School Edutech Breaking News Educational Breaking News,शाळेच्या बातम्या, शैक्षणिक ठळक बातम्या, ताज्या शैक्षणिक बातम्या महाराष्ट्र
Educational News
Apaar Card: नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अपार कार्ड; नेमका कशासाठी होणार उपयोग? जाणून घ्या...
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांचा युनिक आयडी देण्यात येणार आहे.केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी दिला जाणार आहे. Read more.....
10th, 12th Exam : भावा अभ्यासच कर, कॉपी करणारे होणार फेल; विद्यार्थ्यांवर करडी नजर, CBSE च्या धरतीवर राज्य बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल
CCTV on Exam Centre : इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठे पाऊल टाकलं आहे. CBSE परीक्षेच्या धरतीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. काय आहे अपडेट?
आता इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठे पाऊल टाकलं आहे. CBSE परीक्षेच्या धरतीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या या धोरणामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनंतर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला ही सुरुवात होणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.Read more.....
शिक्षण विभागातील बदल्यांसाठी ‘रेट कार्ड’, शिक्षण मंत्री म्हणाले बदल्याच बंद तर…

Image Credits: दैनिक लोकसत्ता टीम

नागपूर: शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्टीकरण जाहीर करत सर्व आरोप Read more.....
नश्याम नवाथे सांगली : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, पोलिस दलाकडे तक्रार आल्यानंतर ज्या क्रमांकावरून कॉल आला ते सिम कार्ड तत्काळ ‘ब्लॉक’ केले जाते; परंतु आता सायबर गुन्ह्यांमध्ये ‘आयएमईआय’ क्रमांक शोधून
भामट्यांना दणका; सायबर गुन्हेगारांचे मोबाइल हॅण्डसेटच आता होणार ‘ब्लॉक’
घनश्याम नवाथे सांगली : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, पोलिस दलाकडे तक्रार आल्यानंतर ज्या क्रमांकावरून कॉल आला ते सिम कार्ड तत्काळ ‘ब्लॉक’ केले जाते; परंतु आता सायबर गुन्ह्यांमध्ये ‘आयएमईआय’ क्रमांक शोधून संबंधित फसवणूक करणाऱ्याचे सिम कार्डच नव्हे, तर मोबाइल हॅण्डसेटच कायमस्वरूपी ‘ब्लॉक’ केला जाईल. शेकडो सिम कार्ड वापरून पोलिसांच्या कारवाईपासून दूर राहणाऱ्या गुन्हेगारांचे मोबाइल हॅण्डसेटच कायमस्वरूपी बंद केल्यानंतर चांगलाच दणका बसणार आहे. सायबर पोलिसांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.
Good Parenting : कितीही योग्य आणि गुलाबी वाटला, तरी करिअर हा ‘सोक्षमोक्ष’ लावण्याचा विषय नाही..‘बाबा वाक्यं प्रमाणं’ पठडीतून किंवा कोणत्यातरी अथवा कोणाच्यातरी प्रभावाखाली करिअरचे निर्णय घेण्याचेही हे दिवस नाहीत..
Image Credits: दैनिक सकाळ
दिवस दहावी-बारावीच्या परीक्षांचे आहेत. काहींच्या परीक्षांचे शेवट आता दृष्टिपथात आहेत, काहींचे महत्त्वाचे विषय आटपले आहेत आणि राहिलेल्या दोन-तीन वेगळ्या विषयांच्या परीक्षा आणखी काही काळ रेंगाळणार आहेत.
त्यानंतर सिझन सुरू होईल विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा अर्थात सीईटींचा. सीईटींमुळे दहावी-बारावीच्या परीक्षांची उपयुक्तता हा या सिझनमधला अनेक घरांमधल्या जेवणाच्या टेबलांवरचा हॉट टॉपिक असला, तरी हे दोन्ही टप्पे आपल्या मुलांच्याबाबतीतल्या ‘पुढे काय आणि कसे?’ याप्रश्नांच्या उत्तरांकडे घेऊन जाणारे महत्त्वाचे टप्पे आहेत, हे खरेच.....
भामट्यांना दणका; सायबर गुन्हेगारांचे मोबाइल हॅण्डसेटच आता होणार ‘ब्लॉक’
Image Credits: दैनिक सकाळ |
COMMENTS