National Technology Day : देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे ला साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनला भारतात ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवशी भारताने आपली दुसरी आण्विक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली होती. तसेच, उल्लेखनीय कामगिरीसाठी वैज्ञानिकांना सन्मानित केले जाते.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन सामान्य ज्ञान | National Technology Day GK Quiz
- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो.
- 11 मे 1998 रोजी पोखरणमध्ये देशाने अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी केल्यामुळे हा दिवस भारताच्या तांत्रिक प्रगतीची उपलब्धी म्हणून साजरा केला जातो.
- याशिवाय, या दिवशी पहिल्या स्वदेशी विमान "हंसा-3" ची चाचणी घेण्यात आली, त्याशिवाय, त्याच दिवशी भारताने त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी देखील केली.
National Technology Day General Knowledge Quiz in Marathi
Please fill the above data!
Generated By School Edutech
Name : Apu
Roll : 9
Total Questions:
Correct: | Wrong:
Attempt: | Percentage:
[1] पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला ?
1) 11 मे 1998
2) 10 मे 1974
3) 10 मे 1999
4) 11 मे 1999
[2] खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? अ) 11 मे 1998 रोजी पोखरण-2 अंतर्गत भारताने 5 अण्वस्त्र चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. ब) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली होती, पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
[3] 11 मे 1998 रोजी घडलेल्या घटनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
1) डीआरडीओने याच दिवशी त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
2) बंगळूरच्या राष्ट्रीय एअरोस्पेस प्रयोगशाळेने विकसित केलेल्या हंसा-3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली गेली होती.
3) पोखरण-2 अंतर्गत भारताने 3 अण्वस्त्र चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या.
4) वरील सर्व
[4] राष्ट्रीय विज्ञान दिवस, 2020 या दिवसाची थीम (विषय) कोणती आहे?
1) मेक इन इंडिया - विज्ञान व तंत्रज्ञान प्रेरणा नवकल्पना
2) विज्ञानातील स्त्री
3) लोकांसाठी विज्ञान व विज्ञानासाठी लोक
4) शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान
[5] 11 मे 1998 रोजी भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत राजस्थानच्या पोखरण-2 प्रकल्पातील अणुस्फोट चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) शक्ती-1 ही प्रभंजन प्रकारची, 4 ते 6 किलोटन क्षमतेची अणुस्फोट चाचणी
ब) शक्ती-2 अणुसंमिलन प्रकारची, 12 ते 25 किलो टन क्षमतेची अणुस्फोट चाचणी
क) शक्ती-3 ही 1 किलो टनपेक्षा कमी क्षमतेची अणुस्फोट चाचणी
ड) शक्ती-4 ही 0. 25 टनपेक्षा कमी क्षमतेची अणुस्फोट चाचणी
[6] विज्ञानाशी संबंध असलेले पुढील दिवस भारतात पाळले जातात : अ) 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय शास्त्रज्ञ दिवस ब) 11 मे ला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस क) 30 ऑक्टोबरला राष्ट्रीय विज्ञान दिवस वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
[7] भारताने इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पहिली यशस्वी अणुस्फोट चाचणी कधी घेतली होती ?
1) 11 मे 1974
2) 18 मे 1974
3) 11 मे 1975
4) 18 मे 1975
[8] 1998 साली भारताने एकूण 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेतली होती. हा अणुबॉम्ब .......
1) अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या फॅटमॅन या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता.
2) अमेरिकेनेने जपानच्या नागासाकी येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या फॅटमॅन या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता.
3) अमेरिकेनेने जपानच्या नागासाकी येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता.
4) अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता.
[9] 1998 च्या ऑपरेशन शक्तीचे शिल्पकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ) डॉ. के. संथानम ब) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम क) डॉ. आर. चिदम्बरम ड) डॉ. अनिल काकोडकर
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
[10] 1998 च्या आण्विक चाचणीनंतर भारत सहावा अण्वस्त्रधारी देश बनला. तत्पूर्वी चाचणी घेतलेल्या आण्विक देशांचा योग्य क्रम ओळखा :
1) रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन
2) अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन
3) अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन
4) इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि चीन
[11] भारताचे आण्विक शिल्पकार डॉ. होमी भाभा यांचा जन्मदिवस कोणता ?
