टी ई टी पात्रता संपादणूक रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ आय डी गोठविण्यात आल्यामुळे त्यांचे माहे ऑगस्ट चे वेतन न काढण्याचे आदेश दिले आहेत
TET Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतन रोखले
TET Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतन रोखले |
TET Scam : मा संचालक यांचे पत्रानुसार टी ई टी पात्रता संपादणूक रद्द झालेल्या विभागातील शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबधित कर्मचाऱ्यांचे शालार्थ आय डी गोठविण्यात आल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट चे वेतन न काढण्याचे आदेश दिले आहेत
शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे - परिपत्रक
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टी.ई.टी.) परीक्षा २०१९ (परीक्षा दि. १९ जानेवारी, २०२०) या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवाराची संपादणूक रद्द करणे व शास्ती निश्चित करणे याबाबत आयुक्त परीक्षा परीषद,पुणे यांचेकडून दि.०३.०८ २०२२ अन्वये ७८७४ अपात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली होती. अनुदानित/विना अनुदानित शाळेत कार्यरत असल्यास व सदर सेवेच्या अनुषंगाने त्यांना शालार्थ आयडी प्रदान केलेला असल्यास शिक्षण संचालक त्यांनी त्यांचे स्तरावरुन प्रथमतः सदर शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात यावेत असे निर्देश होते.
बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक म्हणून नोकरी मिळवलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे.महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेत २०१९ मध्ये गैरप्रकार झाला होता. जिल्ह्यात ६१४ जणांकडे टीईटी परीक्षेचे बोगस प्रमाणपत्र आहे. त्यामुळे संबंधितांवर आजीवन परीक्षा बंदीची कारवाई झाली आहे.
शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे - परिपत्रक
शिक्षण विभागाने शिक्षकांचे ऑगस्टचे वेतन थांबवण्यासह भविष्यात शाळांनी संबंधित शिक्षकांचे नाव वेतन देयकात समाविष्ट करू नये, असे आदेश शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांनी दिले आहे.या बाबतचे आदेश काढले आहेत. या संदर्भात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, भविष्य निर्वाह निधी पथक, महापालिकांचे प्रशासन अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, कटक मंडळांचे मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे.
टीईटी परीक्षा २०१९ मध्ये झालेल्या गैरप्रकारातील समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे आणि कारवाई निश्चित करण्यासंदर्भात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून प्राथमिक शिक्षण संचालनालयाला उमेदवारांची यादी देण्यात आली. तसेच या यादीतील परीक्षार्थी जिल्हा परिषद किंवा खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळेत कार्यरत असल्यास आणि या सेवेच्या अनुषंगाने त्यांना शालार्थ आयडी प्रदान केलेला असल्यास शिक्षण संचालकांनी त्यांच्या स्तरावरून पुढील आदेशापर्यंत शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेच्या यादीतील ७ हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
TET Scam : Teacher Eligibility Test Scam Withheld Salary of Teachers
TET Scam: According to the letter of the director, the principal of the school in where the TET eligibility test was canceled has ordered not to withdraw the salary of the employees for the month of August as the school IDs of the concerned employees have been frozen.
Director of Education Directorate of Primary Education Maharashtra State Pune - Circular
The Commissioner Examination Board, Pune regarding cancellation of admission and determination of punishment of the candidate involved in the malpractice in the Maharashtra Teacher Eligibility (TET) Examination 2019 (examination dated January 19, 2020) .The list of 7874 ineligible candidates was received b yDated 03.08.2022. If working in an aided/unaided school and if they have been issued a school ID in pursuance of the said service, then the Director of Education at their level first directs that the said school ID be frozen till further orders.
Action has been initiated against those who got jobs as teachers on the basis of bogus certificates. There was a malpractice in the Maharashtra Teacher Eligibility Test (TET) in 2019. 614 persons in the district have bogus TET exam certificate. Therefore, life-long examination ban action has been taken against the concerned.
Director of Education, (Secondary & Higher Secondary) State of Maharashtra, Pune - Circular
The Education Officer, Superintendent of Pay Squad has ordered that the schools should not include the names of the concerned teachers in the salary payment in future along with stopping the August salary of the teachers. In this regard, letters have been sent to all the Divisional Deputy Directors of Education, Primary Education Officers of Zilla Parishads, Provident Fund Teams, Administrative Officers of Municipalities, Municipalities, Municipal Councils, Chief Officers of Cuttack Mandals.
A list of candidates was given to the Directorate of Primary Education by the Commissioner of the Examination Council for canceling the edits and determining action against the candidates involved in malpractices in the TET Examination 2019. Also, if the examinees in this list are working in Zilla Parishad or private aided, partially aided, unaided schools and they have been provided school ID in accordance with this service, the director of education has been instructed by the government to freeze the school ID from their level till further order. In this background, 7 thousand 874 candidates in the examination council list have been disqualified due to misconduct.
आपल्या वेतनाविषयी अधिक माहिती...
- Salary /DA Calculator सात महिन्याचा थकबाकीने मिळणारा महागाई भत्ता फरक
- 1 जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती? | How to Calculate annual increment
- कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार.... साडे दहा किंवा 11 महिन्याचे...
- नवीन महागाई भत्त्यानुसार मिळणारा पगार
- दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप मिळण्याबाबत..
COMMENTS