वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे अपडेट्स

वरिष्ठ | व | निवडश्रेणी | online | प्रशिक्षण | २०२१-२२ | करिता | पात्र | प्राथमिक | माध्यमिक | शिक्षकांची | प्रशिक्षणासाठी | नाव  | नोंदणी | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration | वरिष्ठ | व | निवडश्रेणी | online | प्रशिक्षण | २०२१-२२ | करिता | पात्र | प्राथमिक | माध्यमिक | शिक्षकांची | प्रशिक्षणासाठी | नाव  | नोंदणी | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration | updates | अद्यावत माहिती | 1 जून 2022 पासून राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक,अध्यापक, प्राचार्य यांचे साठी वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण | वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक | वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन व सूचना | Join Zoom Meeting वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन व सूचना

वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे अपडेट्स

वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे अपडेट्स
वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे अपडेट्स


वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण संदर्भात अनेक शिक्षकांच्या काही समस्या, शंका होत्या. यासंदर्भात शिक्षकांना उद्भवलेल्या आणि आमच्या पर्यंत पोहचलेल्या सर्व समस्या, प्रश्नांबाबत सविस्तर सारांश आपल्यासमोर मांडत आहे.

 

प्रश्न 1 :- काही तांत्रिक अडचणींमुळे ज्यांचे प्रशिक्षण वेळेत सुरू झाले नाही. किंवा प्रशिक्षण १ जुन ला सुरू केले, मात्र त्यानंतर प्रशिक्षण गट बदल्याने किंवा इतर कारणांमुळे प्रशिक्षण पुन्हा बंद झाले, अश्या शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे का?
समाधान- होय. ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण तांत्रिक अडचणींमुळे बंद होते, ज्या शिक्षकांनी यासंदर्भात ऑनलाईन तक्रार नोंदविली होती. अश्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. काळजी नसावी.

प्रश्न क्रमांक २:- स्वाध्याय अपलोड केले, अभिप्राय ही दिला मात्र अभिप्राय समोर दोन हिरव्या टिक मार्क येत नाहीत.
समाधान:-आपण स्वाध्याय अपलोड करून अभिप्राय द्यावा. दोन हिरव्या टिक झाल्या नाहीत, तरी काळजी नसावी. Scert कडे आपला अभिप्राय नोंदविला गेला आहे.

प्रश्न क्रमांक ३:- सर्व व्हिडिओ पाहिले, pdf वाचल्या, मात्र प्रशिक्षणाचा कालावधी (LEARNING HOUR) खूप कमी दिसत आहे.
समाधान :-आपल्या प्रोफाईल मध्ये जरी प्रशिक्षणाचा कालावधी कमी दिसत असेल, तरी काळजी नसावी. LEARNING PROGRESS STATUS COMPLETED असे दिसायला हवे.

प्रश्न क्रमांक ४:-व्हिडिओ पाहून ही, pdf file वाचूनही हिरवी डबल टिक येत नाही.
समाधान:-Recalculate progress या पर्यायावर क्लिक करावा. हिरवी डबल टिक येऊन जाईल.

प्रश्न क्रमांक ५:- प्रशिक्षण पुर्ण झाले, स्वाध्याय अपलोड केले, परीक्षाही दिली, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही?
समाधान :-ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण, चाचणी पुर्ण केली आहे. स्वाध्याय अपलोड केले आहेत, अश्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र मिळण्याची सुरुवात या आठवड्याच्या शेवटपर्यंत व्हावी, यासाठी scert अधिकारी प्रयत्नशील आहेत. काही अडचण निर्माण न झाल्यास याच आठवड्यापासून प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होईल, अन्यथा पुढील आठवड्यात प्रमाणपत्र मिळतील.

प्रश्न ६:- ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुवातीपासून व्यवस्थित सुरू आहे, प्रशिक्षणात कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, अश्या शिक्षकांना वाढीव वेळ मिळणार आहे का?
समाधान:-तूर्तास तरी नाही. ज्या शिक्षकांनी कोणतीही तांत्रिक अडचण नसतानाही प्रशिक्षण अद्याप पूर्ण केले नाही, अश्या शिक्षकांना तूर्तास तरी वेळ वाढवून दिली जाणार नाही.

