ज्ञान प्रबोधिनी - छात्र प्रबोधन, पुणे द्वारा प्रबोधन दूत योजना गट ३ - वैयक्तिक माहिती - ज्ञान प्रबोधिनी छात्र प्रबोधन द्वारा जाहीर केलेल्या प्रबोधन दूत योजनेत गट ३ मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी नावनोंदणीसाठी हा फॉर्म भरावयाचा आहे. इयत्ता ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनीच या योजनेत नावनोंदणी करावी. ही योजना जून २०२३ पासून सुरु होईल. dnyaan-prabodhani-prabodhan-dut-yojana प्रबोधन-दूत-योजना-शिक्षक-नावनोंदणी-सुरु-Enlightenment-Envoy-Scheme-Teacher-Enrollment-Begins
ज्ञान प्रबोधिनी - छात्र प्रबोधन, पुणे द्वारा प्रबोधन दूत योजना गट ३ - नावनोंदणी सुरू
जानेवारी २०२२ मध्ये सुरू झालेल्या गट १ मधील ३३ शिक्षक दुसऱ्या टप्प्यात सहभागी ! गट २ डिसेंबर २०२२ मध्ये सुरू, १५३ शिक्षक सहभागी !शहरी/ग्रामीण / आदिवासी भागातील, उच्च प्राथमिक/माध्यमिक शाळांमध्ये शिकवत असलेल्या,
३० ते ५० वर्षे वयोगटातील धडपडणाऱ्या शिक्षकांसाठी!! (१०० शिक्षकांची निवड केली जाईल.)
निवड झालेल्यांना वर्षभरात १६०० रुपयांचे दर्जेदार शैक्षणिक साहित्य मोफत! दरमहा ऑनलाइन मार्गदर्शनपर बैठका !
उद्देश : शहरी/ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये....
- वाचनाची गोडी वाढावी व गतिवाचनाचे कौशल्य विकसित व्हावे.
- हित्याची अभिरूची वाढावी व त्यातून त्यांच्या मनोविश्वाची व भावविश्वाची मशागत व्हावी.
- मुक्त अभिव्यक्तीच्या विविध संधी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात व त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढावा.
- शिकण्याची हौस, स्वयंविकासाची प्रेरणा व सामाजिक भान वाढावे.
स्वरूप :
ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रणालीच्या आधारे, मोफत दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा व ऑनलाइन मार्गदर्शनपर बैठकींचा उपयोग करून योजनेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी आपापल्या शाळेतील किमान दोन वर्गांमधील विदयार्थ्यांसाठी वरील उद्देश साध्य होण्यासाठी नियमित साप्ताहिक / पाक्षिक तासिका घेणे व प्रासंगिक उपक्रम- स्पर्धा यांचे आयोजन करणे.
योजनेत सहभागी शिक्षक व विदयार्थ्यांसाठी विशेष सवलती स्पर्धा उपक्रमांचे आयोजन
- वर्षभरात मिळून दोन वेळा प्रत्येकी सुमारे रु.८००/- चे शैक्षणिक साहित्य पूर्णतः मोफत पाठविले जाईल.
- सहभागी शिक्षकांचा वॉटस्अॅप गट केला जाईल व त्याद्वारे नियमित देवाणघेवाण केली जाईल.
- २०२३ चे दिवाळी अंक व २०२४ ची दिनदर्शिका सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाईल.
- नावीन्यपूर्ण स्पर्धा, कार्यशाळा, सुट्टीतील उपक्रम, मेळावे यांचे मोफत आयोजन केले जाईल
योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांकडून अपेक्षा
- गूगल फॉर्मद्वारे नोंदणी करणे व छात्र प्रबोधन इ मासिकाची वार्षिक वर्गणी रु.१००/- भरणे.
- ही योजना शाळेत राबविण्यासंदर्भात संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांचे संमतिपत्र व एका सहकारी शिक्षकाचे सहमती पत्र इ-मेलद्वारे पाठविणे.
- शिक्षकांसाठी होणाऱ्या ऑनलाइन मासिक बैठकींमध्ये नियमितपणे सहभागी होणे. (वरील सर्व उपक्रमांबाबतचे मार्गदर्शन वेळोवेळी या बैठकींमध्ये केले जाईल . )
- या योजनेसाठी शाळेतील २ वर्गांची निवड करून योजनेचे उद्देश साध्य होण्यासाठी दिलेल्या साहित्याद्वारे त्यांच्यासाठी साप्ताहिक/पाक्षिक तासिका घेणे. पाठविलेल्या साहित्याचा शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणे.
- शाळेतील नित्य, नैमित्तिक उपक्रम व स्पर्धांमध्ये या साहित्याचा व मार्गदर्शनाचा उपयोग करणे.
- उद्देशाला पूरक विविध स्पर्धांचे व साहित्य मेळाव्याचे आयोजन करणे.
- दरमहा झालेल्या उपक्रमांचे निवेदन गूगल फॉर्मद्वारे देणे..
- शिक्षक व विदयार्थ्यांसाठी छात्र प्रबोधनतर्फे योजल्या जाणाऱ्या स्पर्धा - शिबिरे - संमेलनामध्ये सहभाग
- शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी छात्र प्रबोधनतर्फे योजल्या जाणाऱ्या स्पर्धा-शिबिरे संमेलनामध्ये सहभागी होणे.
गट ३ संभाव्य वेळापत्रक
- गूगल फॉर्म भरून सादर करणे १० जून २०२३ पर्यंत
- अध्यापकांची प्रबोधन दूत साठी अंतिम निवड १५ जून २०२३ •इ अंक मासिक वर्गणी, संमतिपत्रे व सहमती पत्र जमा करून सहभाग निश्चित करणे २५ जून २०१३ -
- शैक्षणिक साहित्याच्या पहिल्या संचाचे वितरण व योजनेचा प्रारंभ १ ते १० जुलै २०२३
ज्ञान प्रबोधिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा व शैक्षणिक साहित्याचा शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ व्हावा व त्यांच्यातील सुप्त क्षमतांना विकासाची संधी मिळावी, यासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करा !
सस्नेह आपले,
नाव नोंदणीचा गूगल फॉर्म भरण्यासाठी 👉 Goसंमतिपत्रकांचा नमुना पाहाण्यासाठी👉 Goसंपूर्ण माहितीपत्रक 👉 Go

गणवेश विद्यार्थ्यांना वेळेत मिळणार का ? सोय कमी; अडचणींत वाढ, ‘शैक्षणिक घटकाशी चर्चा नाही’ 👉 वाचा सविस्तर...

COMMENTS