इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 20 जुलै, 2022 च्या परीक्षा केंद्रांतील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देणेबाबत... 5-vi-v-8vi-shishyvruti-pariksha-suchana

इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर | Holidays announced for schools having examination centers on the day of scholarship exam

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ ही बुधवार दि. २० जुलै, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इ. ५ वीच्या ३३५३ व इ. ८ वीच्या २३५४ अशा एकूण ५७०७ परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेकरीता आपणामार्फत निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांच्या याद्या आपल्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

परीक्षेच्या दिवशी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपल्या जिल्ह्यातील/तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेकरीता परीक्षा केंद्र असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना दि. २०/०७/२०२२ रोजी एक दिवसाची सुट्टी देण्यात यावी. त्या दिवशीचा अभ्यासक्रम इतर सुट्टीच्या दिवशी शाळा भरवून पूर्ण करून घेण्यात यावा. तथापि सदर दिवशी शाळेचे कार्यालयीन कामकाज सुरू राहील याची नोंद घ्यावी. परीक्षा घेण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना एक दिवस सुट्टी देणेबाबत परिपत्रक - Download Here


इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)-परीक्षा 20 जुलै रोजी
Pre-Upper Primary Scholarship Examination (5th) and Pre-Secondary Scholarship Examination (8th) - 2022 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८. वी) दि. २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे.

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र | Admit card | Hall ticket | Praveshpatr डाउनलोड साठी उपलब्ध.

शिष्यवृत्ती परीक्षा दि. २०/०७/२०२२ चे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या  लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.  शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गमित करावे. www.mscepuppss.in वरून थेट शाळा login करून प्रवेशपत्र download करू शकता. या  लिंक वर आपल्या शाळेचा  udise नंबर व password टाकून login करा. login झाल्यानंतर विद्यार्थी नावापुढे असलेल्या Hall Ticket ला click करून आपण त्या विद्यार्थ्याचे वैयक्तिक प्रवेश पत्र download करू शकता . सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित प्रवेश पत्र download करण्यासाठी  वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या
link चा वापर करून सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र एकत्रित  download करू शकता. अधिक माहिती करिता खालील login केल्यानंतरची स्क्रीन पहा.


District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post