महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केला #महागाईभत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार
तुमचा पगार काढा काही सेकंदातच...
शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ
![]() |
आपला पगार calculate करून नक्की पहा |
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (DA Hike) वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट २०२२ पासून मिळणार आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. आतापर्यंत त्यांना ३१ टक्के महागाई भत्ता मिळत होता.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. अनेक राज्यांनी त्यांच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता दर वाढवण्यासाठी केंद्राच्या पावलावर पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना सध्या ३४ टक्के डीए मिळतो. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते..
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केला. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे आता #महागाईभत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे. pic.twitter.com/O24O3iuhPb
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 16, 2022
३४% नुसार आपला पगार calculate करून पहा
COMMENTS