शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह

Thank a Teacher Campaign on the occasion of Teacher's Day

शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन 2020-21 मध्ये 'Thank A Teacher Day' अभियान राबविले होते, 2021-22 यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी 'Thank A Teacher Day' अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरू करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत.

  • अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि.02 सप्टेंबर 2021 ते 07 सप्टेंबर 2021 या कालावधीत Thank A Teacher Day अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
  • राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये Thank A Teacher Day अभियानांतर्गत इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
  • Thank A Teacher अभियानांतर्गत कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरूपात आयोजन करावे.
  • तसेच Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या यांचा गौरव करण्यात यावा.

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत
शिक्षक कार्य गौरव सप्ताह

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रित्यर्थ खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह
thank-a-teacher-campaign-occasion-of-teachers-day
 

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रित्यर्थ कार्यक्रमांचे दिल्याप्रमाणे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यामांवर Facebook- @thxteacher, Twitter-@thxteacher, Instagram @thankuteacher अशा प्रकारे टॅग करून अपलोड करावेत. यावेळी
#ThankATeacher
#ThankYouTeacher
#MyFavouriteTeacher 
#MyTeacherMyHero 
#ThankATeacher2021
शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत या हॅशटॅग (#) चा वापर करावा.

Thank A Teacher अभियानांतर्गत कार्यक्रमातील सर्वोत्तम असलेल्या कार्यक्रमापैकी "राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद" महाराष्ट्र (SCERT) ने जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करावी. कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात यावा.

सदर Thank A Teacher अभियानांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह

मार्गदर्शक व्हिडिओ ----



Video Credit - SCERT,Maharashtra पुणे

शिक्षक दिन विशेष

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post