-->

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म कसे भरावेत ?

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती  Scholarships Scheme for Minorities

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेची अर्ज नोंदणी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी  सुरू झाली आहे.  विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दि. 15/10/2022 पर्यंत www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी योग्य कागदपत्रांसह हा अर्ज दाखल करणे तसेच महाविद्यालयांत जमा करणे गरजेचे आहे. Ministry of Minority Affairs यांच्यामार्फत भारत सरकारने निश्चित केलेल्या सहा अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मॅट्रिकपूर्व, मॅट्रिकोत्तर आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी अशा तीन स्तरावर ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी आणि जैन समाजातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात. अर्जदाराला शालेय परीक्षांमध्ये 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. अर्जासोबत चालू बँक खात्याची योग्य माहिती भरावी. जेणेकरून शिष्यवृत्तीची रक्कम योग्य ठिकाणी व वेळेत जमा होईल, असे आवाहन Ministry of Minority Affairs द्वारे करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीचे स्तर

 • Pre Matric Scholarships Scheme for Minorities (मॅट्रिकपूर्व)
 • Post Matric Scholarships Scheme for Minorities (मॅट्रिकोत्तर)
 • Merit Cum Means Scholarship For Professional and Technical Courses CS (गुणवत्ताधारक)

निश्चित केलेले सहा अल्पसंख्यांक समाज

 1. मुस्लिम
 2. ख्रिश्चन
 3. शीख
 4. बौध्द
 5. पारशी
 6. जैन

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज करणे

1) नवीन अर्जदार- New-Click Here
2) नुतनीकरण- Renewal-Click Here

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती साठी अर्ज कसा करावा ?

 1. प्रथमच शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना (नवीन विद्यार्थी) पोर्टलवर "विद्यार्थी नोंदणी फॉर्म" मधील त्यांच्या कागदपत्रांवर छापल्याप्रमाणे अचूक व प्रमाणित माहिती पुरवून नव्याने अर्जदार म्हणून पोर्टलवर "नोंदणी" करणे आवश्यक आहे.
 2. नोंदणी दिनांक 18 वषपेिक्षा कमी वयाच्या विद्याथ्र्यांचे पालक / पालकांनी भरलेले असणे आवश्यक आहे.
 3. नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना / पालकांना / पालकांना खालील कागदपत्रे तयार ठेवायची आहे :
  • । विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे
  • ॥ विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक आणि बँक शाखेचाआयएफएससी कोड
  • ||| विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक
  • IV. आधार नोंदणी आयडी किंवा बँक पासबुकची स्कॅन केलेली प्रत.
       4. अर्ज सबमिट केल्यानंतर, एनएसपी पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी डीफॉल्ट लॉगिन आयडी आणि संकेतशब्द प्रदान केलेल्या मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. जर संकेतशब्द प्राप्त झाला नसेल तर लॉगिन पृष्ठावरील विसरलेल्या संकेतशब्दाचा पर्याय वापरायचा आहे.
       5. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जात सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यानुसार वार्षिक कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र सादर करायचा आहे.


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक -

मार्गदर्शक video पहा.

1) नवीन अर्जदार- New-Click Here

मार्गदर्शक video पहा.

2) नुतनीकरण- Renewal-Click Here


Scholarships Scheme for Minorities अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म / अर्ज दाखल करण्यासाठी अधिकृत वेबसाईट होम पेज साठी येथे क्लिक करा

www.scholarships.gov.in
 
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती सन 2022-23 ची अधिक माहिती पुढील वेबसाइटवरून आपल्याला घेता येईल. www.minorityaffairs.gov.in
 
आपण Scholarships Scheme for Minorities अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2022-23 बाबत 1800112001 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

इतर महत्वाच्या शिष्यवृत्ती...


District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >