महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना MHT-CET/JEE/NEET 2024 करीता मोफत ऑनलाईन प्रशिक्षण.
MHT-CET/JEE/NEET 2024 करीता पूर्व प्रशिक्षण
![]() |
MHT-CET/JEE/NEET 2024 करीता मोफत ऑनलाईन प्रशिक्षण |
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना MHT-CET/JEE/NEET 2024 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. MHT-CET/JEE/NEET 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरीता इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना MHT-CET/JEE/NEET 2024 थे पूर्व प्रशिक्षण महाज्यो मार्फत देण्यात येईल. MHT-CET/JEE/NEET 2024 चे प्रशिक्षण 15 जुलै पासून सुरु करण्यात येईल तसेच प्रशिक्षणासोबत पुस्तके व इतर साहित्य पुरविण्यात येईल.
योजनेच्या लाभासाठी पात्रता :
- उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
- उमेदवार नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.
- ज्या उमेदवारांनी 2022 मध्ये 10 वी परिक्षा दिलेली आहे उमेदवार अर्ज भरण्यास पात्र आहे. अश्या उमेदवारांनी अर्ज करताना 10 वी परिक्षा प्रवेश पत्र जोडून अर्ज करावा.
- क्र.4 प्रमाणे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 65% व त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्याचा त्यांनी सादर ऑनलाईन करावयाच्या गुणपत्रकाच्या आधारे व एकूण क्षतमेच्या मर्यादेत अंतीम निवड यादीत समावेश केला जाईल.
अर्ज कसा करावा?
- महाज्योती च्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application for MHT-CET/JEE/NEET2024 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा,
- अर्जासोबत जातीचा दाखला, दहावी परीक्षा प्रवेशपत्र, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) , नौन क्रिमिलेअर, आधार कार्ड ही कागदपत्रे स्व-साक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कैन करून अपलोड करावी.
- अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 सप्टेंबर 2022 असेल. ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांच्या अखत्यारीत असतील.
- अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 07122870120
- ई-मेल आयडी mahajyotijeeneer24@gmail.com
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
( महाज्योती), नागपूर यांचे परिपत्रक
- JEE/NEET/MHT-CET पूर्व प्रशिक्षण 2024 (Online)
- For more info. contact 07122870120 / 07122870121 or visit www.mahajyoti.org.in
"www mahajyoti org in 2023"
"www mahajyoti org in 2024"
"www mahajyoti org in 2022"
"mahajyoti hall ticket"
"www mahajyoti org in registration"
"mahajyoti admit card 2021"
"mahajyoti org in registration 2024"
"mahajyoti mpsc"