बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम भाग-४ कलम १९ नुसार प्रत्येक प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती (SMC) व शासकीय माध्यमिक / प्राथमिक, खाजगी अनुदानित शाळेत शाळा विकास व्यवस्थापन समिती / SMDC स्थापन करण्यात आल्या आहेत.
शाळा
व्यवस्थापन
समितीचे
सक्षमीकरण
करणेबाबत.
Empowerment of School Management Committee | SMC
शाळा पातळीवर होणारे निर्णय हे विद्यार्थी केंद्रीत असावे, पालकांचे प्रतिनिधीत्व निर्णय प्रक्रियेत असावे या अनुषंगाने शाळेतील लोक सहभाग वाढावा हे प्रमुख उद्दिष्टे डोळया समोर ठेऊन शासनाने सर्व शाळामध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समितीची निर्मिती रचना, कार्य, हक्क जबाबदारी, कर्तव्य याची माहिती शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पर्यवेक्षीय यंत्रणेला माहिती व्हावी व शाळा व्यवस्थापन समिती एक सक्रिय चळवळ होईल व त्याद्वारे विद्यार्थी व शाळा यांचा विकास व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे-३० यांनी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करणेबाबत. Empowerment of School Management Committee | SMC |