इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र | Admit card | Hall ticket | Praveshpatr डाउनलोड साठी उपलब्ध.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)-परीक्षा 20 जुलै रोजी
Pre-Upper Primary Scholarship Examination (5th) and Pre-Secondary Scholarship Examination (8th) - 2022 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८. वी) दि. २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे.

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा
प्रवेशपत्र | Admit card | Hall ticket | Praveshpatr डाउनलोड

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र | Admit card | Hall ticket | Praveshpatr डाउनलोड साठी उपलब्ध.

शिष्यवृत्ती परीक्षा दि. २०/०७/२०२२ चे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या  लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.  शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गमित करावे. www.mscepuppss.in वरून थेट शाळा login करून प्रवेशपत्र download करू शकता. या  लिंक वर आपल्या शाळेचा  udise नंबर व password टाकून login करा. login झाल्यानंतर विद्यार्थी नावापुढे असलेल्या Hall Ticket ला click करून आपण त्या विद्यार्थ्याचे वैयक्तिक प्रवेश पत्र download करू शकता . सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित प्रवेश पत्र download करण्यासाठी  वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या
link चा वापर करून सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र एकत्रित  download करू शकता. अधिक माहिती करिता खालील login केल्यानंतरची स्क्रीन पहा.

विद्यार्थी आवेदन पत्रातील माहिती मध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास काय करावे ?

१. विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्याचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक, दिव्यांग व आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्याच्या नावासमोरील Imp Edit या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करावे.
२. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह puppsshelpdesk@gmail.com या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी ) २०२२ करीता केंद्रसंचालक, पर्यवेक्षक नियुक्ती व परीरक्षण (Custody) ठिकाण निश्चितीबाबत..

परीक्षा केंद्र निश्चितीबाबतची व्हिडीओ कॉन्फरन्स दि. ०५/०४/२०२२ मध्ये दिलेल्या सुचनांनुसार संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी परीक्षा केंद्र निश्चितीचे कामकाज पूर्ण कलेले आहे. सदर परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा. / शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई हे 'जिल्हा समन्वयक' म्हणून तसेच गटशिक्षणाधिकारी / वॉर्ड ऑफिसर हे 'तालुका समन्वयक' म्हणून काम पाहतील.

परीक्षा केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक व शिपाई नियुक्ती तसेच परीरक्षण (Custody) ठिकाण निश्चितीबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. 

(अ) केंद्रसंचालक नियक्ती :- प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद / शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका / शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (प./द/उ.) यांनी दिनांक ३०/०६/२०२२ रोजीपूर्वी विश्वास, प्रामाणिक, जबाबदार अशा केंद्रसंचालकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. दिनांक ३१/१२/२०२२ पूर्वी सेवानिवृत्त होत नसलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक यांची केंद्रसंचालक म्हणून नियुक्ती करावी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्यासच कार्यक्षम सेवाज्येष्ठ उपशिक्षकाची केंद्रसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात यावी. एकदा नियुक्त केलेल्या केंद्रसंचालकांच्या नावात शक्यतो बदल करण्यात येऊ नये.

(ब) उपकेंद्रसंचालक :- केंद्रावर प्रविष्ठ होणाऱ्या परीक्षार्थ्यांची संख्या ३०० पेक्षा अधिक असल्यास केंद्रसंचालकांनी एका उपकेंद्रसंचालकाची नियुक्ती करावी. उपकेंद्रसंचालकपदी पदवीधर शिक्षकाची अथवा इतर सेवाजेष्ठ व अनुभवी उपशिक्षकाची नियुक्ती लेखी आदेश काढून करावी.