( ज्या शिक्षकांना तांत्रिक अडचण आली नाही, मात्र काही गंभीर कारणांमुळे प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडत असेल, अश्या शिक्षकांनी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई शी संपर्क साधावा. मात्र योग्य कारण असावे.)

  • स्वाध्याय लिंक पेस्ट होत नाही ? यावर उपाय 
  • वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 21-22 परीक्षेचा निकाल कुठे पाहणार ? प्रमाणपत्राचे काय ? यावर उपाय 
  • वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 21-22 चाचणी (Test) कशी द्याल व केव्हा द्याल ?  यावर  उपाय 


स्वाध्याय लिंक तिथे अपलोड करणे- प्रत्येक स्वाध्याय pdf module 1ते 18तयार करून सेव करून ठेवा. मेल ओपन करून ठेवून गूगल ड्राईव्ह ला क्लिक करा.+वर क्लिक करा. क्रिएट न्यू मध्ये फोल्डर ला क्लिक करा. न्यू फोल्डर मध्येप्रशिक्षणाचे नाव टाइप करा. क्रिएट ला क्लिक करा.फोल्डर तयार होईल.फोल्डर ला क्लिक करा.empty फोल्डर दिसेल.+वर क्लिक करा.उपलोडमध्ये सर्व pdf क्रमाने एकेक documents मधून add करा.आता फोल्डर च्या उजवीकडे वर तीन टिंब आहेत त्यावर क्लिक करा. ट्रेनिंग फोल्डर खाली share वर क्लिक करा.who has access मध्ये Restrected  वर क्लिक करा.any one with the link वर क्लिक करा.link setting येते.त्यावर क्लिक केल्यावर permission updated येईल.नंतर लिंक सेटिंग मध्येसमोरील (-) असे चीन्हाला क्लिक करा.
Spring board च्या page वर अभिप्राय भरताना Your Response येतं,तेथे राईट क्लिक दाबून ठेवा, तुमची स्वाध्याय लिंक तिथे अपलोड झालेली दिसेल.

प्रशिक्षण शंका समाधान सत्र

प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दैनिक ( दि.०२ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत) सकाळी ११.०० ते ते १२.०० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रमांकावर दूरध्वनी करू नये अथवा ईमेल करू नयेत.


1000 लोक समाविष्ट होऊ शकाल
Join Zoom Meeting


Join Zoom Meeting वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन व सूचना
Join Zoom Meeting


Join Zoom Meeting

ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण महत्वाचे सूचना सत्र दि. १७ जून २०२२ सकाळी  १०.३० वा.





ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण महत्वाचे सूचना सत्र दि. ८ जून २०२२ 




ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण उद्बोधन सत्र दि. ३ जून २०२२




वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन व सूचना |
Instructions on Senior Pay Grade and Selection Grade Training System and Training

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये

सदरच्या नोंदणी केलेल्या सर्व शिक्षक /मुख्याध्यापक /प्राध्यापक/प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक खालीलप्रमाणे सुचना सर्व प्रशिक्षणार्थी यांना अवगत करण्यात यावेत.

प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे

·        नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यास https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login ऑनलाईन प्रशिक्षण हे या लिंकवर क्लिक करून सुरु करता येईल.

·        या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यास आवश्यक युजर आय. डी व पासवर्ड प्रशिक्षणार्थ्याने नावनोंदणी करत असताना पुरविलेल्या मेल आय. डी वर मेल प्राप्त होईल. ज्या प्रशिक्षाणार्थ्यांना त्यांनी ईमेल वर सदर तपशील प्राप्त होणार नाहीत, त्यांना https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर तक्रार नोंदविण्याची सुविधा दि. ०३ जून २०२२ नोंदविलेल्या पासून उपलब्ध होईल. अशा प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण पूर्ण करण्याची वेळ देखील वाढवून देण्यात येईल.

·        सदरचे प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १ जुन २०२२ पासून १ जुलै, २०२२ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.

·        सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ३० दिवसांच्या कालावधी मध्येच प्रशिक्षणार्थी याने पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही, याची नोंद सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.

·        प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये Infosys Springboard या नावाचे अॅप्लीकेशन प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून सदरच्या अॅपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे अॅप्लीकेशन हे

·        https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard या लिंकवरून देखील प्रशिक्षणार्थी डाऊनलोड करू शकतात.

