--> या शैक्षणिक वर्षापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय परीक्षा घेणार Tilak Maharashtra University Activities - Examination | School Edutech

या शैक्षणिक वर्षापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय परीक्षा घेणार Tilak Maharashtra University Activities - Examination

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे शालेय अभ्यासक्रमास अनुलक्षून घेण्यात येणाऱ्या विविध विषयांच्या परीक्षा त्यापैकीच आहे

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ गेली १० दशके शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे शालेय अभ्यासक्रमास अनुलक्षून घेण्यात येणाऱ्या विविध विषयांच्या परीक्षा हया त्यापैकीच एक उपक्रम होय. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांचा पाया अधिक पक्का व्हावा, त्यांचे सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन व्हावे व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने या परीक्षांची आखणी करण्यात आलेली आहे.

या शैक्षणिक वर्षापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय  परीक्षा घेणार Tilak Maharashtra University Activities - Examination
Tilak Maharashtra University Activities - Examination

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उपक्रम - परीक्षा 

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय परीक्षा शाळा, विद्यार्थी व पालक वर्गाध्ये मान्यता पावल्या आहेत. या परीक्षांना आपल्या शाळेतील विद्याथ्र्यांचा उत्तम प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे. सोबत सत्र फेब्रुवारी २०२३ परीक्षांचे वेळापत्रक पाठवित आहोत. या परीक्षांच्या संदर्भात काही महत्वाची माहिती खाली दिली आहे. या सर्व माहितीची नोंद घ्यावी व या उपक्रमात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून खालील नवीन उपक्रम / परीक्षा सुरु करीत आहोत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

सन २०२१ २०२२ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शालेय प्रसार परीक्षा विभागातर्फे ऑन लाईन / ऑफ लाईन परीक्षा घेण्यात आल्या. सहभागी झालेल्या सर्व शाळांचे आणि विद्याथ्र्यांचे मनःपूर्वक धन्यवाद।

कोविडच्या संकटानंतर ऑफलाईन परीक्षा घेणे हे आपल्या सर्वांसाठी एक आव्हान होते. विशेषतः सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांनी या परीक्षेचा निकाल पाहून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्वयंमुल्यमापन करावे असे वाटते.

  1. पुर्वीच्या तुलनेत परीक्षेसाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
  2. विद्यार्थ्यांना पूर्ण तीन तास बसून १०० मार्कांचे लेखी पेपर लिहण्याची सवय कमी झाली आहे.
  3. विद्यार्थ्यांना प्रश्नाचे अर्थ समजले नाहीत असे दिसून येते. काही विद्यार्थ्यांनी आहे तसे प्रश्न लिहून काढले आहेत.
  4. जे प्रश्न येत नाहीत ते विचार करून आठवून सोडवायला हवे होते, परंतू आहे तसेच सोडून दिले आहेत. 
  5. सोपी गणिते, मराठी शुद्धलेखन, इंग्रजी व्याकरण Spelling, इ. गोष्टीमध्ये विद्यार्थी कमी पडत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम एकूण गुण, टक्केवारी कमी होण्यावर झाला आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी झाल्याचे जाणवते.
  6. विद्याथ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी आणि विद्यार्थ्यांचा सराव व्हावा हाच केवळ हेतू आहे. 
  7. इ. ४ थी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी कोणत्याही इयत्तेची परीक्षा देऊ शकतात.
  8. टि.म.वि. च्या परीक्षांना मुलांना बसवल्यानंतर त्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी फायदा होतो. तसेच परीक्षा दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

कोविडच्या संकटातून बाहेर पडताना या दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे खुप शैक्षणिक नुकसान झालेले आहे. या सर्वांमधून बाहेर पडून आपल्याला मुलांना पुन्हा प्रवाहात आणावे लागेल. यासाठी सर्व शिक्षकांनी व पालकांनी मिळून प्रयत्न करूयात. सोबत सत्र सप्टेंबर २०२२ चा निकाल व प्रमाणपत्र पाठवत आहे. माहितीपुस्तिका व परीक्षा कार्यक्रम सर्व शाळांना कळविला जाईल. सत्र फेब्रुवारी २०२३ परीक्षा कार्यक्रम साधारण या अनुषंगाने असेल.
असे परिपत्रक दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी अजित खाडीलकर, (कार्यवाह) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुकुंदनगर, गुलटेकडी, पुणे- ४११०३७, शालेय प्रसार परीक्षा विभाग दूरध्वनी: ०२०-२४४०३०६३, २४६०३०९० ईमेल tmvshaleyaprasar@gmail.com वेबसाईट- www.tmv.edu.in/shaleyapariksha यांचे कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहे.

