-->

12 वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA HSC Board Exam Result 2023

 ssc-hsc-online-result-maharashtra-2023

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी | HSC) निकाल 2023 | महाराष्ट्र 12th HSC result 2023 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे12 वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA HSC Board Exam Result 2023
12 वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA HSC Board Exam Result 2023

विषय - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या निकालाबाबत
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,
कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१२ वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA HSC Board Exam Result 2023 अधिकृत संकेतस्थळ

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयाध्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर
सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध
होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

  1. ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात स्थाने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-hsc.ac.in) स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ से सोमवार दिनांक ०५/०६/२०२३पर्यंत छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते बुधवार, दिनांक १४/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.
  2. फेब्रुवारी-मार्च २०२३ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्याथ्र्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
  3. फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्र्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement (Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील..
  4. जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक २९/०५/२०२३ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
  5. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सोमवार दि.०५/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.

संदर्भ- दिनांक: 24/०5/२०२3, प्रकटन -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.  विषय: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२3 च्या निकालाबाबत...

१२ वी बोर्ड परीक्षा निकाल Online MAHA HSC Board Exam Result 2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी | HSC) निकाल 2023 महाराष्ट्र 12th HSC result

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

-12-वी-बोर्ड-परीक्षा-निकाल


टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >