दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Announcement of 10th-12th supplementary examination schedule
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) सप्टेंबर-ऑक्टोबर
सन २०२१ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच ए.टी. के. टी. साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर ऑक्टोबर २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येत आहे
अ.क. |
तपशील |
लेखी परीक्षा कालावधी |
1 |
माध्यमिक शालान्त
प्रमाणपत्र (इ. १० वी) |
बुधवार दिनांक
२२/०९/२०२१ ते शुक्रवार दिनांक
०८/१०/२०२१ |
2 |
उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ. १२वी) सर्वसाधारण व
व्दिलक्षी विषय (जूना व पुनर्रचित अभ्यासक्रम) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
(इ.१२वी) |
गुरुवार दिनांक
१६/०९/२०२१ ते सोमवार दिनांक
११/१०/२०२१ |
3 |
उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२वी) व्यवसाय अभ्यासक्रम (जूना व पुनर्रचित अभ्यासक्रम) |
गुरुवार दिनांक
१६/०९/२०२१ ते शुक्रवार दिनांक
०८/१०/२०२१ |
इ. १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा मंगळवार दिनांक २१/०९/२०२१ ते सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ व इ.१२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार दिनांक १५/०९/२०२१ ते सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेल्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक २७/०८/२०२१ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खाजगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरु नये, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
संदर्भ-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे- ०४.
दिनांक: २७/०८/२०२१ चे प्रकटन Click to Download
![]() |
Announcement of 10th-12th supplementary examination schedule |
Tags:
निकाल - Result