फेब्रुवारी २०२३ सत्रातील परीक्षा कार्यक्रम


वार्षिक कार्यक्रम 2023


शाखा

सांगली टि.म.वि. सांगली कॅम्पस, वसंतदादा इंडस्ट्रियल इस्टेट, केसरी कार्यालयाजवळ, सांगली- ४१६४१६, दूरध्वनी (०२३३) २३१०८३८, मोबाईल ७५८८५८८५७३

प्रचारक

  • श्री. किशोर चव्हाण (खामगाव, बुलढाना ) मो. क्र. ९८९०७६३५८६
  • अँड. दिपिका सराफ नृत्यकला (प्रचारक व भरतनाट्यम् नृत्यकला) (न्यू पनवेल, रायगड) ९८३३८८९१२०
  • श्रीमती रेश्मा गोडांबे नृत्यकला (प्रचारक ) मो. क्र. ९३७१७९५०५७

विभागीय कार्यालय

औरंगाबाद - मा. मथुरादास देशमुख
आविष्कार बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ, प्लॉट नं. २, देवगिरी स्नेह अपार्टमेंट, रोशन हाउसिंग सोसा, गारखेडा परिसर,
औरंगाबाद ४३१००५
दूरध्वनी ०२४०-६९९४०१६ / मोबाईल ९९६०२९०००७, E-mail-mr.mvd53@rediffmail.com

नाशिक- मा. गौरी जोशी
सुगम संस्कृतम् रिसर्च अँड करिअर डेव्हलपमेंट सेंटर, ११ बालाजी पॅलेस, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक ४२२००९,
दूरध्वनी ०२५३-२३७०३५९, २३९५९२५, मोबाईल ९८८१०७५९२५, ९८९०४४५९२५, E-mail msugamtmv@gmail.com

जळगाव - मा. योगेश लाठी
आय.जी.एम. कॉप्युटर एज्युकेशन, लाठी प्लाझा, शाहू मार्केट समोर, गणेश कॉलनी रोड, जळगाव - ४२५००१, दूरध्वनी (०२५७) २२४१८५१, मोबाईल ९८२२४६४९३१ E-mail - igmjalgaon@gmail.com

मुंबई - मा. भूषण पिंपळे
श्री. सिद्धीविनायक इंन्फोटेक, शॉप नं. ६७, पहिला मजला, साई कृपा मॉल, एल.टी. रोड, दहिसर स्टेशन समोर, दहिसर (वेस्ट), मुंबई ४०००६८, दूरध्वनी (०२२)२८४८९९०५, मो.९३२४६८०८८१,
E-mail bhushanpimple@vahoo.co.in

पिंपरी-चिंचवड - मा. शकुंतला माटे
शाविमा लॅग्वेज इन्स्टिटयूट, प्लॉट नं १७, 'समर्थ' श्रीधरनगर, माटे शाळेजवळ, चिंचवड, पुणे ४११०३३
मोबाईल ९८२२८०६६८७, ९८२२८६८०७७ E-mail - indrayanipisolkar@yahoo.com

रायगड (महाड) - मा. अनिल सकपाळ
सुसंस्कार शैक्षणिक चॅरिटेबल ट्रस्ट, संस्कार कुंज, नवेनगर, मु.पो.ता. महाड, जि. रायगड ४०२३०१, दूरध्वनी - (०२१४५) २२६३३७, मोबाईल ९५२७१०४४२८ E-mail - anilsakpal357@gmail.com

विभागीय कार्यालय

१. शाळांना (केंद्रांना) तत्पर सेवा मिळावी, टपालाद्वारा / कुरीयरने होणारा खर्च, विलंब व अनिश्चितता टाळण्याच्या उद्देशाने काही निवडक जिल्हयांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या शाखा / विभागीय केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याची सविस्तर माहिती माहितीपुस्तिकेत सुरुवातीस देण्यात आली आहे.

२. या केंद्रांवर परिसरातील / जिल्हयातील शाळांसाठी खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तरी शाळांनी त्याचा लाभ घ्यावा. • परीक्षा याद्या व शुल्क स्वीकारणे. • परीक्षा साहित्य शाळांना / केंद्रांना वितरित करणे. • परीक्षा कालावधीत शाळांना / केंद्रांना भेटी देणे. • परीक्षा झाल्यानंतर शाळांतून / केंद्रांतून येणाऱ्या उत्तरपत्रिका स्वीकारणे. परीक्षांचा निर्णय व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र शाळांना वितरीत करणे. • पुस्तक विक्री, विविध मेळावे व कार्यशाळा यांचे आयोजन. • परीक्षांबाबत शाळांच्या शंका, सूचना, तक्रारी सोडविण्यासाठी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून काम पाहणे.

३. विद्यापीठाच्या शाखा / विभागीय कार्यालयाच्या परिसरातील शाळांनी केंद्रासाठी अथवा परीक्षांच्या सर्व प्रकारच्या कामांसाठी पुणे मुख्य कार्यालयाशी संपर्क न साधता त्या जिल्हयातील / परिसरातील विभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा.

४. ज्या केंद्रांच्या जवळपास शाखा / विभागीय कार्यालये नाहीत अशा केंद्रांनी परीक्षांबाबत पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. शाखांमधून किंवा विभागीय कार्यालयातून चालणा-या सर्व कामावर तसेच सर्व विषयाच्या परीक्षांवर विद्यापीठाचे संपूर्ण नियंत्रण राहील. विभागीय कार्यालय हे विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून काम करतील. विभागीय कार्यालयांना विद्यापीठाकडून सर्व कामकाजासाठी मानधन दिले जाते. त्यामुळे विद्यापीठ शुल्काव्यतिरीक्त इतर कोणतीही जादाची रक्कम शाळांनी विभागीय कार्यालयास देऊ नये, भविष्यात इतरही जिल्हयांमध्येही मागणीनुसार विभागीय कार्यालय सुरू करण्यात येतील.

प्रचारक

विद्यापीठाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या या विविध विषयांच्या परीक्षांबाबतचा उपक्रम जास्तीत जास्त शाळांना माहीत व्हावा या उद्देशाने विद्यापीठ प्रचारक नियुक्त करीत आहे. नव्याने नोंदणी करणा-या शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार प्रचारकांना मानधन देण्यात येईल. इच्छुक व्यक्तींनी दूरध्वनीवरून वा प्रत्यक्ष विभागाशी संपर्क साधावा. आपल्या शंका, सूचना, तक्रारी यांचे जलद निवारण करण्यासाठी खालील व्यक्तिंशी संपर्क साधावा.

समन्वयक

सारिका तांबे ९९७५१९२७६५
पौर्णिमा कुलकर्णी ९७६५६०४५१८
शलाका मुळे ९८५०५६३३१५
प्रज्ञा रासकर ८३९०९७२००६

प्रास्ताविक

शालेय स्तरावरील इ. ४ थी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच इंग्रजी, गणित, विज्ञान इ. विषयांच्या अभ्यासाचा त्यांचा पाया पक्का व्हावा या हेतूने टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दरवर्षी इंग्रजी, गणित, विज्ञान, संस्कृत, मराठी भाषा इत्यादी विषयांच्या परीक्षा वर्षातून फेब्रुवारी / सप्टेंबर या महिन्यांत घेतल्या जातात. तळागाळातील सर्वांना शिक्षण मिळावे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन कावे या उद्देशाने विद्यापीठ या परीक्षांचे आयोजन करीत असते. या परीक्षांचा अभ्यासक्रम शासनाने तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमास उपयुक्त व पूरक असल्याने या परीक्षा विद्यार्थ्यांध्ये लोकप्रिय झालेल्या आहेत. शाळांधील परीक्षांच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी या परीक्षांचा अभ्यास प्रेरक ठरला आहे. शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्याथ्यांनी विद्यापीठाच्या या परीक्षांचा उपयोग शालान्त परीक्षेच्या तयारीसाठी झाल्याचे अभिमानाने नमूद केलेले आहे. गेली अनेक वर्षे शालेय विद्याथ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे काम या परीक्षांच्या माध्यमातून विद्यापीठ करीत आहे. इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यम / कॉन्व्हेंट शाळांसाठी उच्चस्तर व मराठी माध्यमासाठी निम्नस्तर अशा स्वतंत्र परीक्षांचे आयोजन केले जाते.

बहुसंख्य शाळांच्या मागणीनुसार संस्कृत विषयाप्रमाणेच हिन्दी विषयाच्या परीक्षा सुरु केल्या आहेत तसेच, शालेय स्तरावर परदेशी भाषांचे ज्ञान अवगत व्हावे, लहान वयातच नवीन भाषेची गोडी निर्माण व्हावी यासाठी जपानी भाषेचे सुरुवातीपासून मार्गदर्शन व्हावे ही भाषा लिहीता, चाचता बोलता यावी. भविष्यात जपानी जर्मन सरकारची प्रमाणपत्र परीक्षा देता यावी यासाठी विद्यापीठामार्फत जापनीज व जमर्न या परदेशी भाषाच्या परीक्षा सुरु केल्या आहते. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. या परीक्षांबाबत सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे.

शालेय परीक्षांची वैशिष्ट्ये

१. दरवर्षी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील सुमारे २००० पेक्षा जास्त शाळांमधून लाखांहून अधिक विद्यार्थी विद्यापीठाच्या शालेय परीक्षांना बसतात. विविध विषयांच्या इ.४थी ते १०वी साठी जवळपास ९० परीक्षा वर्षातून दोन सत्रांत घेतल्या जातात.

२. आकर्षक पारितोषिके विविध विषयांच्या प्रत्येक परीक्षांमध्ये एकूण विद्याथ्यांध्ये गुणानुक्रमे पहिल्या दोन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतात. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जातात. सर्व विषयांच्या प्रत्येक परीक्षेस प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यास मार्गदर्शन करणाऱ्या विषय शिक्षकांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

३. अध्यापक मानधन शाळांना परीक्षा व्यवस्थेसाठी होणारा सर्व खर्च व परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शाळेतील अध्यापकांना मानधन म्हणून साधारणतः परीक्षा शुल्काच्या २५% इतकी रक्कम दिली जाते. त्यामुळे शाळेला कोणताही आर्थिक बोजा सहन करावा लागत नाही. जपानी भाषा प्रमाणपत्र परीक्षा व मार्गददर्शन- शाळेच्या मागणीनुसार विद्यापीठातर्फे जर्मन व जापनीज भाषेच्या मार्गदर्शनासाठी मागणीनुसार माफक शुल्क आकारून सी. डी. द्वारा शैक्षणिक साहित्य दिले जाते (अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी संपर्क साधावा.) जर्मन व जापनीज भाषेच्या प्रत्येकी ४ परीक्षा घेतल्या जातात.

अत्यंत महत्त्वाच्या सूचना

विद्यापीठातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येतात. त्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे

  • सर्व विषयांसाठी मिळून किमान ३० विद्यार्थी असतील तरच त्या शाळेस परीक्षा केंद्र दिले जाते.
  • २५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असूनही परीक्षा केंद्र मागणी करणाऱ्या शाळेस परीक्षा केंद्र दिले जाईल. मात्र शुल्कातील केंद्र खर्च व अध्यापक मानधन दिले जाणार नाही. त्यांना संपूर्ण शुल्क भरावे लागेल.
  • ज्या शाळांधून या परीक्षा घेतल्या जात नाहीत अशा शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या विभागीय कार्यालयात / विद्यापीठात बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा देता येईल. (मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेससाठी या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवता येईल. )

नवीन केंद्र व केंद्र क्रमांक

  1. शाळेला नवीन केंद्र सुरू करावयाचे असल्यास त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावांच्या यादीबरोबरच खाली दिलेल्या मुद्दयांप्रमाणे केंद्र सुरू करण्यासाठीचे विनंती पत्र द्यावे. अगोदर केंद्र परवानगीचे मंजुरी पत्र पाठविण्याची गरज नाही. केंद्र सुरू करण्यासाठीच्या अर्जाचे मुद्दे शाळेचे नाव - पूर्ण पत्ता ( मु.पो. ता. जि., पिन कोड, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई.मेल आय डी.) शाळा (केंद्र) - संचालक / मुख्याध्यापकांचे संपूर्ण नाव शाळेची - एकूण विद्यार्थी संख्या शाळेचे माध्यम (प्राथमिक, माध्यमिक) - गावात नियमित टपाल मिळते का? (पोस्ट / कुरीयर) शाळेत संगणक लॅब आहे का ?
  2. आपल्या केंद्राची नोंदणी झाल्यावर नेहमीसाठी विद्यापीठाने दिलेला कायमचा केंद्र क्रमांक प्रत्येक यादीवर व पत्रव्यवहारावर लिहावा. प्रत्येक परीक्षेसाठी त्या शाळेला एकच केंद्र क्रमांक राहील. सर्व पत्रव्यवहारांवर कायमचा केंद्र क्रमांक व शाळेचे नाव लिहावे.

शुल्क व यादी पाठविताना

  1. विविध परीक्षांसाठी विद्याथ्र्यांच्या नावांची यादी पाठविताना पुढे दिलेल्या तक्त्याप्रमाणे यादी तयार करून योग्य त्या शुल्कासह पाठवावी किंवा विभागाच्या E-mail- tmvshaleyaprasar@gmail.com यावर Attachment मध्ये यादी पाठवावी. यापुढे जलद संपर्कासाठी मेलचा वापर केला जाणार आहे. आपणही आपला पत्रव्यवहार ई-मेल आयडीद्वारे करावा. हाताने लिहिलेल्या याद्या स्वच्छ व सुबक हस्ताक्षरात असाव्यात. यादीसाठीचा मजकूर पुढील मुद्यानुसार असावा शाळेचे नाव - शाळेचा पूर्ण पत्ता, पीन कोड, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल आय डी. परीक्षेचा विषय व परीक्षेचे नाव परीक्षा कोड क्र.- - ( शुल्क तक्त्यावर पहावा) केंद्र क्र. विषय शिक्षकाचे नाव (पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना गौरविण्यासाठी आवश्यक तसेच विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी) इयत्तेनुसार वेगळे शिक्षक असल्यास त्याप्रमाणे नाव व मोबाईक क्र. कळवावे शाळा माध्यम मराठी /इंग्रजी / हिंदी (यादी एक्सेल शीटमध्ये आडनाव, नाव, वडिलाचंचे नाव हे - वेगेगवेगळया रकान्यात टाईप करून पाठवावे.)
  2. इंग्रजी विषयाची यादी पाठविताना विद्यार्थी उच्चस्तराच्या / निम्नस्तराच्या परीक्षेस बसणार आहेत याचा उल्लेख करावा.
  3. विद्याथ्र्यांच्या नावांच्या याद्या (संगणकाद्वारे टंकलेखित केलेल्या) सर्व विषयांसाठी इंग्रजीतूनच (Capital Letters Only)पाठवाव्यात. आपली शाळा इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यम आहे याचा स्पष्ट उल्लेख यादीत असावा.

शुल्काबाबत

शुल्काच्या हिशोबात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने सुटसुटीत शुल्काचा तक्ता तयार केला आहे. ( शुल्क तक्ता पहावा ) शाळांनी विभागीय कार्यालयाच्या सेवेचा जास्तीतजास्त लाभ घेऊन टपाल / कुरीयरचा खर्च वाचवावा. नमुन्याप्रमाणे यादी पाठविताना त्यासोबत सर्व परीक्षांच्या एकत्रित किंवा प्रत्येक विषयाचा स्वतंत्र (शाळेच्या सोयीप्रमाणे) शुल्काचा हिशोब पुढे दिलेल्या मुद्दयांप्रमाणे करून पाठवावा. शाळेचे नाव - शाळेचा पूर्ण पत्ता, पिन कोड, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल इ. परीक्षेचे नाव - परीक्षा कोड क्र.- केंद्र क्र. 

