डॉ.प्रदीप आगाशे- एका झपाटलेल्या शिक्षकाच्या गौरवा निमित्ताने !

एका झपाटलेल्या शिक्षकाच्या गौरवा निमित्ताने !

नुकताच डॉ.प्रदीप आगाशे,यांचा लर्निंग मॕटर प्राईव्हेट लिमिटेड,या बंगलोर येथील संस्थेतर्फे 'उत्कृष्ट गणित शिक्षक',पुरस्कार देऊन गौरव केला गेला. ही संस्था देशातील आणि देशा बाहेरील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते.

 

एका झपाटलेल्या शिक्षकाच्या गौरवा निमित्ताने !
डॉ.प्रदीप आगाशे

स्टार एज्युकेटर अवार्डच्या गणित विभागासाठी ३ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या आॕन लाईन कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.दि. २० रोजी ही ट्रॉफी कुरिअरने पुण्यात आली. लर्निंग मॕटर प्राइव्हेट लिमिटेड,नावाची बंगलोर येथे देशभर आणि देशाबाहेरही वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वाहून घेतलेली एक संस्था आहे. त्यांचा दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुरस्कार देण्याचा एक उपक्रम असतो. याचं आणखी एक विशेष म्हणजे ह्या पुरस्कारासाठी त्या व्यक्तीकडून अर्ज मागविले जात नाहीत तर जगभरातील वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या कडून शिफारस केली जाते .या वर्षी दहा वेगवेगळ्या पुरस्कारासाठी शेकडोंच्या शिफारशी आल्या होत्या.त्यात गणितासाठी आपल्या  महाराष्ट्रातील प्रदीप आगाशे,यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.ते १९७३-८३ या कालावधीत रा.र.विद्यालय भोर,येथे अध्यापक होते. पुढे गेली ४० वर्षे ते पूर्ण महाराष्ट्रात गणित विषयक काम करीत आहेत.

या निमित्तानं डॉ.प्रदीप  आगाशे सर,यांच्या ४०/४५ वर्षांच्या कामाचा अल्प परिचय…..

शिकविण्याची प्रथम पासूनच आवड, त्यात नकला करण्यात,कविता करण्यात,कीर्तन करण्यात गती यामुळे,शिक्षक होण्यासाठीच्या बी.एड्.च्या संस्कार वर्षात आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत आगाशे सरांच्या कीर्तनास प्रथम क्रमांक मिळून फिरोदिया करंडक मिळाला.

आगाशे सरांनी अध्यापनात कीर्तन,सवाल- जबाब, जादूचे प्रयोग,खेळ,कोडी, पथनाट्य,भारुड, पोवाडा, अभ्यास नाट्य,अशी विविध माध्यमे वापरुन अध्यापन रंजक आणि परिणामकारक करण्याचा यशस्वी प्रयोग केला. विद्यार्थी अभ्यासाच्या नादी लागण्यासाठी त्यांनी   या क्षणा पर्यंत अथक परिश्रम घेतले.अर्थात त्यांना  शिकविण्याची विलक्षण आवड असल्याने ते त्यांना  मुलामुलींना आणि शिक्षकांनाही श्रम न वाटता सर्वांनी याचा आनंद लुटला.

एका झपाटलेल्या शिक्षकाच्या गौरवा निमित्ताने !
STAR EDUCATOR AWARD

शिक्षक प्रशिक्षण,मुलांशी संवाद यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रवास केला.गणित योगी पु.ग.वैद्य, यांच्याकडून त्यांना सतत प्रेरणा मिळत गेली.  राज्याचे माजी शिक्षण संचालक वि.वि .चिपळूणकर, यांनीच वर उल्लेखलेली 'एक झपाटलेला शिक्षक' ही उपाधी देऊन त्यांना गौरविलं.त्यांच्या कार्यावर त्यांच्या साठाव्या वर्षात एक पुस्तक अनमोल प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आलं.त्याचं नाव 'एक झपाटलेला शिक्षक' हेच होतं.त्याचे लेखक होते रमणबाग प्रशालेचे त्या वेळचे उप मुख्याध्यापक 'रवींद्र कानडे' आणि मॉडर्न महाविद्यालयाचे त्यावेळचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख 'सुधीर उजळंबकर'.

आज पर्यंत आगाशे सरांचे पूर्ण महाराष्ट्रात  साडे आठ हजार पेक्षा जास्त कार्यक्रम झाले आहेत.आज त्यांना ओळखणारे किमान आठ लाख विद्यार्थी आहेत.

त्यांचा पाठ्य विषयावरील कवितांच्या मदतीने सुलभ स्मरण प्रयोग सर्वत्र गाजला.त्यांनी रचना केलेली देश भक्तीपर गीते, संस्कार गीते,गीत गीता,यांना श्रोत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.त्यांची तीसपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.मूलभूत गणितावर आधारित वेगवेगळ्या २३व्हिडिओ क्लिपस् पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्क तर्फे यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. लेंड ए हँड इंडिया,पासवर्ड,कुल फौंडेशन, एन्.आय्.ई. सकाळ, अशा कितीतरी माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केले.त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन कितीतरी शिक्षकांनी पुरस्कारा पर्यंत मजल मारली.

कोरोना काळात त्यांची आॕन लाईन व्याख्यानेही मुलांना आणि शिक्षकांना उत्साह देणारी ठरली. 

त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

एका झपाटलेल्या शिक्षकाच्या गौरवा निमित्ताने !
डॉ.प्रदीप आगाशे

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com