वेळापत्रक नवीन तासिका विभागणी School Time Tables Work Load

वेळापत्रक
नवीन तासिका विभागणी
School Time Tables Work Load

शाळेत शैक्षणिक व अभ्यासपूरक कार्यक्रम राबवत त्यासाठी अनेक प्रकारची वेळापत्रके असली तरी आपल्या वर्ग-वेळापत्रक व शिक्षक-वेळापत्रक यांचा विचार करावयाचा आहे वेळापत्रक हे शाळेचे घड्याळ आहे. त्याप्रमाणे काम काटेकोरपणे वालले तर शाळेतील कार्यक्रम यशस्वी होतात. वर्ग-वेळापत्रक व शिक्षक-वेळापत्रक हे ज्येष्ठ शिक्षक पर्यवेक्षक तयार करतात. परंतु मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून गोष्टी निश्चित करवून घ्याव्यात.

वर्गवेळापत्रके व शिक्षक वेळापत्रके हा शाळेतील शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनाचा महत्त्वाचा कणा आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक शिक्षक आपल्या अध्यापनाचे त्रोटक (Sketchy) वार्षिक नियोजन करू शकतो. काही शाळांत प्रत्येक महिन्याचे सविस्तर अध्यापन नियोजन करवून घेण्याची प्रथा आहे. यासाठी त्यांना सविस्तर नोंदवह्या देण्यात येतात. त्या महिनाअखेरीस मुख्याध्यापकाकडे सादर करावयाच्या असतात. जिल्हा मुख्याध्यापक संघ यात विशेषत्वाने पुढाकार घेऊन असे नियोजनाचे कार्य हाती घेऊ शकेल व छापील स्वरूपात ते देऊ शकेल.

नविन वेळापत्रक व तासिका विभागणी

या आगोदर आपण 45 तासिकांचे वेळापत्रक वापरत होतो परंतु 28 एप्रिल 2017 नंतर एक सुधरित परिपत्रक आले. या परिपत्रकानुसार 48 तासिका होणे बंधनकारक आहे. सोमवार ते गुरुवार 8 तासिका, शुक्रवार 9 तासिका तर शनिवार 7 तासिका होणे बंधनकारक असून त्यानुसारच वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. या सुधारित परिपत्रकाप्रमाणे विषयवार तासिका विभागणी व संदर्भ परिपत्रक  पाहण्यासाठी खाली दिलेल्या योग्य त्या शिर्षकावर क्लिक करा.

खाली दिलेल्या लिंक वरून वेळापत्रक डाउनलोड करा.

वेळापत्रक Time Tables तासिका विभागणी
वेळापत्रक तासिका विभागणी School Time Tables Work Load


शाळा वेळापत्रक | शालेय वेळापत्रक | School Time table New 2023-24

शाळा वेळापत्रक / शालेय वेळापत्रक - विषयवार नवीन तासिका विभागणी
शाळा वेळापत्रक / शालेय वेळापत्रक
विषयवार नवीन तासिका विभागणी

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post