1) 30 ऑक्टोबर 1908
2) 28 फेब्रुवारी 1909
3) 30 ऑक्टोबर 1909
4) 28 फेब्रुवारी 1909
[12] सायरस अणुभट्टीबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ) अमेरिकेने 1960 साली सायरस अणुभट्टीसाठी भारताला जड पाणी पुरवठा केला. ब) सायरस अणुभट्टी अमेरिका व कॅनडा यांच्या सहकार्याने विकसित झाली. क) या भट्टीत निर्माण झालेले प्लुटोनियम-239 भारताने अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरले आहे. ड) सायरस ही संशोधन अणुभट्टी मुंबईत आहे. पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) अ, ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
[13] कोणत्या कंपनीने टीआरसी म्हणजेच टेक्सटाईल रिइन्फोर्सड काँक्रीट तयार केले ?
1) एचसीसी
2) शिर्के शिपोरेक्स
3) रैना इंडस्ट्रीज
4) प्लस ऍडवान्सड टेक्नॉलॉजिज
[14] राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद ही ...... यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करते.
1) यू.जी.सी.चे अध्यक्ष
2) भारताचे राष्ट्रपती
3) सी.एस.एस.आर.चे अध्यक्ष/संचालक
4) एच.आर.डी.चे मंत्री महोदय
[15] कोणता दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो?
11 मार्च
10 एप्रिल
01 मे
11 मे
National Technology Day : देशाला नवी ओळख देणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, जाणून घ्या 'हा' दिवस साजरा करण्यामागील रंजक इतिहास
National Technology Day : देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे ला साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे.
National Technology Day : भारत परंपरेने अणि आधुनिकतेने नटलेला देश आहे. भारताने आधुनिकतेला विज्ञानाची साद घालत मोठी प्रगती केली. याच जोरावर भारताने जगात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यातच तंत्रज्ञानात देखील भारताने मोठे यश गाठल आहे. त्याच तंत्रज्ञानाचे जागर करण्याचा आजचा दिवस म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ( National Technology Special Day )
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यामागे रंजक इतिहास - देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मेला साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. तसेच हा दिवस साजरा करण्यामागे एक रंजक इतिहास देखील आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस का साजरा करतात ? ( Why Celebrated National Technology Day? )
११ मे १९९८ मध्ये भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत राजस्थानच्या पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. त्यानंतरच अण्वस्त्रे असलेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट झाले. त्यानंतर १३ मे रोजी दोन विभक्त चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे नेतृत्व तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. यानंतर ११ मे १९९९ रोजी प्रथमच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.
..म्हणून हा दिवस खास - तेव्हापासून आजपर्यंत तंत्रज्ञान विकास मंडळाने तांत्रिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल शास्त्रज्ञ व अभियंत्यांचा सन्मान व प्रोत्साहन केले जाते. या दिवशी डीआरडीओ, भाभा अणु संशोधन केंद्र आणि एएमडीईआर यांनी यशस्वीरीत्या चाचणी केली होती. हेच कारण होते. ज्यामुळे भारत थर्मोन्यूक्लियर शस्त्रे तयार करण्यास सक्षम बनू शकला आहे. तसेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या दिवशी हंस-१ हे या पहिल्या भारतीय विमानाने यशस्वी भरारी घेतली होती. त्याशिवाय डीआरडीओने त्याच दिवशी त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीही केली होती. अशा अन्य साधारण गोष्टी भारताच्या तंत्रज्ञानात घडल्यामुळेच आजचा दिवस हा खास आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन: आजच्याच दिवशी भारताने रचले होते इतिहास National Technology Day ...यासाठी साजरा केला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, जाणून घ्या इतिहास
- 11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची 'पोखरण अणु चाचणी' आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरणमध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.
- अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.
- 11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरणमधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम कसे केले हे पाहून जगाला धक्का बसला.
- भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती. १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.
- अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली.
- या व्यतिरिक्त, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं. हे सैन्य आणि नौदल यांनी एकत्रित केले आणि भारत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग बनला.
