RTE 2009 मध्ये सुधारणा इ.5 वी व इ. 8 वी ची होणार वार्षिक परीक्षा अधिसूचना जारी

 महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अंतर्गत इ.5वी व इ. 8वी ची होणार वार्षिक परीक्षा | परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास त्याच वर्गात ठेवणार. महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अंतर्गत इ. 5वी व इ. 8वी ची वार्षिक परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी. या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास त्याच वर्गात ठेवण्यात येणार आहे. 

RTE 2009 मध्ये सुधारणा इ.5 वी व इ. 8 वी ची होणार वार्षिक परीक्षा अधिसूचना जारी, Maharashtra-Right-of-Children-to-Free-and-Compulsory-Education-Rules-2023

इ.पाचवी  व इ. आठवीची होणार वार्षिक परीक्षा

Maharashtra New education policy : शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे घेतला असून आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा करण्यात आली आहे.

Maharashtra New Education Policy : सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे घेतला असून आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा करण्यात आली आहे. तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. सरकारने नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय जाहीर केला आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र  / अधिसूचना - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९. 

क्रमांक आरटीई २०२२/प्र.क्र. २७६ / एसडी - १. - बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ च्या कलम ३८ मधील उप-कलम (१) आणि (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा (सन २००९ च्या कलम ३५ मधील) वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ मध्ये सुधारणा करीत आहे, ते म्हणजे

१. या नियमांना महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) असे म्हणावे. 

२. महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ च्या (यापुढे ज्याचा उल्लेख "मुख्य नियम" असा करण्यात येईल) नियम ३ मध्ये पोट-नियम (१) नंतर, खालील पोट-नियम समाविष्ट करण्यात येत आहे, ते महणजे :- 

(अ) इयत्ता ५वी च्या वर्गापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. 

(ब) इयत्ता ६वी ते ८वी च्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना बालकास इयत्ता ५वी च्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. बालक सदरची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या बालकाला इयत्ता ५वी च्या वर्गात प्रवेश देण्यात येईल.

३. मुख्य नियमांमधील नियम १० नंतर खालील नियम समाविष्ट केले जातील, म्हणजे :-

"१० (अ), कलम १६ च्या प्रयोजनार्थ, काही प्रकरणांमध्ये परीक्षा आणि बालकास मागे ठेवण्याच्या कार्यपद्धतीबाबतः-

(१) प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी इयत्ता ५वी आणि टवी च्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल.

(२) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (शैक्षणिक प्राधिकरण) इयत्ता ५वी आणि ८वी च्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल.

(३) जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा बालकाला संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.

(४) जर बालक पोट-नियम (३) मध्ये नमूद केलेल्या पुनर्परीक्षेत नापास झाले, तर त्याला इयत्ता ५वी च्या वर्गात किंवा इयत्ता 8वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल.

(५) प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही. 

महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अधिसूचना 👉 pdf डाउनलोड

Maharashtra New education policy : सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे घेतला असून आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा करण्यात आली आहे.

मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे.

नापास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी -

राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा२०११मध्ये सुधारणा केली आहे. पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

याबाबत शासनाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, महाराष्ट्रराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा,पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल.

यात पुढे लिहिलं आहे की, जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही,तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.

महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अधिसूचना 👉 pdf डाउनलोड करा


Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

maharashtra-right-of-children-to-free-and-compulsory-education-rules-2023
महाराष्ट्र RTE नियम, २०२३ (सुधारणा) अंतर्गत इ.5वी व इ. 8वी ची होणार वार्षिक परीक्षा | परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास त्याच वर्गात ठेवणार

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post