(क) पर्यवेक्षक :- पर्यवेक्षकांची नियुक्ती केंद्रसंचालकांनी परीक्षेपूर्वी किमान १ आठवडा आधी लेखी आदेश काढून करावी, प्रत्येक २४ परीक्षार्थ्यांमागे १ याप्रमाणे पर्यवेक्षक मान्य राहतील. केंद्रसंचालकांनी परीक्षा केंद्रापासून आठ किलोमीटरच्या क्षेत्रात असणाऱ्या मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील इ. ९ वी ते १२ वी साठी अध्यापन करणान्या शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करावी. पुरेसे पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांची राहिल. इ. ९ वी ते १२ वी मधील शिक्षक पुरेशा संख्येने उपलब्ध न झाल्यास इ. ५ वी ते इ. ८ वी साठी अध्यापन करणाऱ्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करावी. मात्र शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिकविणाऱ्या शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये, उपरोक्तनुसार पर्यवेक्षकांव्यतिरीक्त अतिरीक्त पर्यवेक्षक पुढीलप्रमाणे मान्य राहतील,

  1. परीक्षार्थी संख्या १०१ ते ३०० पर्यंत- अतिरिक्त पर्यवेक्षक संख्या- एक
  2. परीक्षार्थी संख्या ३०१ ते ५०० पर्यंत-  पर्यंत-अतिरिक्त पर्यवेक्षक संख्या- दोन
  3. परीक्षार्थी संख्या ३०१ ते ५०० पर्यंत- अतिरिक्त पर्यवेक्षक संख्या- दोन तीन

अतिरीक्त / जादा पर्यवेक्षकांचा उपयोग परीक्षागृहात जाऊन प्रश्नपत्रिका वितरीत करणे, परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका संकलित करणे, इतर पर्यवेक्षकांना पर्यायी व्यवस्था म्हणून पर्यवेक्षण करणे या कामांसाठी करावा, तसेच परीक्षेच्या लिपीकवर्गीय कामासाठीही उपयोग करून घ्यावा.

(ड) शिपाई :- शिपाई / परिचर यांच्या नियुक्त्या केंद्रसंचालकांनी पुढील नियमानुसार कराव्यात,

१. प्रत्येक केंद्रास १०० परीक्षार्थीींमागे १ शिपाई / परिचर मंजूर राहील.

२. ५०० पेक्षा जास्त परीक्षार्थी संख्या असल्यास जास्तीत जास्त पाच व अतिरिक्त दोन अशी एकूण ७ शिपाई / परिचर पदे मंजूर राहतील (उदा. एका केंद्रावर ८५२ परीक्षार्थी असल्यास ५ + २ ७ याप्रमाणे शिपाई / परिचर पदे मंजूर होतील.)

३. कोणत्याही परिस्थितीत ७ पेक्षा जास्त शिपाई / परिचर पदे मंजूर करता येणार नाहीत.

४. परीक्षार्थींना पाणी देणे व परीक्षा विषयक सर्व कामांसाठी शिपाई / परिचर यांचा उपयोग करून घ्यावा. परीक्षेच्या कामासाठी कोणत्याही व्यक्तीची नेमणूक करताना सदर परीक्षेसाठी संबंधित केंद्रावर त्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक प्रविष्ठ झालेले नाहीत याची खातरजमा करूनच त्यांच्या नेमणुका करण्यात याव्यात. त्याबाबत संबंधित कर्मचान्यांकडून लेखी हमीपत्र घ्यावे.

(ई) परीरक्षण (Custody) ठिकाणाबाबत सूचना :- परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हास्तरावर दि. १३/०७/२०२२ रोजीपर्यंत पोहोच करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे बॉक्स उतरवून घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा आपल्या कार्यालयात मध्यवर्ती व सुरक्षित ठिकाणाची (Custody) दि. ३०/०६/ २०२२ पर्यंत निश्चिती करुन सदर ठिकाण व प्रश्नपत्रिका ताब्यात घेणाऱ्या अधिकान्याचे नाव, पदनाम व दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील परिषदेमार्फत विचारणा झाल्यानंतर कळविण्यात यावा.

पावसाळ्याचे दिवस असल्याने परीरक्षण (Custody) ठिकाणाची निवड करताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून योग्य ती खबरदारी घ्यावी.

संदर्भ परिपत्रक पहा-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दि. 27/06/२०२२

वेबसाईट-www.mscepune.in


2222


District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.




Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post