·        प्राप्त युजर आय. डी. वा पासवर्ड च्या साह्याने प्रशिक्षणार्थी अॅप्लीकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून प्रणाली वर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू शकतात.

संगणक/लॅपटॉप वरून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीसाठीमार्गदर्शक सूचना PDF Download


प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे

·        शिक्षकांनी यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी (वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी) प्रशिक्षण असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.

·        तसेच यापूर्वी देखील प्रशिक्षण प्रकार बदल करणेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तरी देखील काही प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण प्रकार बदल करावयाचा असल्यास परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सुचना

·        सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य ( ३० मि.), चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे, स्वाध्याय पूर्ण करणे ( २ तास) तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे.

·        स्वाध्याय अपलोड करत असताना सदर स्वाध्यायावर प्रशिक्षणार्थी यांनी आपले नाव, रजिष्ट्रेशन नंबर, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व स्वतःची स्वाक्षरी करणे आवश्यक राहील. प्रशिक्षणार्थी याचे स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस START वर क्लिक करून प्रशिक्षण प्रणालीवर ऑनलाईन स्वाध्याय नोंदवावा. विहितवेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही, याची नोंद सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.

·        प्रशिक्षणामध्ये घटकांवर आधारित चाचणी सोडविण्यासाठी देखील विहित वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे विहित वेळेमध्येच सदरची चाचणी संबंधित प्रशिक्षणार्थ्याने पूर्ण करणे अनिवार्य आहे.

·        तसेच चाचणी ही घटकनिहाय असल्याने एका घटकाची चाचणी सोडविल्यानंतर प्रणाली वर Proceed To Next Section वर क्लिक करावे, कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व घटकांवरील चाचणी सोडवून झाल्यशिवाय Finish Test वर क्लिक करू नये, अन्यथा प्रशिक्षणार्थ्याची चाचणी बंद होऊन प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या प्रशिक्षणाची चाचणी पुन्हा देणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी.

·        स्वाध्याय व चाचणी सोडविताना घ्यावयाची आवश्यक काळजी ही सोबतच्या माहितीदर्शक चित्रफितीमध्ये सविस्तर विषद करण्यात आलेली आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.

·        सर्व मोड्यूल्सनिहाय (घटकनिहाय) चाचण्या मिळून एकूण ४०% गुण प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील; तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.

·        प्रशिक्षणार्थी यांनी प्रणालीवर व्यतीत केलेला वेळ व प्रशिक्षण कार्यक्रमाची वेळ (एकूण कालावधी), पाहिलेले व वाचलेले अध्ययन साहित्य, पूर्ण केलेले स्वाध्याय, चाचणी मधील प्राप्त गुण, इत्यादी या सर्वांचे मूल्यमापन केले जाणार आहे व त्यानंतरच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था प्रणालीमध्ये करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. प्रशिक्षाणार्थ्यांचे स्वाध्याय हे प्रकाशित केले जाऊ शकतात याची नोंद घ्यावी.

मोबाईलवरून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीसाठी मार्गदर्शक सूचना PDF Download


प्रशिक्षण प्रमाणपत्राबाबत महत्वाचे

·        प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली मध्येच उपरोक्त बाबी पूर्ण केल्यावरच डाउनलोड करता येणार आहे याची नोंद घेण्यात यावी.

·        सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रशिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी / इंग्रजी ) असेल तसेच व तेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे

·        याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठी मध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपल्या प्रोफाईल मधील नाव हे FIRST NAME या ठिकाणी आपले अचूक पूर्ण नाव मराठी मध्येच नोंदवावे तसेच Last Name मध्ये उपलब्ध असणारा क्रमांक हा प्रशिक्षणार्थ्याचा नोंदणी क्रमांक असणार आहे. सदरच्या नोंदणी क्रमांकामध्ये प्रशिक्षणार्थ्याने कोणताही बदल करू नये याची नोंद घ्यावी.

प्रशिक्षणा बाबत महत्वाच्या सुचना

·        सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी

·       https://youtube.com/playlist?list=PLFJ76Y6VBMZq4ZEsHdEKUVBCdczbqZ98h या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ आपण पाहू शकता. तसेच सोबत जोडलेल्या SOP ची देखील मदत घेऊ शकता. (मोबाईल SOP, Desktop SOP)

·        तसेच आपणास प्राप्त ई मेल मध्ये देखील सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठीच्या मार्गदर्शनपर व्हिडीओच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

·        कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी / स्वाध्यायाशी संबंधित व्हिडीओ, PDF आपल्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल वर अथवा इतर समाज माध्यमांवर ( Whats APP, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, ट्वीटर, वेबसाईट, इत्यादी) प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहील याची माहिती सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.

·        सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सुचना व महत्वपूर्ण बाबी या सर्व केवळ https://training.scertmaha.ac.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील.

·        सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन / निवड श्रेणीसाठी पात्र ठरतीलच असे नाही ; याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.

·        प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दैनिक ( दि.०२ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत) सकाळी ११.०० ते ते १२.०० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रमांकावर दूरध्वनी करू नये अथवा ईमेल करू नयेत.

·        तसेच प्रशिक्षणाबाबतीतील काही शंका अथवा प्रशिक्षण प्रकार बदल, ईमेल बदल अथवा इतर अनुषंगिक बदल याबाबत आवश्यक तक्रार निवारणासाठी आवश्यक फॉर्म व सूचना https://training.scertmaha.ac.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर दि.०३ जून २०२२ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

·        ज्या शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अध्यापक विद्यालयातील अध्यापक यांनी सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली नाही त्यांना सदर प्रशिक्षणासाठी नव्याने नावनोंदणीबाबत या कार्यालयामार्फत लवकरच सूचना निर्गमित करण्यात येतील.

दैनिक शंका समाधान सत्र मिटिंग तपशील

Join Zoom Meeting

Meeting ID: 95215685289
Passcode: SCERT
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत सूचना
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत सूचना

संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया समजावून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा…

  • वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावी?


  • वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?


  • वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – स्वाध्याय कसा सोडवावा? 

  • वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – चाचणी कशी सोडवावी?


  • वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण – अभिप्राय कसा द्यावा?



वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक



वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक
वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण
प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक


For New Updates Join WhatsApp group

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण ॲप लिंक Infosys springboard

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण ॲप लिंक Infosys springboard
Download Infosys springboard

https://infosysspringboard.ausnz.onwingspan.com/en/login

Download Infosys springboard






वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण  १ जून २०२२ पासून सुरू |मार्गदर्शक लाइव्ह सत्र


Live-01-06-2022@11.00 a.m. वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शक सत्र
Live-01-06-2022@11.00 a.m
वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शक सत्र



TAGS- varishtha vetan shreni prashikshan online nondani form 2022#varishtha vetan shreni prashikshan online form 2021#varishtha vetan shreni prashikshan online application 2022#varishtha vetan shreni prashikshan prastav#varishtha vetan shreni prashikshan list#varishtha vetan shreni prashikshan 2021#varishtha vetan shreni prashikshan training 2022#varishtha vetan shreni prashikshan online form 2021#varishtha vetan shreni prashikshan website#varishtha vetan shreni prashikshan training pune#varishtha vetan shreni prashikshan online form 2021#varishtha vetan shreni prashikshan online form 2022#varishtha vetan shreni prastav#varishtha vetan shreni list#varishtha vetan shreni 2021#varishtha vetan shreni prashikshan website#varishtha vetan shreni training pune#varishtha vetan shreni#varishtha prashikshan vetan shreni online form 2022#varishtha vetan prashikshan shreni online form 2022 nivad vetan shreni prashikshan online nondani form 2021#nivad vetan shreni prashikshan online form 2022#nivad vetan shreni prashikshan online application 2021#nivad vetan shreni prashikshan prastav#nivad vetan shreni prashikshan list#nivad vetan shreni prashikshan 2022#nivad vetan shreni prashikshan training 2021#nivad vetan shreni prashikshan online form 2022#nivad vetan shreni prashikshan website#nivad vetan shreni prashikshan training pune#nivad vetan shreni prashikshan online form 2020#nivad vetan shreni prashikshan online form 2018#nivad vetan shreni prastav#nivad vetan shreni list#nivad vetan shreni 2019#nivad vetan shreni prashikshan website#nivad vetan shreni training pune#nivad vetan shreni#nivad prashikshan vetan shreni online form 2019#nivad vetan prashikshan shreni online form 2019




District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post