-->

NMMS Exam 2022 | Admit card | Bell Timetable

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS Scholarship Exam | शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-22 चे आयोजन इ. 8 वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://v.mscepune.in  व  https://nmmsmsce.in  या संकेतस्थळावर दिनांक ०६ एप्रिल २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. | NMMS Scholarship Exam 2021-22 will be held on 19th June 

NMMS Scholarship Exam 2021-22 Exam will be held on 19th June | शिष्यवृत्ती NMMS Scholarship परीक्षा 2021-22 परीक्षा 19 जून रोजी होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यामधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

NMMS Scholarship Exam 2023
NMMS Scholarship Exam

NMMS Exam 2022 Hall Ticket | Admit card | NMMS परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा.

NMMS परीक्षा ही 19 जून रोजी होणार असून सदर परीक्षेसाठी चे प्रवेशपत्र शाळांच्या लॉगीन वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. ही प्रवेशपत्रे 8 जून पासून शाळेच्या लॉगीन वरुन डाउनलोड करता येतील. 

NMMS Exam "प्रवेशपत्र" डाउनलोड करण्यासाठी👉 Admit Card 


 NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

NMMS Exam Question Papers Set | सराव प्रश्नपत्रिका संच | 2022

NMMS परीक्षा घंटेचे वेळापत्रक | Bell Timetable

NMMS परीक्षा घंटेचे वेळापत्रक | Bell Timetable
NMMS परीक्षा घंटेचे वेळापत्रक | Bell TimetableNMMS Scholarship Exam 2021-22 महत्वाच्या तारखा

  • ü NMMS Scholarship करिता अर्ज करण्यास सुरु होण्याची दिनांक – 6 एप्रिल 2022
  • ü NMMS Scholarship करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख - कळविण्यात येईल
  • ü NMMS Scholarship परीक्षा दिनांक - 19 जून 2022

अधिसूचना.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://v.mscepune.in  व  https://nmmsmsce.in  या संकेतस्थळावर दिनांक ०६ एप्रिल २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा विचार करुन शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात.

  1. सदर NMMS Scholarship परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत.
  2. विद्याथ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे.
  3. शाळा संलग्नता शुल्क रु. 200/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु. 100/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMMS Scholarship अधिक माहिती 

NMMS Scholarship योजनेचे उद्दिष्ट

इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

NMMS Scholarship परीक्षेचे स्वरुप

केंद्रशासनामार्फत मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली यांनी २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक १९ जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु.१०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

'NMMS Scholarship' करीता पात्रता


a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा..

c) विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.) d) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.

• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी,

• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, 

• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत

दिनांक ०६/०४/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व (अपंगत्व) प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. सविस्तर माहिती परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

शुल्क NMMS Scholarship परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.

nmms-scholarship-exam-fee-2021-22
nmms-scholarship-exam-fee-2021-22

परीक्षेचे वेळापत्रक :- सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

nmms-scholarship-exam-timetable-2021-22
nmms-scholarship-exam-timetable-2021-22

* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यासाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

NMMS Scholarship परीक्षेसाठी विषय

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात,
(b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल, त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण ३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण १० प्रश्न सोडवायचे असतात.

★ उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण 
b. समाजशास्त्र ३५ गुण: इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण 
c. गणित २० गुण.

"NMMS Scholarship" परीक्षेकरिता माध्यम

प्रश्नपत्रिका मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, सिंधी, तेलुगू व कन्नड या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील, योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/ व्हाईटनर /खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

प्रवेशपत्रे

ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्याथ्र्यांची प्रवेशपत्रे परिषद्वेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉगीनबर परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उपलब्ध होतील. सदर प्रवेशपत्रे काढून विद्यार्थ्यास देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

परीक्षेचे मूल्यमापन 

विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाय योजना यांचा विचार करून बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्रशासनाने निश्चित केलेल्या कोटयानुसार जिल्हयानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या

अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्याथ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात येतील.

"NMMS Scholarship" निकाल घोषित करणे

सदर परीक्षेचा निकाल साधारण ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढावयाचा आहे.

'NMMS Scholarship' शिष्यवृत्ती दर

ष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु.१,०००/ ( वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

→ शिष्यवृत्ती प्राप्त विद्याथ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.)

इ.१० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)

→ सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.

'NMMS Scholarship' अनधिकृततेबाबत इशारा 

मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.

NMMS Exam  प्रवेशपत्र बाबत काही अडचण असल्यास काय करावे? 
NMMS परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र काढून देण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित केंद्र संचालक, शिक्षणाधिकारी किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधावा. 

 TAGS- scholarship nmms  "nmms maharashtra" | "nmms scholarship" |"nmms scholarship portal" | "nmms scholarship 2020-21" | "nmms exam" | "nmms result" | "Keyword" | "nmms scholarship" | "nmms exam" | "nmms result 2021" | "nmms scholarship 2020" | "nmms exam 2021" |  "nmms scholarship 2020 apply online" | "nmms result" | "nmms full form" | "nmms meaning" | "nmms exam 2020" | "nmms odisha" | nmms exam 2021-22,nmms exam 2021-22 date,nmms exam 2021-22 apply online last date,nmms scholarship 2021-22,nmms exam date 2021-22 maharashtra,nmms exam date 2021-22 class 8, nmms scholarship 2021-22 exam date,nmms exam date 2021-22 maharashtra,nmms exam 2021-22 apply online last date, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना,राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अभ्यासक्रम


NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा
NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळाCATEGORIES

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >