शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक व you tube link शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme चे वेबिनार
शाळासिद्धी ऑनलाईन वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक व you tube link शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme चे वेबिनार
शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मार्गदर्शन सत्र
School Achievement Self-Assessment Guidance Session
रजिस्ट्रेशन साठी लिंक- https://docs.google.com/form
- School standards and evaluation framework शाळासिद्धी-शाळा मानके व मूल्यांकन आराखडा
- Guidelines for school evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)
- Guidelines for school external evaluation (हिंदी,इंग्रजी माध्यम)
- School evaluation dashboard (हिंदी ,इंग्रजी माध्यम)
शाळासिध्दी कार्यक्रमांतर्गत शाळांचे सन २०२०-२१ स्वयंमूल्यमापन पूर्ण करणेबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे दि. ३०/०३/२०२१ चे परिपत्रकानुसार माहिती.
माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे महत्त्वाचे असून शैक्षणिक, भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिध्दी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यानुसार राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे. संदर्भिय शासन निर्णयानुसार दरवर्षी राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे.
जिल्हयातील शाळासिध्दी संपर्क अधिकारी (NodalOfficer) व तालुकास्तरीय शाळासिध्दी संपर्क अधिकारी यांची निवड केली आहे.
शाळासिध्दी कार्यक्रमासाठी निपा, नवी दिल्ली यांच्या www.shalasiddhi.niepa.ac.in या वेबपोर्टलवरील सन २०२०-२१ च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची टॅब सुरु झाली आहे. सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे सन २०२०-२१ मधील स्वयंमूल्यमापन पूर्ण करून त्याची माहिती दि. २६ एप्रिल, २०२१ पर्यत शाळासिद्धी वेबपोर्टलवर भरावयाची आहे. शाळासिध्दी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती www.shalasiddhi.niepa.ac.in वेबपोर्टलवर आहे वेबपोर्टलचा वापर कसा करावा यासाठी वेबपोर्टलवर माहिती ( USERMANUAL) देण्यात आली आहे. यासोबत मराठी माध्यमाची शाळासिद्धी पुस्तिका देखील उपलब्ध आहे. तसेच दि. २५/०३/२०२१ रोजी झालेले शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेबिनार https://youtu.be/B1Xpcix1U0c या युट्यूबच्या लिंकवर उपलब्ध आहे. सर्व शाळांनी सन २०२०-२१ मधील स्वयंमूल्यमापन सदर वेबिनार मधील निपा, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करावे.
सन २०२०-२१ चे शाळांचे स्वयंमूल्यमापन करतांना मुख्याध्यापकांनी शाळासिध्दीची स्वतंत्र संचिका करून त्यात USERNAME आणि PASSWORD स्वत:च्या ताब्यात ठेवावे. मुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्यावेळी सदर संचिका पुढील मुख्याध्यापकाकडे हस्तांतरीत करावी. सन २०२०-२१ चे स्वयंमूल्यमापनपूर्ण केलेल्या शाळांनी त्याची हार्ड कॉपी सदर संचिकेत लावावी व असे दरवर्षी करावे.
COMMENTS