read more

महाराष्ट्र राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात. कारण महाराष्ट्र राज्यात आणखी नवीन 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते. मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. त्यानंतर आजपर्यंत आपल्या राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले. मात्र अजूनही गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो. त्यामुळे आता राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.

महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार? ‘हे’ 22 जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या तुमचा नवीन जिल्हा

महाराष्ट्रात आता 58 जिल्हे होणार? पहा महाराष्ट्रातील 58 जिल्ह्यांची नावे

महाराष्ट्र राज्यात एकूण नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव; यादी आली समोर आली आहे. भाषावार प्रांत रचनेची मागणी झाल्यानंतर, अनेक आंदोलने झाली आणि नवीन भाषावार प्रांतरचना झाली. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ०१ मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचा नवीन मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य तयार झाले. त्यानंतर तब्बल 20 वर्षांच्या कालखंडात म्हणजेच तब्बल दोन दशकात आणखी दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. मात्र आजही आणखी काही जिल्हे तयार करण्याची मागणी होत आहे.

maharashtratil-58-jilhyanchi-naave-mahiti

वास्तविक महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील एका शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकांना जर जिल्हा मुख्यालयाला भेट द्यायची असेल तर त्याला संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो. यामुळे नागरिकांच्या वेळेची तसेच पैशाची मोठी हेळसांड होते.

जिल्ह्याची कामे करण्यासाठी नागरिकांना तब्बल एक ते दोन दिवस घालवावे लागतात त्याचा खर्च तो वेगळाच. अशा परिस्थितीत खेड्यापाड्यातील नागरिकांना देखील जिल्ह्यांशी दळणवळण सुलभ व्हावे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात एकूण 22 नवीन जिल्हे तयार करण्याचे नियोजन प्रस्ताव आहे. या 22 जिल्ह्यांची मागणी शासनाकडे प्रस्तावित आहे.

महाराष्ट्र राज्यातील पहिले 26 जिल्हे

भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रात 26 जिल्हे तयार करण्यात आले. यामध्ये ठाणे, कुलाबा (रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) या जिल्ह्यांचा समावेश होता.

महाराष्ट्र राज्यातील नवीन तयार झालेले दहा जिल्हे

  • रत्नागिरीचे विभाजन झाले आणि सिंधुदुर्ग हा नवा जिल्हा तयार झाला.
  • छत्रपती संभाजी नगरचे विभाजन झाले आणि जालना हा नवा जिल्हा तयार झाला.
  • धाराशिव जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा लातूर जिल्हा तयार झाला.
  • चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा गडचिरोली जिल्हा तयार झाला.
  • बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले आणि मुंबई उपनगर हा जिल्हा तयार झाला.
  • अकोला जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा वाशिम जिल्हा तयार झाला.
  • धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि आदिवासीबहुल नंदुरबार जिल्हा तयार झाला.
  • परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवीन हिंगोली जिल्हा तयार झाला.
  • विदर्भातील भंडारा या जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा गोंदिया जिल्हा तयार झाला.
  • ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा बनला.

महाराष्ट्र राज्यातील 22 प्रस्तावित जिल्हे

  • नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
  • अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
  • ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.
  • ठाणे जिल्ह्यातून तयार झालेल्या पालघर जिल्ह्याचे देखील विभाजन करण्याचा प्लॅन आहे. जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
  • पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
  • रायगड मधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • सातारा जिल्ह्यातून माणदेश जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • रत्नागिरी मधून मंडणगड जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
  • बीडमधून आंबेजोगाई जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
  • लातूर मधून उदगीर जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
  • नांदेड मधून किनवट जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
  • जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्हा तयार होणार आहे.
  • अमरावती जिल्ह्याचे विभाजन होईल आणि अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
  • यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा नवीन जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
  • भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
  • चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित असून यातून चिमूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • गडचिरोली यादेखील जिल्ह्याचे विभाजन करणे प्रस्तावित असून यातून अहेरी हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
maharashtratil-58-jilhyanchi-naave-mahiti

महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
राज्यात ३५ जिल्हे आहेत जे सहा महसुली विभागात विभागले गेले आहेत उदा. प्रशासकीय कारणासाठी कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अर्णरावती आणि नागपूर. जिल्हा स्तरावर नियोजनासाठी वैधानिक संस्था असण्याची राज्याची जुनी परंपरा आहे.

दक्षिण महाराष्ट्रात कोणते जिल्हे येतात?
प्रदेश: भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे.

महाराष्ट्राच्या मध्यभागी कोणते जिल्हे आहेत?
औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली हे मध्यवर्ती जिल्हे मराठवाड्याचा भाग आहेत.

36 जिल्ह्याचे नाव काय?
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात १) ठाणे, २) कुलाबा, ३) रत्‍नागिरी, ४) बृहन्मुंबई, ५) नाशिक, ६) धुळे, ७) पुणे, ८) सांगली, ९) सातारा, १०) कोल्हापूर, ११) सोलापूर, १२) छत्रपती संभाजीनगर, १३) बीड, १४) उस्मानाबाद, १५) परभणी, १६) नांदेड, १७) बुलढाणा, १८) अहमदनगर, १९) अकोला, २०) अमरावती, २१) नागपूर, २२) ...

मराठवाड्यातील जिल्हे किती व कोणते?
१९८२ पासून औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातून या सात जिल्ह्यांना मिळून मराठवाडा असे सर्वसाधारणत: संबोधले जाते.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे: महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळ व लोकसंख्येपासून पुढे आहे . क्षेत्रफळानुसार अहमदनगर हा महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा आहे



आपला महाराष्ट्र सामान्य ज्ञान   👉   GK Quiz on Maharashtra

365 दिनविशेष प्रश्नमंजुषा 👉 Special Days Quiz

GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी 👉Start All Quiz Now

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com