एक किलो लोणी...

 एक किलो लोणी...

एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा. 
एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले.दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला.शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर एक किलो लोणी देऊ लागला.

दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता.काही दिवस असेच चालू राहिले.
एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले,तर ते ९०० ग्रॅमच भरले.दुकानदाराला खूप राग आला.पैसे एक किलोचे घेतो. आणि लोणी ९०० ग्रॅमच देतो,हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही.
शेतकरी फसवणूक करत आहे, असा विचार त्याच्या मनात आला...
दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते ९०० ग्रॅमच भरले.आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला.तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला ,तू मला धोका देत आहेस.
शेतकरी म्हणाला, अहो भाऊ माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही,तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो.'
शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली.
कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता.
त्याच्या लक्षात आले की,
आपण जसे कर्म करतो, तसेच फळ आपल्याला मिळते.
या छोट्याच्या कथेची शिकवण अशी आहे की, आपण चुकीचे काम केल्यास, आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते.
कारण शेवटी जैसी करनी,वैसी भरनी.
मी जगाला देईन,तसे जग मला देईल, ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी.
सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते,त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही
तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे ,तोपर्यंत छान जगा.
कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा...
भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी 'पैसा' खाता येत नाही आणि 'पैसा' जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त "अन्न" खाता येत नाही
म्हणजेच जीवनात 'पैशाला' ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.

पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा,आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हीच  श्रीमंती आहे.
अत्तर सुगंधी व्हायला, फ़ुले सुगंधी असावी लागतात.
नाती सुंदर व्हायला ,माणसांचे स्वभाव निर्मळ असावे लागतात.

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com