Open Schooling in Pune | मुक्त विद्यालयाचे प्रवेश सुरू; जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया?

Open Schooling in Pune - महाराष्ट्र राज्याच्या मुक्त मंडळात वय चौदा  वर्षांखालील विद्यार्थ्यांची नियमित विद्यार्थी म्हणून नोंद केली जाते. तसेच वय दहा वर्षे पूर्ण झालेले मुल  हे 8 वीच्या परीक्षेस बसू शकणार आहेत. तर वय 15 वर्षे पूर्ण झालेले मुल हे 10 वीच्या परीक्षेसाठी बसू शकणार आहेत. सध्य स्थितीला राज्यात (Open Schooling in Pune) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

Open Schooling in Pune | मुक्त विद्यालयाचे प्रवेश सुरू

शाळाबाह्य असणाऱ्या  मुक्त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. याआधी नावनोंदणीची मुदत 28 फेब्रुवारी होती. मात्र, ती 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती आता पुंन्हा त्यासाठी येत्या 15 एप्रिलपर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ असेल. या मुदतवाढीला पुन्हा एकदा वाढ मिळाल्याने राज्यातील  हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वीसाठी विद्यार्थ्यांना  नव्याने अर्ज करता येणार आहे. खरे पहाता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संधी मिळावी म्हणून मा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. त्याच धरतीवर या विद्यालय मंडळाचाही सुरु आहे.


Open Schooling in Pune | मुक्त विद्यालयाचे प्रवेश सुरू; जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया?
Open Schooling in Pune
मुक्त विद्यालयाचे प्रवेश सुरू; जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया?

Open Schooling करिता काय असणार पात्रता?

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळात वय चौदा  वर्षांखालील विद्यार्थ्यांची नियमित विद्यार्थी म्हणून नोंद केली जाते. तसेच वय दहा वर्षे पूर्ण झालेले मुल  हे 8 वीच्या परीक्षेस बसू शकणार आहेत. तर वय 15 वर्षे पूर्ण झालेले मुल हे 10 वीच्या परीक्षेसाठी बसू शकणार आहेत. सध्य स्थितीला राज्यात (Open Schooling in Pune) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी  http://msbos.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

Open Schooling in Pune कशी असेल प्रवेश  प्रक्रिया?

१)अर्ज भरताना आपली वैयक्तिक माहिती अचूक भरावी. (उदा. नाव, आधार नंबर , मोबाईल नंबर, पत्ता, जन्मतारीख, ई – मेल, इयत्ता, संपर्क केंद्र ,माध्यम, विषय,इ.)

२)मराठीतून माहिती भरण्यासाठी युनिककोड उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे ती माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. तसेच आवश्यकतेनुसार दुरूस्ती करून अंतिम करावे.

३)कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यानी स्कॅनर / मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत . विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई–मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (Compulsory) आहे.

४)संपूर्ण अर्ज भरून तो सबमिट करावा. तदनंतर उपलब्ध होणार्याल PDF अर्जाची तसेच शुल्क पावती व हमी पत्राची दोन प्रतीत प्रिंट काढून घ्यावी. विद्यार्थ्यांना अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करावायची आहेत.

५)मुक्त विद्यालयामार्फत इयत्ता ५ वी / इयत्ता ८ वी साठी प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्याची नावनोंदणी अर्ज शुल्क निर्धारित करण्यात आले असून त्याची महिती चलनावर / महिती पुस्तिकेत उपलब्ध असेल.

६)मुक्त विद्यालयामार्फत ऑनलाईन पध्द्तीने नावनोंदणी केलेल्या पात्र विद्यार्ध्यांना ऑनलाईन पध्दतीनेच नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) उपलब्ध करून देण्यात येईल.

७)मुक्त विद्यालय मंडळाने निश्चित केलेल्या संपर्क केंद्रावर पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संपर्क शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.

८)संबंधित पात्र विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालय मंडळाने तयार केलेल्या स्वयंअध्ययन पुस्तिका संपर्क केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येतील.

९)नावनोंदणी केलेल्या पात्र विद्यार्थ्याने संपर्क शिबिरामध्ये उपस्थित राहून त्याने निवडलेल्या विषयनिहाय स्वयंअध्ययन पुस्तिका सोडविणे आवश्यक आहे.

१०)विद्यार्थ्याने सोडविलेल्या स्वयंअध्ययन पुस्तिकांचे मूल्यमापन संपर्क केंद्रावरील संबंधित तज्ञ शिक्षकांमार्फत तपासून व त्यावर आवश्यक ते मार्गदर्शन व सूचना नमूद करतील.

११)मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता ५ वी / इयत्ता८ वी च्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन निर्धारित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात येईल.

Read al so Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022

नोंदणी अर्जसोबत जोडावयाची कागदपत्रे –

१)शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळप्रत / द्वितीयप्रत

२)शाळेत गेला नसल्यास स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र(वय वर्ष १८ पेक्षा जास्त असल्यास स्वत:चे व वय वर्ष १८ पेक्षा कमी असल्यास पालकांचे )

३)आधारकार्ड

४)स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत: जवळ ठेवावा.

५)ऑनलाईन अर्ज भरताना सादर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करवयाची आहेत. (कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यानी स्कॅनर / मोबाईल द्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत.

– अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी  http://msbos.mh-ssc.ac.in/  या संकेतस्थळास भेट द्यावी


Refer Section

Use Links

1

Apply Online

2

Form

3

Re-Print Application

4

Center Login


Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022

Tags-"open universities in pune", "open school courses", "open university engineering colleges in pune", "when open school in punjab", "when pune school will open", "how open school in india", "open university wildlife courses", "when open schools in punjab"maharashtra-state-open-schooling-in-pune-appliication


CATEGORIES





































Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post