शुल्क पाठविताना घ्यावयाची काळजी

  1. शुल्क पाठविताना कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा पुणे शाखेवरील डिमांड ड्राफ्ट मा. कार्यवाह, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे या नावाने काढून याद्यांसोबत विद्यापीठाच्या शालेय प्रसार परीक्षा विभागाकडे पाठवावा. डी. डी. व्यतिरिक्त आपण यूको बँकेच्या मुकुंदनगर शाखेत विद्यापीठाच्या खाते क्र. १६८४०१००००६१११ (IFSC Code UCBA0001684) व बैंक ऑफ महाराष्ट्रच्या टि.म.वि. कॉलनी शाखेत खाते क्र. २००२७०५२४६१ (IFSC Code MAHB0000320) मध्ये स्थानिक बँकेच्या शाखेधून मनी ट्रान्सफर ने शुल्क जमा करता येईल.
  2. मनी ट्रान्सफर ने बँकेत पैसे भरल्याच्या मूळ पावतीची एक झेरॉक्स आपणाजवळ ठेवावी व मूळ पावती याद्यांसोबत शुल्काच्यातपशीलासह विद्यापीठाच्या शालेय प्रसार परीक्षा विभागाकडे किंवा विभागीय कार्यालयाकडे पाठवावी. शुल्क भरल्याची पावती असेल तरच याद्या स्वीकारल्या जातील. चेक व मनीऑर्डर स्वीकारली जाणार नाही..
  3. विद्यापीठात सोम. ते शुक्र. स. १० ते १ व २ ते ४ व शनि. स. १० ते १२ वाजेपर्यंत समक्ष याद्या व रोख शुल्क स्वीकारले जाईल. विभागीय कार्यालयात याद्या व शुल्क स्वीकारण्याच्या वेळेसाठी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा.
  4. शुल्क तक्त्यात (पान क्र. ९ ते ११) * कॉलम १ विद्यार्थ्यांकडून घ्यावयाचे शुल्क, * कॉलम २ - - शाळेकडे ठेवायचे शुल्क ** कॉलम ३ विद्यापीठाकडे पाठवावयाचे शुल्क (कॉलम २ मध्ये अध्यापक मानधन सरासरी + सेवाखर्च + केंद्रप्रमुख मानधन याचा समावेश आहे.) टिप : ऐनवेळी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांस संपूर्ण शुल्क (रु. १००) तसेच प्रत्येक परीक्षेसाठी विलंब शुल्क रु. ३०/- व नृत्यकला परीक्षेसाठी विलंब शुल्क रु. ५०/- घेण्यात येईल.

