D.Ed/ B.Ed मध्ये अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी TET MAHA TET 2021 EXAM परीक्षा देऊ शकतील
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) २०२१ परीक्षा परिषदेमार्फत दि.१०) ऑक्टोबर २०११ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरणेकरीता दि.०३/०८/२०२१ ते ०५/०९/२०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली आहे.
संदर्भ :- १) शासन पत्र क्र.टीईटी-२०२१/प्र.क्र.१६५/टीएनटी-१ दि.२६ ऑगस्ट, २०२१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे संदर्भीय पत्रानुसार व्यावसायिक अर्हतेच्या (डी.एड./बी.एड.व तत्सम) शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परिक्षेला बसण्यास मुभा दिलेली आहे. सबंध महाईट (MAHA TET) परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनी आवेदन पत्र भरतांना व्यावसायिक अर्हता (Professional Qualification) माहिती भरतांना त्यांना लागू असलेल्या पदविका / पदवी या संदर्भात माहिती भरतांना लगतच्या मागील परीक्षेची (पदविका प्रथम वर्ष / पदवी तृतीय सत्र इ.) माहिती भरावी. प्रमाणपत्र क्रमांकाऐवजी संबंधितांनी त्यांचे परीक्षेचा बैठक क्रमांक नोंद करावा. MAHA TET करिता आपले आवेदन पत्र व परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. आवेदन पत्र भरण्यासाठी अंतिम मुदत दि.०५/०९/२०२१ असून त्यानंतर कोणतेही आवेदन पत्र स्विकारले जाणार नाही.