-->

ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रिया

सद्यस्थितीमध्ये काही प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु  करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रीयेबाबत..... 

सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी.
आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत देखील http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.  
उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ या कालावधीसाठी  उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.

ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रिया संदर्भ 

  1. शासन निर्णय क्र. चवेआ-१०८९/१११ /माशि -२, दि.२.०९.१९८९ २. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९ / प्र.क्र. ४३ / प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१.
  2. शासन परिपत्रक जा. क्र. शिप्रघो २०२१/ प्र. क्र. ६७ / प्रशिक्षण दिनांक ०६.१०.२०२१
  3. या कार्यालयाचे प्रशिक्षण आयोजनाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ आय.टी/व.नि. प्रशिक्षण /२०२२-२३/२२३८ दि.०१.०६.२०२२.
  4. या कार्यालयाचे प्रशिक्षण आयोजनाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ आय.टी./व.नि.प्रशिक्षण/२०२२-२३/२२४५ दि. ०६.०६.२०२२

उपरोक्त संदर्भ क्रमांक ४ अन्वयेच्या पत्रान्वये राज्यातील एकूण ९४,५४१ नावनोंदणी केलेल्या शिक्षक / मुख्याध्यापक, प्राचार्य व अध्यापकाचार्य यांचेसाठीचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरु करण्यात आले होते. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण ९१.१८९ नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. सद्यस्थितीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तसेच संदर्भ क्रमांक ५ अन्वये च्या पत्रानुसार यापूर्वी देखील प्रशिक्षणार्थी यांना आवश्यक दुरुस्ती ची सुविधा या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तथापि अद्यापही काही प्रशिक्षणार्थी यांच्याकडून झालेल्या तांत्रिक चुकांमुळे (चुकीचा ई-मेल आय. डी नोंदणी, चुकीचा प्रशिक्षण प्रकार अथवा प्रशिक्षण गट नोंदणी करणे, लॉगीन तपशील प्राप्त होण्यापूर्वीच प्रशिक्षण सुरु करणे, एकाच ई-मेल आय. डी वरून दोन प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे इत्यादीमुळे संबंधित प्रशिक्षणार्थी यांना काही दुरुस्ती करावयाची असल्याने संबंधित प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत http://training scertmaba.ac.in/ या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

सदरच्या दुरुस्तीच्या सुविधेमार्फत खालील दुरुस्ती प्रशिक्षणार्थी करू शकणार आहेत.

  • प्रशिक्षणाचे लॉगीन उपलब्ध झालेले नसणे.
  • प्रशिक्षण गट तसेच प्रशिक्षण प्रकार यामध्ये बदल करावयाचा असणे
  • ई-मेल आय. डी. दुरुस्ती करणें • प्रशिक्षण प्रमाणपत्र दुरुस्ती करणे.

सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणा यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी, ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण सुरळीतपपणे सुरु आहे अशा प्रशिक्षणार्थी यांनी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा बदल करू नये. तसेच आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबतचे देखील http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे. उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही याबाबत संबंधित प्रशिक्षणार्थी यांना अवगत करावे. तरी वरीलप्रमाणेच्या प्रशिक्षण दुरुस्ती सुविधेबाबत आपल्या कार्यक्षेत्रामधील प्रशिक्षणार्थी यांना अवगत करण्यात यावे. 

या बाबत ( रमाकांत काठमोरे) सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०.याचे कार्यालयातून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.

ऑनलाईन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रिया परिपत्रक PDFअ. क्र.विषय तपशील
 
कार्यवाहीचा दिनांक
१.प्रशिक्षणार्थी माहिती दुरुस्ती प्रक्रिया२१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२
२.प्राप्त माहितीनुसार आवश्यक पडताळणी प्रक्रिया०१.११.२०२२ ते ०३.११.२०२२
३.अंतिम माहिती इन्फोसिस प्रशिक्षण प्रणालीस सादर करणे व प्रणालीवर अद्ययावत करणे.०४.११.२०२२ ते १०.११.२०२२
४.प्रशिक्षणार्थी यांचे दुरुस्तीनुसारचे प्रशिक्षण सुरु१२.११.२०२२ पासून


दुरुस्ती प्रक्रिया

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >