Rashtriya Indian Military College, Dehradun, Uttarakhand Entrance Examination will be held on June 4, 2022 at Pune
विषय:- Rashtriya Indian Military College, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) जून 2022 विनामूल्य प्रसिध्दी देणेबाबत संदर्भ: मा. कमांडेट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांचे क्र.EE/Jun 22/NT दि. १५ फेब्रुवारी 2022 रोजीचे पत्र
Rashtriya Indian Military College, डेहराडून, उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा जून 2022
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी "Rashtriya Indian Military College, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे" ही परीक्षा दिनांक 04 जून 2022 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच होती परंतु मागील परीक्षेपासून सदर परीक्षा मुलीनाही प्रविष्ट होता येईल.
Rashtriya Indian Military College
• Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022- प्रवेश वयाची अट:
1) या परीक्षेसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनीचे वयोमर्यादा (वय) दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी 11 1/2 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे, म्हणजेच विद्यार्थी विद्याथीनीचा जन्म दिनांक 02 जानेवारी 2010 च्या आधीचा व दिनांक आणि 01 जुलै 2011 च्या नंतरचा नसावा.
• Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022- शैक्षणिक पात्रता :
विद्यार्थी/ विद्यार्थीनी (उमेदवार दि. 01 जानेवारी 2023 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा.
● Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022- परीक्षा शुल्क:
आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता:
2) Rashtriya Indian Military College Entrance परीक्षेसाठी मा. कमांडेट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचे आहे. सर्वसाधरण संबंगातील विद्यार्थी (उमेदवारा) करीता रु. 600/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/- चा डी.डी. कमांडंट "राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट बँक ऑफ इंडिया, तेल भवन, देहराडून, बँक कोड नं. (02576) यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, 248003 या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/ छायांकित प्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.
3) Rashtriya Indian Military College Entrance परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्मची मागणी आपणास करता येईल.
● Rashtriya Indian Military College Entrance परीक्षेसाठी आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद्, 17 डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे 411 011 या पत्त्यावरती दिनांक 25 एप्रिल 2022 पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत, अंतिम मुदतीनंतर आलेले आवेदनपत्र (फॉर्म) कोणत्याही परिस्थिती मध्ये स्विकारले जाणार नाहीत.
● भारत सरकार, संरक्षण मंत्रालय यांचे पत्र क्र. A/36105/GS/MT-6/D (GS-II) दिनांक 03 सप्टेंबर 2014 नुसार केंद्र सरकारी नोकरीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मुले/मुली लेखी आणि मौखिक परीक्षा ज्या राज्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची पोस्टींग आहे त्या ठिकाणी देऊ शकतात. त्या मुलांची निवड त्यांच्या मूळ अधिवास राज्यानुसार होईल आणि त्यांची उमेदवारी देखील त्यांच्या मूळ अधिवासाच्या स्थितीनुसार असेल, उमेदवार (विद्यार्थी/विद्यार्थीनी) ज्या राज्यातून परीक्षा देऊ इच्छितो त्याच राज्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
Rashtriya Indian Military College Entrance परीक्षेसाठीआवेदनपत्र कसे भरावे:
आवेदनपत्र (फॉर्म) 2 (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे.
- जन्म दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी)
- अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी),
- अधिवास (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (झेरॉक्स कॉपी)
- शाळेच्या बोनाफाईट सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.
- आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे विद्यार्थीनीचे उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.
- आवेदनपत्र भरताना ४ (चार) पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे. त्यापैकी २ (दोन) फोटो आवेदनपत्रावर (फॉर्मवर) चिकटवून त्याखाली उमेदवाराने (विद्यार्थ्याने) स्वाक्षरी करावी व २ (दोन) फोटोच्या मागे नाव व स्वाक्षरी करून फॉर्म सोबत जोडावे
Rashtriya Indian Military College Entrance परीक्षेचे वेळापत्रक
- विषय- गणित वेळ- सकाळी 9.30 ते 11.00 गुण-200
- विषय- सामान्य ज्ञान वेळ- दुपारी 12.00 ते 1.00 गुण-75
- विषय- इंग्रजी वेळ- दुपारी 2.30 ते 4.30 गुण-125
Refer Section |
|
Official Links👇 |
|
1 |
|
2 |
Rashtriya Indian Military College Entrance Exam 2022 |
CATEGORIES
rashtriya indian military college recruitment 2022
rashtriya indian military college fees
rashtriya indian military college entrance exam syllabus
rashtriya indian military college photos
rashtriya indian military college question papers pdf
rashtriya indian military college dehradun admission
rashtriya indian military college previous year question paper
rashtriya indian military college eligibility criteria
how to get admission in rashtriya indian military college
How can I join Rashtriya Indian Military College?
COMMENTS