 या विषयाशी संबंधित इंटरनेटवरील फोटोंचा वापर करून 03 मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करून अपलोड करावी.
दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निवडक प्रसंगाच्या फोटोचा कोलाज तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.
उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. #स्वातंत्र्यदिन2021 व #Independence Day India 2021 या HASHTAG (# ) वर upload करावे. तसेच विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, द्वीटर इ. वर upload करावे. प्रत्येक गटात वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
Tags:
उपक्रम-Activity