सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन दिनांक ०२/०८/२०२२ ते २५/०८/२०२२ या कालावधीत करण्यात येणार आहे.
MHT CET EXAM परीक्षा कधी होणार याची माहिती घेणार आहोत. या परीक्षेच्या तारखा या बदलण्यात आलेल्या आहेत. आणि बऱ्याचशा आपल्या विद्यार्थी मित्रांना याबद्दल माहिती झालेली नाहीये. त्यामुळे आपण या परीक्षा कधी होणार याची माहिती घेणारआहोत...
MHT CET 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षेचं शिक्षण मंडळाकडून नवीन वेळापत्रक जाहीर, पहा काय आहेत नवीन बदल.
![]() |
MHT CET 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षेचं शिक्षण मंडळाकडून नवीन वेळापत्रक जाहीर |
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२२ (तंत्रशिया व कृषी शिक्षण / बी. एचएमसीटी / बी. प्लानिंग / एमबीए / एमसीए / एम. आर्च/ एम.एचएमसीटी-सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन दिनांक ०२/०८/२०२२ ते २५/०८/२०२२ या कालावधीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने उपरोक्त सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्कासहीत अर्ज केलेल्या व परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.
- उमेदवाराने प्रवेश पत्र (Hall Ticket) विहित मुदतीत अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावरून download करून त्याची Printout काढावी.
- प्रवेश पत्र (Hall Ticket) वरील परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, इत्यादी.
- परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर Hall Ticket वर नमूद केलेल्या Gate Clouser वेळेआधी काळजीपूर्वक वाचावे. पोहोचण्याची दक्षता घ्यावी व योग्य ते नियोजन करावे.
- प्रवेशपत्रावर उपलब्ध करून दिलेल्या जागेत स्वतःचा Recent Passport Size Photo चिटकवावा.
- परीक्षेस जाताना प्रवेश पत्र (Hall Ticket) न विसरता सोबत घेवून जावे.
- परीक्षेस जाताना उमेदवाराने स्वतःचे मूळ ओळख प्रमाणपत्र (ID Proof) जसे कि, PAN Card/ Adhar Card/Passport, etc न विसरता सोबत घेवून जावे.
- प्रवेश पत्रावरील सूचनांचे न विसरता वाचन करून पालन करावे.
- परीक्षे दरम्यान कोणत्याही गैरप्रकारचा अवलंब करू नये.
- बाहेरगावावरून परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी होणारी घाई व उशीर टाळण्यासाठी आधीच परीक्षाकेंद्रावर जाण्याचा मार्ग व सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था याचा अभ्यास करावा..
सर्व परीक्षार्थीना परीक्षेतील यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा......
Important Notice: Date Extension to Re-examination of Candidates who could not complete the MHTCET-2022 (PCM & PCB) Examination due to Technical Issues like Server failure/Network Error. Dated: 23/08/2022
SN | Activity | Department | Link |
---|---|---|---|
1 | Re-Examination MHT-CET 2022 | Technical Education | Click here to Apply for MHTCET-2022 Re-Exam |
To Download Admit Card For CET- 2022
SN | CET Name | Department | Link |
---|---|---|---|
1 | MAH-MBA CET 2022 | Technical Education | View Admit Card |
COMMENTS