सेतू अभ्यास सन 2023 नियोजनात झाला बदल- विद्यार्थ्यांचे होणार सर्वेक्षण

पुनर्रचित सेतू अभ्यास सन २०२३ ची परीणामकारकता तपासण्यासाठी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणेबाबत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे दि. 03 जून 2022 च्या  पत्रान्वये पुनर्रचित सेतू अभ्यास सन २०२२-२३ ची शालेय स्तरावर अंमलबजावणी होणार आहे. यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर इयत्ता व विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. तसेच या सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी प्रायोगिक तत्वावर इ. २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्याचे नमुनाधारित सर्वेक्षण घेण्यात येणार आहे व याद्वारे प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जाणार आहेत.

त्यासाठी खालील सर्व्हे मंकी लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची आपल्या अधिनस्थ वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी. केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे माहिती संकलित करण्यात यावी. सदर संशोधन हे काल मर्यादित असल्याने पुढील नियोजनाप्रमाणे https://www.research.net/r/Bridgecourseprestudv22 या लिंकद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी.

करावयाची कार्यवाही -पूर्व चाचणी

राज्यातील शाळा (विदर्भ वगळून)
अंमलबजावणी कालावधी- दि. २० जून ते २५ जून २०२२
विदर्भातील शाळा
अंमलबजावणी कालावधी- दि. २८ जून ते ०४ जुलै २०२२

करिता आपण आपल्या स्तरावरून उपरोक्त संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना यासंदर्भात आदेशित करावे, तसेच आपल्या स्तरावरून याबाबतचा आढावा घ्यावा. आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांनी किती विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली याबद्दलचा गोषवारा संशोधन विभागाच्या researchdepti@maa.ac.in या ई-मेलवर पाठविण्यात यावा. याबाबतच्या आवश्यक मार्गदर्शक सूचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. (मूळ प्रत मा. संचालक महोदय यांनी मान्य केली आहे.)

पुनर्रचित सेतू अभ्यास सन २०२२-२३ अंमलबजावणी पूर्वीची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती माहिती संकलन मार्गदर्शक सूचना


• पुनर्रचित सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी सदर सर्वेक्षणात इयत्ता २ री ते १० वी या

इयत्तांचा विचार करण्यात आलेला आहे.

• राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत पुनर्रचित सेतू अभ्यासामध्ये समाविष्ट

अध्ययन निष्पतीवर आधारित प्रश्न निर्धारित करण्यात आले आहेत.

• इयत्तानिहाय एकच प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये संबंधित इयतेतील सर्व विषयावरील

प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. (हिंदी विषयाचा समावेश करण्यात आलेला नाही.) प्रत्येक विषयासाठी १० प्रश्न विचारण्यात आले आहेत.

https://www.research.net/r/Bridgecourseprestudy22 या सर्व्हे मंकी लिंकमधील प्रश्नावलीच्या

माध्यमातून माहिती संकलित करण्यात यावी.

• पुढील नियोजनाप्रमाणे सदर माहिती संकलित करण्यात यावी.


● माहिती संकलनाची उपरोक्त लिंक राज्यातील शाळांकरिता (विदर्भ वगळून) दि. १९/०६/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता सुरु करण्यात येईल व दि. २५/०६/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता बंद करण्यात येईल, त्यामुळे दिलेल्या वेळेतच सदर माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. 
● माहिती संकलनाची उपरोक्त लिंक विदर्भातील शाळांकरिता दि.२७/०६/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता सुरु करण्यात येईल व दि.०४/०६/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता बंद करण्यात येईल. त्यामुळे दिलेल्या वेळेतच सदर माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

माहिती संकलन प्रक्रिया:

१. प्रत्येक जिल्हयातील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांच्या मदतीने प्रस्तुत संशोधनासाठी माहिती संकलन करण्यात यावे. आपण सर्व अधिकारी व कर्मचारी हे शिक्षक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य करणारे असल्याने आपण सर्व विद्यार्थ्याकडून सदर प्रश्नावली सहजतेने, तटस्थपणे भरून घेऊ शकाल असा विश्वास आहे.

२. प्रस्तुत संशोधनासाठी माहिती संकलन करताना प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्याची माहिती संकलित करावी.

३. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी माहिती संकलित करताना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्याचा समावेश करावा, जेणेकरून विविध व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व संशोधन नमुन्यामध्ये होऊ शकेल.

४. माहिती संकलित करताना प्रत्येक इयतेतील मुले व मुली यांचे समप्रमाण ठेवावे. 

५. विद्यार्थ्यांची माहिती संकलित करीत असताना अधिकारी व कर्मचारी यांचेकडून विद्यार्थी Overlap होऊ नयेत यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्रपणे नियोजन करण्यात यावे.

६. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आपण ज्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली आहे. त्यांची यादी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेकडे पुढील नमुन्यात जमा करावी व स्वतःकडे देखील जतन करून ठेवावी.


student-survey-to-check-the-effectiveness-of-reconstructed-bridge-study

सेतू अभ्यास- इतर महत्वाचे घटक...


District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post