परीक्षेपूर्वी व परीक्षेनंतर

  1. यादी प्राप्त झाल्यानंतर विषयवार परीक्षांप्रमाणे प्रत्येक केंद्रांना विद्यार्थ्यांच्या आसन क्रमांकांची यादी ( उपस्थिती पत्रक - निळे पाकीट जे उत्तरपत्रिकेच्या खाकी पाकीटावर चिटकविलेले असते) व आवश्यक त्या उत्तरपत्रिका (प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकच असते) परीक्षेपूर्वी किमान ५ दिवस आधी विद्यापीठाकडून / विभागीय कार्यालयाकडून शाळांना वितरित केल्या जातात. खाकी पाकीटावरील स्वतंत्र निळया रंगांच्या पाकिटात ज्यावर आपला पत्ता लिहिलेला आहे त्या पाकिटात असलेली आसन क्रमांकाची यादी आपण पाठविलेल्या यादीप्रमाणे बरोबर असल्याची परीक्षेपूर्वी खात्री करून घ्यावी. सर्व परीक्षा विद्यापीठाने निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घ्याव्यात.
  2. उपस्थितिपत्रकावर परीक्षेस उपस्थित असणान्या विद्यार्थ्याची त्याच्या नावापुढे सही घ्यावी. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या नावापुढे लाल शाईने अनुपस्थित लिहावे. अनुपस्थित क्रमांकावर ऐनवेळच्या दुसऱ्या विद्यार्थ्यांचे नाव टाकू नये हे ग्राहय धरले जाणार नाही. उपस्थितिपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नये. यादीत नाव नसल्यास तसेच परीक्षेस ऐनवेळी बसणाऱ्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव व परीक्षा शुल्क विलंब शुल्कासहित उत्तरपत्रिकेबरोबरच पाठवावे. सदर विद्यार्थ्यांस त्या परीक्षेच्या उपस्थिती पत्रकावरील शेवटचा आसन क्रमांक देऊ न त्यापुढे A/ B / C असे लिहावे. उदा. शेवटचा आसन क्र. १०१ असल्यास त्यापुढील ऐनवेळच्या पहिल्या विद्याथ्र्यांस १०१ A दुसऱ्या विद्यार्थ्यास १०१ B या प्रमाणे आसन क्र. द्यावेत. आसन क्रमांकाच्या यादीतील नावांध्ये काही दुरूस्त्या असल्यास उपस्थितिपत्रकावर संबंधित नावाला / शब्दाला / अक्षराला लाल पेनने गोल करून सुधारणा करावी किंवा स्वतंत्र कागदावर आसन क्रमांकासह चुकीचे नाव व त्यापुढे सुधारित नाव अशी यादी पाठवावी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या नावावरच प्रमाणपत्र दिली जातात त्यामुळे विषय शिक्षकांनी नावात चूक राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  3. परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परीक्षेच्या उत्तरपत्रिका व उपस्थितिपत्रक समक्ष, टपालाद्वारे किंवा कुरिअरने विद्यापीठाकडे / विभागीय केंद्राकडे पाठवाव्यात. उत्तरपत्रिका एस.टी. पार्सलने पाठवू नयेत.
  4. परीक्षा निर्णयाबाबत व प्रमाणपत्राबाबत काही शंका असल्यास निर्णय जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांपर्यंत विद्यापीठाच्या शालेय परीक्षा विभागाकडे संपर्क साधावा. परीक्षा निर्णयानंतर पुढील परीक्षेपूर्वी उत्तरपत्रिका निर्लेखित केल्या जातात.
  5. परीक्षा निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून २० दिवसांच्या आत उत्तरपत्रिकांचे पुनर्निरीक्षणासंबंधीचे अर्ज मुख्याध्यापक, केंद्रसंचालक यांच्यामार्फत स्वीकारण्यात येतात. प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी रु. ३०/- याप्रमाणे पुनर्निरीक्षण शुल्क अर्जासोबत पाठवावे लागते. डुप्लिकेट प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी ५०/- रुपये शुल्क आकारण्यात येते.
  6. केंद्रांनी तात्काळ सेवेसाठी जास्तीत जास्त ई-मेल सुविधेचा वापर करावा. वरील सर्व सूचनांची नोंद घ्यावी व परीक्षेबाबत विद्यापीठास सहकार्य करावे, ही विनंती.

- कार्यवाह
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,
शालेय प्रसार परीक्षा विभाग

विभागाची प्रकाशने

वरील सर्व पुस्तके पुढील ठिकाणी उपलब्ध आहेत. शालेय प्रसार परीक्षा विभागाची सर्व विभागीय कार्यालये व उज्जवल ग्रंथ भांडार / रवीन्द्र बुक सेलर्स ६८३ अप्पा बळवंत चौक, पुणे ३० (बुधवार बंद) दूरध्वनी - ९९७५५८४३२२/०२०-२४४६२२६८

पारितोषिके

  • ● शालेय स्तरावरील संस्कृत, मराठी उच्चस्तर, इंग्रजी निम्नस्तर, गणित या विषयांच्या सर्व परीक्षांमध्ये एकूण विद्यार्थ्यांमधून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणान्या विद्याथ्र्यांना बहुसंख्य पालक व शिक्षक यांच्या मागणीनुसार देण्यात येणाऱ्या रोख रुपये २००/- व रु. १००/- ऐवजी त्या रक्कमेतून ट्रॉफी व मेडेल दिले जाणार आहे.
  • विषयांधील प्रत्येक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांच्या विषय शिक्षकास विशेषप्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते.
  •  नविन पारिताषिके सत्र सप्टेंबर २०१३ पासून विद्यापीठातर्फे खालील परीक्षांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना खालील पारितोषिके जाहिर करण्यात आली आहेत. (सर्व पारितोषिके प्रथम क्र रोख रु. २००/- व द्वितीय क्र रोख रु. १००/- गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना ही पारितोषिके शाळेच्या पल्ल्यावर मनिऑर्डरने पाठविली जातील.)
  1. भागवत पारितोषिक गणित पहिली, तिसरी व पाचवी परीक्षा (प्रथम क्र.)
  2. लोकमान्य टिळक पारितोषिक गणित पहिली, तिसरी व पाचवी परीक्षा (द्वितीय क्र.), जपानी भाषा स्तर १ स्तर ३ व स्तर ४ (प्रथम क्र. )
  3. कै. गुरूदेव रानडे पारितोषिक जपानी भाषा स्तर १, स्तर ३ व स्तर ४ (द्वितीय क्र.), एस. एल. सी. आय. टी. स्तर १ व स्तर ४ (प्रथम व द्वितीय क्र. ) एफ.एफ.सी.ई स्तर १, स्तर ३ व स्तर ५ ( प्रथम व द्वितीय क्र. ) हिंदी तिनही परीक्षा (प्रथम व द्वितीय क्र. ) नृत्यकला पदविका (भरतनाट्यम्) (प्रथम व द्वितीय क्र. )
  4. डॉ. पंडिता सुजाता नातू पारितोषिक नृत्यकला पदविका ( कथक) (प्रथम क्र. रु.३००/- व द्वितीय क्र. २००/-) टिप एका परीक्षेस किमान ३०० विद्यार्थी संख्या असल्यास त्या परीक्षेसाठी प्रथम व द्वितीय क्रमांकास पारितोषिक दिले जाईल. (नृत्यकला परीक्षा सोडून)

