दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप मिळण्याबाबत..

शिक्षक व शिक्षकेत्तरांना दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप मिळण्याबाबत..

दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप मिळण्याबाबत..
दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप मिळण्याबाबत..

संदर्भ :- श्री. अनिल बोरनारे, प्रदेश सहसंयोजक, भाजपा शिक्षक आघाडी यांचे दि. १४.०७.२०२२ रोजीचे निवेदन

उपरोक्त विषयांकित संदर्भिय पत्रान्वये श्री. अनिल बोरनारे, प्रदेश सहसंयोजक, भाजप शिक्षक आघाडी यांनी काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप देण्यात येत नसल्याबाबत या कार्यालयास निवेदन दिले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नुसार दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक महिन्याला सॅलरी स्लिप देणेबाबत बंधनकारक असल्याबाबत नमुद केले असून याप्रकरणी सर्व शाळांना सूचना देण्याबाबत विनंती केली आहे. (प्रत संलग्न)

तरी आपल्या अधिनस्त सर्व अनुदानित / विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील प्राचार्य / मुख्याध्यापक यांना शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-याचे दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक महिन्याला वेतन स्लिप देण्याबाबत शासन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत तात्काळ निर्देश देण्यात यावे.

असे परिपत्रक ( संदीप संगवे) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई, विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय, मुंबई, जवाहर बालभवन, तळमजला नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई ४०० ००४ दुरध्वनी क्र. ०२२/२३६३००८९/८६ ईमेल- dydemumbai@yahoo.com जा.क्र. शिउसं/माध्य/ २०२२ / 7368 निर्गमित करण्यात आले आहे.

मुंबई,ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे  सर्विस बुक दुय्यम प्रत व दरमहा सॅलरी स्लिप देण्याबाबत आदेश

शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनींनो

सर्विस बुक हा आपला अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे  प्रत्येक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांजवळ सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत असणे आवश्यक आहे असा आग्रह स्व. मोते सर  नेहमी धरायचे अनेक संस्था व शाळांकडून सर्विस बुक ची दुय्यम प्रत देण्याबाबत टाळाटाळ केली जात होती. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्यावर मी मा. शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन सर्विस बुक व सॅलरी स्लिप मिळत नसल्याची तक्रार केली व निवेदन दिले. आज मा. शिक्षण उपसंचालक यांनी याबाबत कार्यवाही करीत मुंबईसह ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व ज्यु. कॉलेज यांना याबाबत आदेश दिले आहेत. आदेशाची कॉपी सोबत देत आहे त्याचे अवलोकन करावे. हा आदेश डावलून जर कुणी सर्विस बुक दुय्यम प्रत व दरमहा सॅलरी स्लिप देत नसेल तर माझ्याकडे तक्रार करा. हा आदेश अत्यंत महत्वाचा असल्याने सर्व शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक असल्याने आपल्या शाळेच्या ग्रुपवर व अन्य शैक्षणिक ग्रुप तसेच वैयक्तिक इतरांना शेअर करावा.

परिपत्रक- परिपत्रक पहा / डाऊनलोड करा

अनिल बोरनारे
प्रदेश सहसंयोजक
भाजपा शिक्षक आघाडी


1 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती? | How to Calculate annual increment
1 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती?
How to Calculate Annual increment


आपल्या  वेतनाविषयी अधिक माहिती...


District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post