वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण - अंतिम तारीख जाहीर...
![]() |
वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण - अंतिम तारीख जाहीर... |
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ दिनांक ०१ जून २०२२ पासून राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरुपात यशस्वीरीत्या सुरु आहे.
राज्यात एकूण ९४,५४१ प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक १४.०७.२०२२ रोजी पर्यंत ५२,५५१ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण दि. ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करावे.
तथापि ज्या प्रशिक्षाणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार या मध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे, अशा प्रशिक्षणार्थ्याना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.
तसेच सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना सूचित करण्यात येते की दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मार्फत “सेवा अद्ययावतीकरण” या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये. दिनांक २५ जुलै,२०२२ पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु असेल, तरी याची नोंद घेण्यात यावी.
सदर सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच प्रशिक्षणाच्या सर्व अद्ययावत सूचना या https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण उपयुक्त लिंक्स
प्रशिक्षण शंका समाधान
समाधान- होय. ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण तांत्रिक अडचणींमुळे बंद होते, ज्या शिक्षकांनी यासंदर्भात ऑनलाईन तक्रार नोंदविली होती. अश्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. काळजी नसावी.
समाधान:-आपण स्वाध्याय अपलोड करून अभिप्राय द्यावा. दोन हिरव्या टिक झाल्या नाहीत, तरी काळजी नसावी. Scert कडे आपला अभिप्राय नोंदविला गेला आहे.
समाधान :-आपल्या प्रोफाईल मध्ये जरी प्रशिक्षणाचा कालावधी कमी दिसत असेल, तरी काळजी नसावी. LEARNING PROGRESS STATUS COMPLETED असे दिसायला हवे.
समाधान:-Recalculate progress या पर्यायावर क्लिक करावा. हिरवी डबल टिक येऊन जाईल.
समाधान :-ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण, चाचणी पुर्ण केली आहे. स्वाध्याय अपलोड केले आहेत, अश्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र मिळण्याची सुरुवात या आठवड्याच्या शेवटपर्यंत व्हावी, यासाठी scert अधिकारी प्रयत्नशील आहेत. काही अडचण निर्माण न झाल्यास याच आठवड्यापासून प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होईल, अन्यथा पुढील आठवड्यात प्रमाणपत्र मिळतील.
प्रश्न ६:- ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुवातीपासून व्यवस्थित सुरू आहे, प्रशिक्षणात कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, अश्या शिक्षकांना वाढीव वेळ मिळणार आहे का?
समाधान:-तूर्तास तरी नाही. ज्या शिक्षकांनी कोणतीही तांत्रिक अडचण नसतानाही प्रशिक्षण अद्याप पूर्ण केले नाही, अश्या शिक्षकांना तूर्तास तरी वेळ वाढवून दिली जाणार नाही.
प्रशिक्षण शंका समाधान सत्र
प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दैनिक सकाळी ११.०० ते ते १२.०० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रमांकावर दूरध्वनी करू नये अथवा ईमेल करू नयेत.