5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची 5th and 8th Scholarship Exam FINAL Answer Key या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. ३१ जुलै, २०२2 रोजी झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची (Scholarship Exam Final Answer Key) दि.२० सप्टेंबर २०२२ प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची सदर दिलेली उत्तरसूची (Scholarship Exam Final Answer Key) उपलब्ध करून देण्यात येत आहे.
५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam FINAL Answer Key pdf
![]() |
5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची 5th and 8th Scholarship Exam FINAL Answer Key pdf |
अंतिम उत्तरसूची बाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. Download Here
रविवार दि. 31 जुलै, 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. १८ ऑगस्ट, २०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे ती अंतिम उत्तरसूची खालील प्रमाणे आहे.
अंतिम उत्तरसूची बाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. Download Here
५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती पेपर | अंतिम उत्तरसूची Link |
---|---|
पाचवी शिष्यवृत्ती पेपर १ | Scholarship Exam Answer Key |
पाचवी शिष्यवृत्ती पेपर २ | Scholarship Exam Answer Key |
आठवी शिष्यवृत्ती पेपर १ | Scholarship Exam Answer Key |
आठवी शिष्यवृत्ती पेपर २ | Scholarship Exam Answer Key |
COMMENTS