-->

वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण

वरिष्ठ | व | निवड श्रेणी | online | प्रशिक्षण | २०२१-२२ | करिता | पात्र | प्राथमिक | माध्यमिक | शिक्षकांची | प्रशिक्षणासाठी | नाव  | नोंदणी | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration | वरिष्ठ | व | निवडश्रेणी | online | प्रशिक्षण | २०२१-२२ | करिता | पात्र | प्राथमिक | माध्यमिक | शिक्षकांची | प्रशिक्षणासाठी | नाव  | नोंदणी | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration | updates | अद्यावत माहिती | 1 जून 2022 पासून राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक,अध्यापक, प्राचार्य यांचे साठी वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण | वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार निवारण | वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२

1 जून 2022 पासून राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक,अध्यापक, प्राचार्य यांचे साठी वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार निवारण

 • नोंदणी केली होती परंतु यादी मध्ये नाव नाही.
 • प्रशिक्षण प्रकार बदलणे आहे.
 • युजर आयडी व पासवर्ड चा मेल अप्राप्त.
 • शाळेच्या वा विद्यालयाच्या नावामध्ये बदल.
 • इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मध्ये लॉगिन होत नाही.
 • प्रोफाइल अपडेट करत असताना अडचण आली.


महत्त्वाची सूचना...

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी SCRT, Maharashtra, Pune (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.  या पोर्टल मार्फत शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाकरिता शिक्षक Online नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी कशी करावी व त्याविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण याविषयीची माहिती देणारे पत्रक SCRT, Maharashtra, Pune (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) यांचेकडून नुकतेच निर्गमित करण्यात आलेली आहे.
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,
राज्यातील शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण ९४५४१ नोंदणी केलेल्या  प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण  (ई- कोर्स)  पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे  एकूण ५० ते ६०  तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता https://youtu.be/bOXSWx5NHlw या यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे. तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि.१ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.

मार्गदर्शक सत्र दि. १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता

Live-01-06-2022@11.00 a.m. वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शक सत्र
Live-01-06-2022@11.00 a.m
वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शक सत्र

https://youtu.be/bOXSWx5NHlwपरिपत्रक

 • प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे
 • प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना
 • प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रमाणपत्राबाबत महत्वाच्या सूचना
 • दैनिक शंका समाधान सत्र मिटिंग तपशील
 • प्रशिक्षण कसे पूर्ण करावेमार्गदर्शक व्हिडिओ 
 • प्रशिक्षण पूर्ण करावयाची वेबसाईट व ॲप्लीकेशन लिंक

⏩ 👉वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक

प्रेस नोट व अधिक माहितीसाठी  Download


For New Updates Join WhatsApp group

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण ॲप लिंक Infosys springboard

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण ॲप लिंक Infosys springboard
Download Infosys springboard

https://infosysspringboard.ausnz.onwingspan.com/en/login

Download Infosys springboardदुबार E-mail यादी

एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी ( प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.

दिलेल्या लिंकचा वापर करा- https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist2.aspxअवैध E-mail यादी

कृपया आपला Email आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला Email आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.

दिलेल्या लिंकचा वापर करा- https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist1.aspx 


नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया

 • आपले Email आयडी दुरुस्ती करून घ्यावे
 • अवैध E-mail यादी - E-mail चुकलेले आहेत ते दुरुस्त करावेत.
 • दुबार E-mail यादी -  एकच E-mail दोन व्यक्ती साठी वापरला आहे तो बदल करावा.  

दिलेल्या लिंकचा वापर करा- https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist2.aspx
वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी

यात प्रथम जिल्हा आणि नंतर तालुका निवडा.  शाळा यादी दिसेल त्यात शाळा click केल्यास त्यातील स्टाफ दिसेल.

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,
 • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
 • सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास  https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
 • सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी  स्थळ, ठराविक वेळ,  प्रत्यक्ष उपस्थिती यांची  मर्यादा असणार नाही.
 • यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.
 • सदर प्रशिक्षणाबाबत  इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.
 • अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.

वरीष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादीमध्ये आपले नाव व माहिती पडताळून पहावी खालील दुरुस्ती प्रक्रियामध्ये आपला नोंदणी क्र. टाकून माहिती  नक्की पडताळून पहावी...

प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया

नोंदणी दुरुस्ती प्रक्रियेतून...
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.

👉वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया


📌वेबसाईट : www.maa.ac.in

📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट: https://training.scertmaha.ac.in/

📌ट्विटर : https://twitter.com/scertmaha

📌फेसबुक : https://www.facebook.com/MahaSCERT


इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे मेसेजद्वारे कळविण्यात येईल.

निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण बाबत आपणास ज्या काही तांत्रिक अडचणी व शंका असतील त्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र
७०८, आर.बी.कुमठेकर रोड, पेरुगेट,
सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११०३०
Phone: ०२०-२४४७६९३८

वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण लॉगीन आयडी पासवर्ड 

(1) नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लॉगीन आयडी पासवर्ड, ईमेल आयडी वर मिळणार आहे.
(2) सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. 
(3) नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे द्वारे प्राप्त होणार आहे.


वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी

संदर्भ :- १) शासन निर्णय क्र. चवेआ-१०८९/१११/माशि-२, दि.२.०९.१९८९. २) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र. ४३ / प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१.
    उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे -

१. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेत स्थळास भेट द्यावी.

२. दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीस पात्र ठरतील.

३. दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

४. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोदणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ ते २३ डिसेंबर, २०२१ पर्यंत सुरू राहील. १५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यावावत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे देण्यात येतील.

६. प्रस्तुत वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत- गट क्र. १ प्राथमिक गट, गट क्र. २- माध्यमिक गट, गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट, गट क्र. ४ अध्यापक विद्यालय गट.

७. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

९. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय. डी. वर पाठविण्यात येतील.

१०. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.

११. प्रस्तुत वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

१२. वरिष्ठ व निवडश्रेणी या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१३. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.

१४. सदर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) - शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे, एकदा जमा केलेले वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी, यासंदर्भात परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.

१५. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.

१६. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन व निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

१७. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

१८. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ/ निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय/जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

१९. सदर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील पात्र शिक्षकांना आपल्या स्तरावरून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी साठीच्या सूचना पात्र शिक्षकांनी https://training.scertmaha.ac.in या लिंकवर क्लिक करून नोंदणी सुरु करावी

🠋
आपला शालार्थ आय. डी. नोंदवावा.
🠋
आपली जन्म दिनांक नोंदवा.
🠋
वापरात असणारा आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा.
🠋
नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP नोंदवून पडताळणी करून घ्यावी.
🠋
आपला प्रशिक्षण प्रकार निवडावा.
🠋
नोंदणी फॉर्म मधील आपली संपूर्ण माहिती अचूक नोंदवा.
🠋
आपला प्रशिक्षण गट निवडा
🠋
आपण भरलेल्या माहितीची पडताळणी करावी. दुरुस्ती/ बदल असल्यास Edit बटनावर क्लिक करून आवश्यक बदल करू शकता.
🠋
बदल/ दुरुस्ती नसल्यास | agree all above instructions. वरील चेक बॉक्स टिक मार्क (✔) करावी.
🠋
प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठीच्या उपलब्ध सुविधांपैकी आपणाकडे असलेल्या सुविधेमार्फत प्रशिक्षण शुल्क भरणा करावा. प्रशिक्षण शुल्क भरल्याचे चलन जतन करून ठेवावे.
🠋
शुल्क भरणा करणेसाठी Credit & Debit card, Internet Banking अथवा UPI Payment करता येईल.
🠋
प्रशिक्षण नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यास आपणास प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती ई-मेलद्वारे प्राप्त होईल.
🠋
ट्रेनिंग बाबत पुढील सूचना वेळोवेळी उपरोक्त संकेतस्थळावर व ई-मेलद्वारे देण्यात येतील.

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

 1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
 2. जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
 3. शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
 4. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
 5. एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
 6. शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
 7. मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१२ वर्षाची अर्हताकारी सेवा

या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.

अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

प्रशिक्षण शुल्क

प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाइन अदा करावे. एकदा जमा केलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
शुल्क ₹२०००प्रती प्रशिक्षणार्थी

प्रशिक्षण शुल्क

प्रशिक्षण शुल्क माफ करणे बाबत


शिक्षकांसाठी नोंदणी

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी सुरू करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी

निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी

वरिष्ठ वेतन  व निवड श्रेणी आँनलाईन प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया

प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी दि. ०५/०१/२०२२ रोजी समाप्त झाला आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी केली आहे, परंतु नोंदणी करताना काही चुकीची माहिती भरली गेली आहे. किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे. तर दुरुस्ती करण्यासाठी खालील link चा वापर करावा

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया या प्रक्रियेतून...

१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.

२. प्रशिक्षण गट बदलता येईल.

३. डबल नोंदणी रद्द करता येईल.

School Edutech Breaking News
नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया


वरिष्ठश्रेणी-व-निवडश्रेणी-प्रशिक्षण-नाव-नोंदणी करिता महत्वाचा मार्गदर्शन व्हिडीओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.वरिष्ठश्रेणी-व-निवडश्रेणी-प्रशिक्षण-नाव-नोंदणी

नाव नोंदणीसाठी 5 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी

वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत सर्व शासन निर्णय


   TAGS- varishtha vetan shreni prashikshan online nondani form 2022#varishtha vetan shreni prashikshan online form 2021#varishtha vetan shreni prashikshan online application 2022#varishtha vetan shreni prashikshan prastav#varishtha vetan shreni prashikshan list#varishtha vetan shreni prashikshan 2021#varishtha vetan shreni prashikshan training 2022#varishtha vetan shreni prashikshan online form 2021#varishtha vetan shreni prashikshan website#varishtha vetan shreni prashikshan training pune#varishtha vetan shreni prashikshan online form 2021#varishtha vetan shreni prashikshan online form 2022#varishtha vetan shreni prastav#varishtha vetan shreni list#varishtha vetan shreni 2021#varishtha vetan shreni prashikshan website#varishtha vetan shreni training pune#varishtha vetan shreni#varishtha prashikshan vetan shreni online form 2022#varishtha vetan prashikshan shreni online form 2022 nivad vetan shreni prashikshan online nondani form 2021#nivad vetan shreni prashikshan online form 2022#nivad vetan shreni prashikshan online application 2021#nivad vetan shreni prashikshan prastav#nivad vetan shreni prashikshan list#nivad vetan shreni prashikshan 2022#nivad vetan shreni prashikshan training 2021#nivad vetan shreni prashikshan online form 2022#nivad vetan shreni prashikshan website#nivad vetan shreni prashikshan training pune#nivad vetan shreni prashikshan online form 2020#nivad vetan shreni prashikshan online form 2018#nivad vetan shreni prastav#nivad vetan shreni list#nivad vetan shreni 2019#nivad vetan shreni prashikshan website#nivad vetan shreni training pune#nivad vetan shreni#nivad prashikshan vetan shreni online form 2019#nivad vetan prashikshan shreni online form 2019


   CATEGORIES
   13 टिप्पण्या

   If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

   थोडे नवीन जरा जुने

   POST ADS1

   POST ADS 2

   " href="#">Responsive Advertisement
   05 seconds remaining
   Skip Ad >