राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS RESULT) 2021-22 या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२ - २२ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक १९ जून २०२२ गुणयादीबाबत.
![]() |
NMMS EXAM RESULT | NMMS परीक्षा निकाल | NMMS परीक्षा गुणयादी |
NMMS EXAM RESULT | NMMS परीक्षा निकाल | NMMS परीक्षा गुणयादी
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.
सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/ ( वार्षिक रु. १२,०००/-) आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. १,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक १०/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.
विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलींग / जात/दिव्यांगत्व / जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास सदर बाबत दिनांक २२/०८/२०२२ पर्यंत परिषदेकडे nmms.msce@gmail.com या ईमेलवर शाळेमार्फत पाठविण्यात यावी. सदर तारखेनंतर येणाऱ्या अर्जांचा/दुरुस्त्यांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्याथ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जात नाही.
संदर्भ- प्रसिध्दी निवेदन - दिनांक :- १०/०८/२०२२ (शैलजा दराडे) 1098/22012, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -१
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-2022
गुणयादी बाबत सूचना…..
इतर महत्वाच्या शिष्यवृत्ती...
- अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती | Pre-matric Scholarship Scheme
- बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
- PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI)
- विद्याधन शिष्यवृत्ती करिता अर्ज सुरु | Vidyadhan Scholarship 2022
- टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती | Tata Trust Scholarship
- राष्ट्रीय आर्थिकदुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरणेबाबत.
COMMENTS