10 वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA SSC Board Exam Result 202३, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.10 वी परीक्षा मार्च २०२३ चा निकाल
ssc-online-result-maharashtra-2023
10 वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA SSC Board Exam Result 2023 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च - २०२3 चा निकाल
मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
विषय माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी ) परीक्षा मार्च २०२३ चा निकाल
- mahresult.nic.in
- https://ssc.mahresults.org.in
- http://sscresult.mkcl.org
- https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
- https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10thresult-2023
- http://mh10.abpmajha.com
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयाध्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर
सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध
होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
- ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१0 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात स्थाने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक 03/०6/२०२३ ते सोमवार दिनांक १२/०६/२०२३पर्यंत छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते गुरुवार, दिनांक २२/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.
- मार्च २०२३ माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्याथ्र्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
- मार्च २०२३ च्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्र्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२३ व मर्क्ष्ह २०२३) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement (Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील..
- जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ०७/०६/२०२३ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
- मार्च २०२३ मध्ये माध्यमिक प्रमाणपत्र (इ१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळामार्फत बुधवार दि.१४/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.
संदर्भ- दिनांक: ०१/०६/२०२3, प्रकटन -महाराष्ट्र राज्य माध्यमिक मार्च २०२3 च्या निकालाबाबत...
Maharashtra State Educational WhatsApp Group
- Telegram - School Edutech Telegram
- Google News School Edutech Google News
-1०-वी-बोर्ड-परीक्षा-निकाल
10 वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA SSC Board Exam Result 202३, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.10 वी परीक्षा मार्च २०२३ चा निकाल
COMMENTS