स्पर्धा पारितोषिके

मराठी, संस्कृत, इंग्रजी व हिंदी माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेसाठी प्रत्येक गटास खालीलप्रमाणे रोखे पारितोषिके देण्यात येतात.. प्रथम क्रमांकास रु. १०००/- द्वितीय क्रमांकास रु.७००/- तृतीय क्रमांकास रु. ५००/- उत्तेजनार्थ- रु.३००/- विभागून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येते तसेच सर्व गटांत मिळून जास्तीत जास्त क्रमांक मिळविण्या-या शाळेस सर्वसाधारण विजेतेपद दिले जाते. अशा शाळेस स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
संस्कृत व हिंदी माध्यमाच्या स्पर्धेर्धेची पारितोषिके स्पर्धेच्या वेळी जाहिर करण्यात येणार आहेते. भरतनाट्यम् व कथक नृत्यकला शैलीत ०७ ऑगस्ट २०२२ रोजी दरवर्षी प्रमाणे स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्या स्पर्धेस खालील प्रमाणेपारितोषिके दिली जातात.
स्पर्धेची पारितोषिके
ग्रुप डान्स प्रथम क्रमांक रु. १०००/-, 
द्वितीय क्रमांक- रु. ७५०/-, 
तृतीय क्रमांक रु. ५००/-
सर्व गटांस प्रथम क्रमांक- रु. ७५०/-, 
द्वितीय क्रमांक- रु. ५००/-,
तृतीय क्रमांक- रु.३००/-
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येते.


COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,22,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,21,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,19,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,21,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,12,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,5,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,3,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,14,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,4,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: या शैक्षणिक वर्षापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय परीक्षा घेणार Tilak Maharashtra University Activities - Examination
या शैक्षणिक वर्षापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय परीक्षा घेणार Tilak Maharashtra University Activities - Examination
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे शालेय अभ्यासक्रमास अनुलक्षून घेण्यात येणाऱ्या विविध विषयांच्या परीक्षा त्यापैकीच आहे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEif8a5ycnL90wR7t1Jxv5r9NilvQvgy6UNm0JK5KneahXXhoIyGpISCUqd8mBE6B0ZLi-KINZRYxK1Pcrp80qMHLS-AlGCqHD4zDkcpuYnGngmb29LE95ZkO7XTr-xjhJ5SBCVlJyXAin2VyJtZX5b4U-A35WyF9OGqN6f_zAdoilDVQ92Uny2shcBTlg/w400-h230/Tilak-Maharashtra-University-Examination-Activities.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEif8a5ycnL90wR7t1Jxv5r9NilvQvgy6UNm0JK5KneahXXhoIyGpISCUqd8mBE6B0ZLi-KINZRYxK1Pcrp80qMHLS-AlGCqHD4zDkcpuYnGngmb29LE95ZkO7XTr-xjhJ5SBCVlJyXAin2VyJtZX5b4U-A35WyF9OGqN6f_zAdoilDVQ92Uny2shcBTlg/s72-w400-c-h230/Tilak-Maharashtra-University-Examination-Activities.jpg
School Edutech
https://www.schooledutech.in/2022/11/Tilak-Maharashtra-University-Examination-Activities.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2022/11/Tilak-Maharashtra-University-Examination-Activities.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×