राष्ट्रीय विज्ञान दिन | National Science Day

राष्ट्रीय-विज्ञान-दिन-2022-च्या-निमित्ताने-शाळामध्ये-विविध-शैक्षणिक-उपक्रमांचे-आयोजन-करणेबाबत-Regarding organizing various educational activities in schools on the occasion of National Science Day 2022-educational-activities-in-schools-on-the-occasion-of-national-science-day-2022-राष्ट्रीय-विज्ञान-दिन-2022-च्या-निमित्ताने-शाळामध्ये-विविध-शैक्षणिक-उपक्रमांचे-आयोजन-करणेबाबत-Regarding organizing various educational activities in schools on the occasion of National Science Day-2022-educational-activities-in-schools-on-the-occasion-of-national-science-day-2022

राष्ट्रीय विज्ञान दिवस

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.  डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा शोध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी.

कोण होते सी व्ही रमन : 

सी व्ही रामन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रामन असे होते. त्यांचा जन्म तिरूचिल्लापल्ली येथील सामान्य कुटूंबात ७ नोव्हेंबर १8८८ ला झाला होता. त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले होते. त्यांनी कोलकात्ता विद्यापीठात १९१७ ते १९३३ या कालावधीत भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही कार्य केले आहे. सी व्ही रामन हे १९४७ मध्ये रमन संशोधन संस्थेचे संचालक झाले. त्यानंतर त्यांच्या संस्थेने विविध संशोधन केल्याचे पुढे जगविख्यात आहे.

सी व्ही रमन यांच्या संशोधनाची कशी झाली सुरुवात

भौतिक शास्त्रज्ञ सी व्ही रामन हे १९१७ मध्ये कोलकात्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य सुरू केले होते. त्यानंतर त्यांना युरोप दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच युरोप दौऱ्यात त्यांना भूमध्य समुद्र पाहून त्यांना पाण्याचा रंग निळा कसा याबाबतचे अनेक प्रश्न पडले. त्यामुळे त्यांनी याबाबत त्यांनी जॉन विल्यम रैले यांच्या तर्काबाबत संशोधन केले. आकाशाच्या प्रतिबिंबामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग निळा दिसतो असा विल्यम यांचा तर्क असल्याचे त्यांना समजले. मात्र आकाश तर राखाडी रंगाचे दिसते, मग पाणी राखाडी रंगाचे का दिसत नाही ? असा प्रश्न सी व्ही रामन यांना पडला. त्यामुळे जॉन विल्यम यांच्या मताशी सहमत रामन हे सहमत झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी याबाबत संशोधन सुरू केले.

असा लागला रामन इफेक्टचा शोध : 

युरोप दौऱ्यावरुन परतल्यानंतर सीव्ही रामन यांनी १९२३ साली काही उपकरणांसह पाणी आणि प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास सुरू केला. अथांग समुद्राच्या निळाईचे कारण हे प्रकाशाच्या पाण्याच्या रेणुंमुळे होणारे विकिरण असल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्यानंतर सी व्ही रामन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगामध्ये परावर्तीत होण्याबाबतचे संशोधन केले. या संशोधनातून ते ज्या निष्कर्षावर पोहोचले तो 'रामन इफेक्ट' म्हणून जगात सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे सी व्ही रामन यांनी १९२८ साली रामन इफेक्टचा शोध लागला. या शोधासाठी सी व्ही रामन यांना १९३० सालचा भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला. रामन यांच्या विज्ञानातील या भरीव कामगिरीमुळे २८ फ्रेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे उद्दिष्ट

लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे. सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते. देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणे हा आहे. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही. विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे कार्यक्रम वैज्ञानिक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात. विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

राष्ट्रीय आणि इतर विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमी, शाळा आणि महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था यासारख्या सर्व विज्ञान संस्थांमध्ये या दिवशी विविध वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये भाषणे, निबंध, शास्त्रज्ञांचे लेखन, विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन, परिसंवाद आणि परिसंवाद इत्यादींचा समावेश होतो. विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदानासाठी राष्ट्रीय आणि इतर पुरस्कारही जाहीर केले जातात. विज्ञानाची लोकप्रियता वाढवण्यासाठी विशेष पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत.


राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 च्या निमित्ताने शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत | Regarding organizing various Educational activities in the school on the occasion of National Science Day 2023

राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 (National Science Day 2022)

दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि.२१ ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत घेण्यात यावेत.

राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 च्या निमित्ताने शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत
राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 च्या निमित्ताने
शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत

खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ ,फोटो व इतर साहित्य फेसबुक ,इंस्टग्राम,ट्वीटर इ.समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2022,#nationalscienceday2022 या हँशटँगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी. आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट https://scertmaha.ac.in/competitions/ या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.



राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 च्या निमित्ताने शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत
राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 च्या निमित्ताने
शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत

अ. शालेय स्तरावर विद्यार्थ्यासाठी आयोजित करावयाचे उपक्रम

1) इयत्ता पहिली ते पाचवी

कार्यक्रमाचे नाव :

१. चित्रकला

२. पोस्टर निर्मिती

विषय :  

१. माझी पृथ्वी 

२. परिसरातील माझे मित्र/सोबती.

तपशील :  

चित्रकला / पोस्टर निर्मिती : दिलेल्या दोन विषयांपैकी कोणत्याही विषयावर चित्र / पोस्टर काढून त्याचा फोटो अपलोड करावा.

2) इयत्ता सहावी ते आठवी 

कार्यक्रमाचे नाव : 

१. निबंध लेखन 

२. वैज्ञानिक रांगोळ्या 

विषय : 

१. स्वयंपाकघरातील विज्ञान 

२. भविष्यातील दळणवळण. 

३. माझी शाश्वत जीवनशैली.

४. विज्ञानातील संकल्पना.

तपशील :-  

निबंधलेखन :- दिलेल्या कोणत्याही विषयावर १००० शब्दांपर्यंत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. 

वैज्ञानिक रांगोळी :- दिलेल्या विज्ञानातील संकल्पना या विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.

3) इयत्ता नववी ते अकरावी 

कार्यक्रमाचे नाव : 

१. निबंध लेखन 

२. फोटोग्राफी / व्हिडिओनिर्मिती

विषय : 

१. माझा आवडता संशोधक 

२. भविष्यवेधी विज्ञान सफर.

३. विज्ञानातील गमतीजमती.

४. जैवविविधता.

५. विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन

तपशील :-  

निबंध लेखन :- दिलेल्या कोणत्याही विषयावर १००० शब्दांत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. 

फोटोग्राफी / व्हिडिओ निर्मिती :- दिलेल्या कोणत्याही विषयावर ०३ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा.

4) प्राथमिक , उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी

कार्यक्रमाचे नाव : 

१. वैज्ञानिक प्रतिकृती निर्मिती

२. वैज्ञानिक खेळणी निर्मिती

विषय :- 

१. समाजोपयोगी विज्ञान

२. शाश्वत विकास

तपशील :- 

वैज्ञानिक प्रतिकृती / वैज्ञानिक खेळणी निर्मिती :- दिलेल्या कोणत्याही विषयावर वैज्ञानिक प्रतिकृती किंवा वैज्ञानिक खेळणी तयार करून त्याचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा. वैज्ञानिक प्रतिकृतीची माहिती लिहून त्याचा फोटो आणि व्हिडीओ अपलोड करावा.

सदर उपक्रमांचे आयोजन करताना कोविंड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वरील नमूद करण्यात आलेल्या ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी, शाळा, शिक्षक, पालक यांना अवगत करण्यात यावे. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

राष्ट्रीय विज्ञान दिन | National Science Day | 2022 परिपत्रक डाऊनलोड लिंक👇

संदर्भ- मा. सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 30 यांचे परिपत्रक जा.क्र./राशैसंप्रपम/ विज्ञान विभाग/वि.वि./2021-2022 / 873 दि. 17/02/2022

राष्ट्रीय-विज्ञान-दिन-2022-च्या-निमित्ताने-शाळामध्ये-विविध-शैक्षणिक-उपक्रमांचे-आयोजन-करणेबाबत-Regarding organizing various educational activities in schools on the occasion of National Science Day 2022-राष्ट्रीय-विज्ञान-दिन-2022-च्या-निमित्ताने-शाळामध्ये-विविध-शैक्षणिक-उपक्रमांचे-आयोजन-करणेबाबत-Regarding organizing various educational activities in schools on the occasion of National Science Day 2022

राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2022 विशेष सवलत विज्ञान कोडे च्या 4 पुस्तकाच्या सेट वर...


➖➖➖➖➖➖➖
         37% सूट
➖➖➖➖➖➖➖
रु. 630 ची पुस्तके फक्त 400 रुपये मध्ये
📚📚📚📚📚📚📚
आजच मागणी करा व विज्ञान कोडे हा उपक्रम आपल्या शाळेत राबवून विज्ञान दिन साजरा करा अनोख्या पद्धतीने
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://wa.me/917588090801

https://wa.me/918668434617
संदिप जाधव, रायगड

कोण होते सी व्ही रमन : 
सी व्ही रमन यांच्या संशोधनाची कशी झाली सुरुवात : 
असा लागला रामन इफेक्टचा शोध : 
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे उद्दिष्ट


Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post