कला,क्रीडा,कार्यानुभव,आरोग्य विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक व सुलभक यांचे राज्यस्तरीय विचारमंथन गट स्थापन केला जाणार आहे.
राज्यस्तरीय विचारमंथन गट स्थापन करणे - विषय - कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य
![]() |
राज्यस्तरीय विचारमंथन गट स्थापन करणे विषय - कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य |
Setting up of State Level Brainstorming Groups - Subjects - Arts, Sports, Work Experience, Health
प्रस्तुत कार्यालयातील कला, क्रीडा,कार्यानुभव,आरोग्य विभागाच्या वतीने सध्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचे विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.तसेच NEP task अंतर्गत सुद्धा विविध टास्क पूर्ततेच्या अनुषंगाने कृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तदअनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील कला, क्रीडा, कार्यानुभव,आरोग्य विषयासाठी सातत्याने सूरू असणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या विविध कृती कार्यक्रमासाठी राज्यभरातील अनुभवी, व्यासंगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, क्षेत्रीय अधिकारी यांचे वेळोवेळी शैक्षणिक सहाय्य व तज्ञत्व लागणार आहे.
कला,क्रीडा,कार्यानुभव,आरोग्य विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक व सुलभक यांचे राज्यस्तरीय विचारमंथन गट स्थापन केला जाणार आहे. व्हाट्सअप या समाज माध्यमाचा उपयोग करून हे गट स्थापन केले जाणार आहे. कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य विषयात रुची असणाऱ्या इच्छुक कार्यरत व सेवानिवृत्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक यांनी खाली दिलेल्या google लिंक वर नोंदणी करावी . नोंदणी केलेल्या शिक्षक व अधिकारी यांना वेळोवेळी कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य विषयाच्या संदर्भात प्रशिक्षण, कार्यशाळा, अभ्यासक्रम विकसन, प्रशिक्षण साहित्य विकसन, संशोधन यासाठी संधी देण्यात येईल. इच्छुकांना खालील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या गुगल लिंक वर माहिती भरता येईल.
१. नाव
२. पदनाम
३. शाळेचे नाव
४. संपर्कासाठी what’s app क्रमांक
५. संपर्कासाठी आपला ई-मेल आयडी
६. शैक्षणिक अर्हता
७. अध्यापनाचा विषय
८. शिकवत असलेल्या इयत्ता
९. अनुभव
१०.प्रशिक्षण, कार्यशाळा, पाठ्यक्रम विकसन अभ्यासक्रम विकसन, प्रशिक्षण साहित्य विकसन, संशोधन यावर आधारित आपण केलेले कामकाज
११. कला,क्रीडा,कार्यानुभव, आरोग्य या विषयांतर्गत आपण राबविलेले उपक्रम
१२. शैक्षणिक कार्यासाठी आपणास प्राप्त पुरस्कार
१३. कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य विषयाशी संबंधित विविध शैक्षणिक कार्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने व स्वेच्छेने तयार आहात काय ?
१४. कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य विषयाशी संबंधित विविध शैक्षणिक कार्यासाठी आपण ऑनलाइन व ऑफलाईन वेळ देऊ शकाल काय?
इच्छुकांना विचारमंथन गटासाठी नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरावा. कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य विषयाचे कामकाज पाहणाऱ्या डायट अधिकारी यांनी कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य विचारमथन गटासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांच्या तज्ञत्वांचा लाभ प्रस्तुत कला, क्रीडा विभागाच्या विविध शैक्षणिक उपक्रम व कृती यांना होईल. अधिक माहितीसाठी विभागातील अधिकारी सचिन चव्हाण, डॉ. ज्योती राजपूत यांच्याशी अनुक्रमे ९६२३०२७४५३ व ८८८८७३९८०७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. State-Level-Brainstorming-Groups-Arts-Sports-Work-Experience-Health
COMMENTS